रिक्षावाल्याची बायको…. एक वेगळी प्रेम कथा… भाग -3…अंतिम

Written by

©अर्चना अनंत धवड

 

 

 

गोविंदा रोज रात्री दारू पिऊन यायचा. आजही तो दारू पिऊन आला होता . प्रिया त्याच्यावर खूप चिडली. तु मला फसवले. तू मला आधी का नाही सांगितले की तू दारू पितो म्हणुन. त्याला नको नको ते बोलली. पण तो चुपचाप ऐकत राहिला. अणि थोड्या वेळा नी शांतपणे झोपी गेला. प्रिया झोपलेल्या गोविंदा कडे पाहत राहिली. किती शांतपणे झोपला हा. आपण किती बोललो याला. आपण याला बोलायला तरी संधी दिली होती का. लग्नासाठी बळजबरी तर मी केली. तेव्हा येईल त्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल. झाल्या प्रकारात बिचार्‍या ची काय चूक….

तिला फार वाईट वाटले. ती त्याच्या कुशीत शिरली.

आता जवळचे पैसे संपत आले होते. प्रिया नी ठरविले की आता घरात बसुन चालणार नाही. लोक काय बोलतील ते बोलू दे. मला बाहेर पडायला पाहिजे. तिला तिच्या घर मालकाकडून कळले होते की त्याच्या शाळेत शिक्षकाची जागा रिकामी आहे. ती त्या जागेसाठी आवेदन दिल. अणि नशीबानं तिची निवड झाली. शाळा खाजगी होती तरी गोविंदा पेक्षा जास्त पैसे तीला मिळत होते. रोज ती शाळेत जाऊ लागली. रस्त्यानी जाता येता लोक तिला रिक्षावाल्यांची बायको म्हणुन टोमणे मारत होती. सुरवातीला फार वाईट वाटत असे पण नंतर तिला सवय झाली. ती दुर्लक्ष करू लागली. आता तीच अस्तित्व रिक्षावाल्यांची बायको हेच झाले होते.
गोविंदा चे दारू पीने वाढतच होते. त्याच्यावर ओरडले तर तो म्हणायचा दिवसभर रिक्षा चालल्यामुळे थकवा येतो. त्यामुळे प्यावी लागते. तिला ते पटत होते. तिनी ठरवले की याला ऑटो रिक्षा घेऊन द्यायची. दुसर्‍या दिवशी तिने शिकवणी वर्गाचा बोर्ड लावला. प्रिया छान शिकवायची म्हणुन तीन चार महिन्यांत तिच्याकडे भरपूर विद्यार्थी येऊ लागले. आता तिच्याकडे बर्‍यापैकी पैसे येऊ लागले. तिने ऑफिस मधून थोडे कर्ज घेतले अणि गोविंदाला ऑटो रिक्षा घेऊन दिला.

आता सर्व सुरळीत सुरू होते. प्रिया आता दोन मुलांची आई झाली होती. एक मुलगा आणि एक मुलगी . गोविंदा चा ऑटो धंदा ही उत्तम चालला होता. त्याचे दारू पिणे मात्र सुरूच होते. भांडून, ओरडून काही उपयोग नव्हता कारण तो चुपचाप ऐकायचा. कधी कधी वाटायच की हा माणुस आहे की काय. प्रिया कितीही ओरडली, रागावली तरी तो शांतपणे ऐकून घ्यायचा…. तो कधीही तिच्यावर ओरडत नव्हता. त्याच्या वागण्यात नेहमीच तिच्याबद्दल आदर असायचा….. मग प्रिया ने ओरडणे सोडून दिले. त्याला ती समजायची. तो तिला रोज कबूल करायचा उद्या पासून नाही पिणार. पण रोज रात्री तो पिऊन यायचा. प्रिया ला आता कळून चुकले होते की याची दारू सुटणे शक्य नाही.

प्रिया आता कधीकधी सासरी जात होती. तिने सासरचे घर व्यवस्थित करायला मदत केली होती. दीर ला पण ऑटो रिक्शा घ्यायला मदत केली होती. माहेरच्या लोकांनी तिचा अजूनही स्वीकार केला नव्हता त्यामुळे कसेही असले तरी सासरचे लोक च तिला आपले वाटत होते. कधीकधी तिला आई ची खूप आठवण यायची.

आता मुले मोठी झाली होती मुलगी दहावीत तर मुलगा बारावीला होता. तिने स्वता:चे घर बांधले होते. तिचा शिकवणी वर्ग आजही सुरू होता. आज ही एखाद्या बाई ला विचारले कुणाकडे शिकवणी लावली आहे तर ती सांगायची की त्या प्रिया मॅडम कडे…. कोणती प्रिया मॅडम असे विचारले की म्हणायची…. अग, ती रिक्षावाल्याच्या बायको आहे ना तिच्याकडे . लोक तिला तिच्या नावानी किवा आडनावांनी न ओळखता रिक्षावाल्या ची बायको असेच ओळखत होते.
गोविंदा ची प्रकृती आता ठीक राहत नव्हती. दारू पिल्याने त्याचे लिवर खराब झाले होते. तो सतत आजारी रहात होता. प्रिया त्याची शुश्रूषा करीत होती. सतत त्याला अ‍ॅडमिट करावे लागत होते. आताही त्याला अ‍ॅडमिट केले होते. डॉक्टर नी सांगितले की आता प्रकृती चिंताजनक आहे तेव्हा तुम्ही भेटून घ्या. प्रिया गोविंदा ला भेटायला गेली. प्रिया ला पाहताच गोविंदा डोळ्यातून अश्रू वाहू लागले. प्रिया नी गोविंदा चा हात हातात घेतला. गोविंदा रडू लागला अणि बोलू लागला. प्रिया मला माफ़ कर. मी स्वतः ला कधीच माफ करू शकणार नाही. मी तुझ्याशी लग्न करायला नको होते. मी तुझ्या आयुष्याची माती केली. तू बावनकशी सोने असताना कोळश्याला जवळ केले . जेव्हा लोक तुला रिक्षावाल्यांची बायको म्हणतात तेव्हा मला किती वेदना होतात हे तुला माहीत नाही. प्रिया मला माफ़ कर.प्रिया ने त्याचा हात हलकेच थोपटला.

प्रिया म्हणाली, हे पहा तुझा काहीही गुन्हा नाही. तू स्वतःला गुन्हेगार समजू नको. लग्नाची जबरदस्ती मी केली होती तू नाही. तू मला इतक प्रेम, इतका आदर दिला की कदाचित दुसरं कुणी देऊ शकलं नसत… रिक्षावाल्यांची बायको म्हटल्यावर मला आता वाईट वाटत नाही. हे बघ तिने हातातील अंगठी दाखवली. ही सोन्याची आहे अणि यात छोटासा हीरा आहे. सोने जास्त आहे तरी आपण याला सोन्याची अंगठी म्हणत नाही तर हीरा छोटा असूनही हिर्‍याची अंगठी म्हणतो. असच आपल आहे. तू म्हणतोस ना मी सोने आहे. अगदी बरोबर आहे पण तु कोळसा नसून हीरा आहेस. अणि म्हणुनच लोक मला रिक्षावाल्यांची बायको म्हणतात. गोविंदा कसंबसं हसला. प्रिया किती हुशार आहेस ग तू. अस अस्पष्ट बोलला व एकटक तिच्याकडे बघत राहिला. प्रिया च्या लक्षात आले ही त्याचा हाता ची पकड़ सैल झाली आहे. प्रिया नी टाहो फोडला.

आज प्रिया ची दोन्ही मूल मोठी झाली आहेत . मुलगा इंजीनियर झाला असून एका मोठ्या कंपनीत कामाला आहे. मुलगी प्राध्यापिका आहे. मुलीचे लग्न झाले असून जावई प्राध्यापक आहे. पण आजही तिची ओळख रिक्षावाल्यांची बायको अशीच आहे.

“अर्चना अनंत “✍️

प्रेम आंधळं असत…. कधी कोणावर होईल सांगता येत नाही… तरीही प्रेम डोळे उघडे ठेऊन करावे… लग्न म्हणजे खेळ नव्हे…. लग्न करताना आधीच परिस्थितीचा विचार करावा…. आपण त्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकू का याचा विचार करावा…. प्रियाचे वागणे कौतुकास्पद आहे कारण तिने शेवटपर्यंत साथ सोडली नाही…. पण हे सगळं इतकं सोपं नसत…. 

माझा लेख वाचण्यासाठी धन्यवाद…. 

मैत्रिणींनो, माझा लेख आवडल्यास लाईक, कंमेंट आणि मला फालो करा .

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा