रिक्षावाल्याची बायको…. एक वेगळी प्रेम कथा

Written by

®अर्चना अनंत धवड

प्रिया, हॉल मध्ये बसून गोविंदाच्या हार घातलेल्या फोटोकडे  होती….. किती संघर्ष केला मी,किती सुधारण्याचा प्रयत्न केला तुला… किती अपमान झेलले मी…. पण तू मला हवी ती साथ नाही दिली रे… आज माझ्याकडे सगळं काही आहे… पण तू सोबत नाही…. तुझी सोबत आज हवी होती रे…. गोविंदाच्या आठवणीने तिचा कंठ दाटून आला… तिचे मन गतस्मृतीत गेले…

प्रिया दिसायला खूप गोड, अभ्यासात हुशार होती. आई अणि ती अशा दोघीच घरी रहायच्या. आईचा घटस्फोट झालेला… . आई शाळेत शिक्षिका …शाळा घरापासून लांब असल्याने आईने सायकल रिक्षा लावली होती. गोविंदा रोज रिक्षाने  आईला ने आण करायचा. प्रियाला शाळेत तोच सोडायचा. गोविंदा अठरा वर्षाचा काळा सावळा किरकोळ शरीरयष्टीचा तरुण होता. दिसायला जरी किरकोळ असला तरी त्याच बोलण खूप लाघवी होत. घरी रोजचे येणे जाणे असल्यामुळे प्रियाशी त्याची छान गट्टी जमली होती. प्रियाला कुठे मैत्रीण कडे किवा मार्केटमध्ये जायचे असल्यास गोविंदा सोडून द्यायचा. दोघांची थट्टा मस्करी सुरू रहायची. आई प्रिया वर नेहमी ओरडायची की तू आता मोठी होत आहे अस खालच्या लोकांत मिसळू नये. प्रिया सगळे हसण्यावारी न्यायची.

प्रिया आता कॉलेज च्या शेवटच्या वर्षाला होती. गोविंदा मागील दहा वर्षापासून आई आणणे नेणे   करीत होता. एक दिवस गोविंदा आला नाही तरी प्रिया अस्वस्थ व्हायची. तिच्या आयुष्यात आई अणि गोविंदा शिवाय दुसर्‍या कुणाला स्थान नव्हते. प्रिया आता गोविंदा शिवाय जीवनाची कल्पनाच करू शकत नव्हती. ती गोविंदा वर प्रेम करायला लागली होती. तिला माहिति होते की आई या गोष्टीला कधीच तयार होणार नाही. दोघांची सामाजीक स्तिथी दोन विरुद्ध टोके होती. गोविंदा हा झोपडपट्टीत राहणारा खालच्या जातीतील तर प्रिया ही मध्यम वर्गीय कुटुंबात राहणारी, लाडात वाढलेली उच्चशिक्षित उच्चवर्णीय तरुणी. प्रेम आंधळ असत अस म्हणतात हेच खर.

गोविंदालाही प्रिया आवडायची पण तो आपली पायरी ओळखून होता. त्यांनी त्या दृष्टीने कधी विचारच केला नव्हता. प्रिया ने मात्र मनात ठरविले होते की लग्न करेल तर गोविंदाशीच. सकाळी जेव्हा गोविंदा आईला घ्यायला आला तेव्हा तिने गोविंदाच्या हातात आईच्या नकळत एक कागद कोंबला. आईला सोडल्यावर त्यानी खिशातील कागद काढून वाचला. त्यात लिहिले होते ” मला तुझ्याशी फार महत्वाचं काम आहे. सायंकाळी टेकडीवर महादेवाच्या मंदिरात भेट. अणि हो आंघोळ करून छान कापडे घालून येशील. नाहीतर येशील आपला येईल मळकट कपड्यात रिक्षा घेऊन. नक्की ये. मी तुझी वाट पाहिल. ”

पत्र वाचताच गोविंदा विचारात पडला. प्रियानी आपल्याला कशाला बोलवलं असेल. तिला काही तरी महत्त्वाच आपल्याला सांगायचं असेल. कदाचित तीच कुणावर प्रेम तर झाल नसेल. ती नेहमी लहानसहान गोष्टी गोविंदाशी शेयर करायची. त्याला फार उत्सुकता लागली होती. आज त्याचा रिक्षा चालविण्याचा बिलकुल मूड नव्हता. तो सरळ घरी गेला. आंघोळ करून तयार झाला. बर्‍यापैकी कपडे घातले. कपडे घालताना मळकट कपड्यात येशील हे वाक्‍य आठवले अणि त्याला हसायला आले. वेडीच आहे प्रिया. हिला काय माहिती की गरिबांना कपड़े हे अंग झाकण्यासाठी असतात.

गोविंदा पाच वाजता टेकडीच्या मंदिरात पोहोचला. बाहेर पायरीवर बसुन प्रियाची वाट पाहू लागला. थोड्या वेळात प्रिया आली. तो प्रिया कडे पाहातच राहिला. ती खूप सुंदर दिसत होती. प्रिया नी गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. त्यावर गोल्डन रंगाची ओढणी. कधी टिकली न लावणार्‍या मुलीनी आज छान टिकली लावली होती. अंगावर मोजकेच दागिने घातले होते. ती एखाद्या राजकुमारी सारखी दिसत होती. त्याला वाटले कुठल्या कार्यक्रमातून तर आली नाही ना. तेवढ्यात त्याचे लक्ष्य तिच्या खांद्यावरील स्कूल बॅग कड़े गेले. बॅग जास्तच भरलेली दिसत होती. तो म्हणाला काय डायरेक्ट कॉलेज मधून आली का. ती काहीही बोलली नाही. ती शांतपणे त्याच्या बाजूला बसली अणि बोलू लागली. गोविंदा मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तू माझ्याशी लग्न करणार की नाही हे सांग. गोविंदा म्हणाला अग प्रिया माझ थोड ऐकशील का.

मला तुझ काहीही ऐकायचे नाही. हो की नाही एवढे बोल.
अग पण प्रिया…

प्रिया नी गोविंदा ला त्याचे वाक्य पूर्ण करू दिले नाही. तिने बैग तून विषाची बाटली काढली. तोंडाला लावणार तोच गोविंदाने तिच्या हातातली बाटली फेकली. तिने गोविंदा चा हात पकडला अणि ओढत मंदिरात घेऊन गेली. मंदिरातील कुंकू त्याच्या बोटाला लावल अणि त्याच्या हातानी स्वताच्या कपाळावर लावल. त्याचा हात हातात घेऊन अक्षरशः ओढत मूर्तीला प्रदक्षिणा घातल्या. मूर्तीला नमस्कार केला. आज आपल लग्न झाले अणि आजपासून आपण दोघे नवरा बायको. गोविंदा भारावल्यासारखा पाहत होता. काय करावे काही सुचत नव्हते. थोडा वेळ ते दोघे शांत बसुन राहिले.

प्रिया ने बोलायला सुरवात केली. हे बघ आपल्या लग्नाला आई परवानगी देणे शक्य नाही अणि तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाच करू शकत नाही. आई ने माझ्या लग्नाची तयारी सुरू केली होती. मुलगा आमच्या नात्यातलाच होता. उद्या साक्षगंध ठरविले होते. त्यामुळे माझ्याकडे आजच्या आज लग्न केल्याशिवाय पर्याय नव्हता. प्रिया ने स्पष्टीकरण दिले. गोविंदा मात्र अजूनही शॉक मध्ये होता. तो फक्त खाली मान घालून ऐकत होता.

आता आपण तुझ्या किवा माझ्या घरी न जाता आपण बाहेर कुठेतरी जाऊ या. सगळे शांत झाल्यावर आपण वापस येऊ. गोविंदा तिच्यामागे चुपचाप चालू लागला. रस्त्यावर आल्यावर त्यांना बस दिसली. प्रिया नी बस ला हात दाखवला. दोघेही बस मध्ये बसले. बस जिथे जाईल तिथे निघून गेले……

क्रमशः

“प्रिया लग्न तर करते पण ती अड्जस्ट करू शकते का? किंव्वा कशी अड्जस्ट करते… हे माहिती करून घेण्यासाठी दुसरा भाग अवश्य वाचा…. तोपर्यंत वाचत राहा…..

मैत्रिणींनो माझा लेख आवडल्या लाईक, कॉमेंट आणी मला फालो करा…. काही चुका असल्यास तें ही सांगा जेणे करून मला पुढच्या लिखाणात टाळता येतील….
माझा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद ??

“अर्चना अनंत “✍️

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत