रिती झालेली ओंजळ…?

Written by

©️योगिता विजय टवलारे✍️

एक छोटंसं गावं आणि त्या गावात सुखाने नांदणार कुटुंब…नवरा बायको आणि दोन मुलं…एक मुलगा आणि एक मुलगी!

छान हसत खेळत जगणार हे कुटुंब…अचानकच विस्कटत…नवरा बायकोचा “घटस्फोट” होतो..

मुलांची कस्टडी आईकडे जाते..शनिवार आणि रविवार बाबाकडे घालवायचा असं कोर्टाकडूनच ठरतं नंतर मग काही दिवसातच नवरा दुसरं लग्न करतो…तिकडे बायको मात्र आपल्या मुलांसोबत एकटीनेच सुखाने जगायचं असं तिचं ठरलेलं…

वाटेला आलेल्या क्षणांचे आनंदाने स्वागत करायचे..आपल्या मुलांना जितकं आनंदी ठेवता येईल तितका आनंद द्यायचा ती अतोनात प्रयत्न करते..

असेच एक दिवस मुलगा आपल्या बाबांना विचारतो,” बाबा ,तू आणि आई वेगळे का झालात? तुमची भांडण का व्हायचीत? त्यावर अगदी सहजतेने बाबा आपल्या मुलाला उत्तर देतात, “नाही पटलं आमचं म्हणून घटस्फोट घेतला..त्यावर  मुलगा निरागसतेने विचारतो, “उद्या, जर आपलंही भांडण झालं तर माझ्याशी सुद्धा तू घटस्फोट घेशील? वडील हसतात आणि म्हणतात,”नाही रे राजा? मी तुला कसा घटस्फोट देईल?”

u r very spacial to me….  ही गोष्ट झाली सिनेमातली …

नुकतंच मी “झी” टॉकीज वाहिनीवर हा मराठी चित्रपट बघितलेला …मृणाल कुलकर्णी आणि सचिन खेडकर हे या चित्रपटातले लिडींग कपल …नवरा – बायकोची भुमिका यांनी छान पार पाडली… सॉरी..सॉरी…मला घटस्फोटित नवरा बायकोची भूमिका म्हणायचं होतं…☺️

         हल्ली आपल्याकडे घटस्फोटाचे प्रमाण फार वाढलंय …विभक्त झालेलं कुटुंब आणि आपल्या पालकांशी झालेली ताटातूट !ही अत्यंत गंभीर बाब आहे… ?नवरा बायकोच्या भांडणाच कारण काही का असेना? पण “ती” वेगळी होतांना दिसताहेत..

हल्लीचा सर्वेक्षणात संशय ,मोबाईल आणि विवाहबाह्य संबंध ही कारणे समोर आली आहेत..”संशयी” किडा जोडप्यांची डोकं पोखरतोय..

रोजच्या वादातून एकदाचं होणारी सुटका म्हणजे ” “घटस्फोट”…

इतके वर्ष सोबत काढलेली असतात..छोटे छोटे क्षण शेअर केलेली असतात एकमेकांच्या सहवासात…एकमेकांवर केवढ त्यांचे प्रेम असतं….

पण ” नात तोडतांना मात्र एकमेकांचे गुण दिसतच नाहीत , दिसतात फक्त दोष…

अवघं आयुष्य सोबत काढायचं असतं म्हणून लग्न करतांना खूप विचार केला जातो..आणि बरोबरच असतं..”एक चूक आयुष्यभराची शिक्षा ठरू शकते”..

पण तरीही आपण कुणाच्या मनात जाऊन पाहू शकत नाही…कोण, कसे ?निघेल ह्याची शाश्वती तरी कोण देणार? अगदी श्रीफळासारखाच असतो ना माणूस? आतून कसा निघेल हे सांगता येत नाही…

केवळ पार्टनर चांगला नाही म्हणून ,संसाराचा डाव अर्ध्यावरती सोडायचा नसतो…हे वाक्य त्या चित्रपटातील त्याच्या दुसरा बायकोचे आहे.. भावल माझ्या मनाला…?

           मला फक्त एवढंच म्हणायचंय की नवरा बायकोच्या वादात निरागस मुलांची जीवघेणी ओढाताण होते…

त्यांना आई आणि बाबा हि दोघेही हवे असतात..त्यांना नवरा बायको मधले वाद माहीत नसतात आणि माहीत करून घ्यायची सुद्धा गरज वाटत नाही…आणि गरज तरी का वाटावी? त्यांचे वाद समजण्यापलीकडे असतात…

चूक फक्त कुणा एकाचीच राहत नाही..चुकतात दोघेही… नवरा बायको कायम एकमेकांना गृहीतच धरतात? हेच मला कळत नाही..अर्थातच असे सगळ्यांचाच बाबतीत होत नाही…पण मग , माघार घेण्याची वृत्ती दोघांपैकी एकामध्ये तरी असायला हवी …

प्रत्येक वेळेला “इगो” आडवा यायलाच नको…कुणीतरी एकाने नमत घ्यायला हवं…दीर्घकाळ एकमेकांसोबत काढलेल्या क्षणांना एकदा डोळे मिटून आठवावं…बघा , मग ते सुखाने मंतरलेले क्षण …ते हसरे आयुष्य कसे डोळ्यापुढे एका क्षणात तरळून जात… ? असेही होत नसेल तर मग, नुकतंच लग्नं झाल्यावरचे नवे – नवलाईचे दिवस आठवायचे..

आपल्या पहिल्या बाळाचा जन्म आठवायचा.. कारण मला तरी वाटतं आयुष्यात सर्वात महत्वाचं अस काही असेल तर मुलं जन्माला येण्याचा..सर्वात मोठं सुख असत हे आई – वडिलांसाठी….?

नवरा बायको मध्ये आपल्या मुलाशिवाय आणखी कुणी यायलाच नको.. ?

विश्वास हा सुखी संसाराचा पाया असतो…पण कुणाचा लक्षात आलंय  का? घटस्फोट झाल्यावर नवरा दुसरं लग्न करतोच पण बायको मात्र दुसरं लग्न करण्याचा विचार सुद्धा करत नाही ..

पण हे प्रमाण सगळीकडेच पाहायलाच मिळतं असे नाही..करतातही स्त्रिया परत लग्न पण, त्याच प्रमाण फार कमी आहे..आणि पुरुषही करत नसतीलही लग्न, पण स्त्रीयांपेक्षा पुरुषांच प्रमाण जास्त आहे..नाहीतर मग दोघेही परत लग्नच करत नाहीत..

एकदा आलेला कडू अनुभव त्यांना परत घ्यायचा नसतो… ते स्वतंत्र जगताना दिसतात..आणि घटस्फोट घेण्याचा कायदाच नसता तर काय झालं असत? कसही करून एकत्र राहिलाच असतात ना?मला असे म्हणायचं नाहीये की पटत नसेल तरीही बळजबरीने एकत्र रहायलाच हवं…

पण ” काही काही वेळेला अगदी सोप्या असणाऱ्या गोष्टी आपण कठीण करून टाकतो ” आणि नको तितकं ताणून धरतो..एकमेकांशी बोलून , एकमेकांना समजून घेऊन योग्य तो मार्ग निघतोच ना???     

 मग घटस्फोट शेवटचा पर्याय कसा असू शकतो? ” कुणालाही आपली पडती बाजू नको असते…” आपली चूक मान्य करायला मोठं मन असावं लागतं आणि प्रत्येकाकडे ते मन असतच असं नाही.”मी चुकत असेलही तरीही माझेच बरोबर! माझ्यातील “मी” पणा हा कितपत योग्य आहे?

एक सांगू?अगदी मनापासून? माझा
स्वभाव मुळात तापट आणि दुर्दैवाने मला माझ्या जोडीदारासोबत पटवून घेता आले नाही तर मी कसेही करून माझा संसार टिकवण्याचा प्रयत्न करेल! तेही फक्त “मुलांसाठीच” कारण विभक्त झाल्यावर मुलांचं आयुष्य कुत्रा – मांजरासारख होऊन जातं..

त्यांना आई आणि बाबा दोघांचही प्रेम हवं असत.. त्यांच्या विश्वात , त्यांच्या बालमनाच्या चौकटीत फक्त आई – वडील हवे असतात खरंतर आई बाबांची उणीव तीसरे कुणीच भरून काढू शकत नाही ?…ना सावत्र आई ना बाबा(काही अपवाद पण असतात)

        खरंतर माझ्याशी निगडित दूरवर कुणाचाही घटस्फोट झालेला नाहीये आणि त्यावर लिहायला सुद्धा पुरेसा अनुभव लागतो आणि ते खूप महत्वाचं असत..आई – बाबांच्या वादांची आणि चुकांची शिक्षा मुलांना नको मिळायला..

ते माझाकडून बघवत नाही..त्रास होतो..दडपण येत मनावर..आणि कुणी कसं अचानक एका क्षणात संसार तोडून टाकतात??निदान नाही तर फक्त मुलांचा विचार करायला हवा! काय मिळत ह्यातून? आयुष्याची झालेली फरफट?एकमेकांपासून उबगलेल मन? आई वडिलांचा प्रेमाला पोरकी झालेली मुलं??

एकत्र राहून सुख मिळत नाही तर मग विभक्त झाल्यावर खरंच सुख मिळतं का? हे एकदा तरी स्वतः ला विचारून पहा?उत्तर नक्की मिळेल!शेवटी स्वतः चा सुखं – दुःखाचा विचार स्वतः लाच करावा लागतो..कोर्ट फक्त जज करतं! एकच विनंती , बळजबरी तडजोड न करता मुलांकडे बघून सुखा – समाधानाने संसार करा!

               कारण अखेर उरत काहीच नाही ! तर फक्त”रिती झालेली ओंजळ”…..वाट्याला येते …?

          काही चुकल्यास क्षमस्व! कारण माझा कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू मुळीच नाहीये!पण, आवडल्यास,नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा!

#हा लेख म्हणजे माझे स्वतः चे मत..वाचक माझ्या मताशी सहमत असायलाच हवे, ही मी माझी मुळीच अपेक्षा नाही…

#चांगल्या बरोबर वाईट कमेंट्स चे सुद्धा आनंदाने स्वागत करेल..

?शेअर करा पण माझ्या नावासकट?

?योगिता विजय?

२२/६/१९

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा