रुलाके गया….सपना मेरा??

Written by

त्या जब वी मेट मधल्या करीनाला कशी सारखी ट्रेन सुटल्याची स्वप्न पडायची तशी मला शाळेत असताना परीक्षेच्या वेळी दुसऱ्याच विषयाचा पेपर हातात यायची सारखी स्वप्न पडायची…….त्यावेळी मी तो वार आणि त्या दिवशीच्या पेपरचा विषय दहा वेळा चेक करायचे………पेपर मिळेपर्यंत खात्री नसायची आणि उगाच धडधडत राहायचं……..

भगवान की दया से शाळेत असताना ती स्वप्न काही खरी ठरली नाहीत………..?

मगर नसीबका लिखा टाल सका है आजतक कोई…..!!!

शाळेतल्या स्वप्नांनी कॉलेजला गेल्यावर पाठ सोडली होती खरंतर………नाहीतरी असल्या स्वप्नांना जागाच कुठे होती……..?

सेकंड इयरला होते मी………आमची जमात परीक्षेच्या आदल्या दिवशी भयंकर सिरीयस होऊन रात्रभर जागून अभ्यास करणाऱ्यातली……….दरवेळी पेपर सुटला की मैत्रिणीबरोबर तो कसा गेला काय गेला………ऑप्शनला टाकलेलंच नेमकं कसं आलं आणि उद्याचा पेपर यावर निष्फळ बडबड केली जायची. अगदी तसच सारं झाल्यावर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी एकमेकींना प्रोत्साहन देऊन आम्ही निरोप घेतला.

झालं……. दिवसभर सर्व प्रकारचा टाईमपास करून रात्रीच्या ठरलेल्या मुहूर्तावर अभ्यासास प्रारंभ करून अगदी नेहमीसारखा मरमरून अभ्यास केला…….आता नको इतका कॉन्फिडन्स ओतप्रोत भरून वाहत असल्याने धडधड वगैरेचा प्रश्नच नव्हता…….

दुसऱ्या दिवशी परीक्षेचा पेपर हातात आला…….विषय होता “बिझनेस मॅनेजमेंट”…….हे कसं होऊ शकतं?????

काल आम्ही चर्चा तर इकॉनॉमिक्सच्या पेपरवर केलेली!!!?

ओसंडून वाहणाऱ्या कॉन्फिडन्सने मी उठून उभी राहिले चुकीचा पेपर आलाय सांगायला , तेव्हड्यात माझ्या प्रियेने मला खुणावले; हाच आहे बस खाली…..

धडधडायला लागलं, गरगरायला लागलं, मळमळायला लागलं………जोर का झटका हाय जोरोंसे लगा?

मूर्खपणा फक्त माझाच असल्याने खापर फोडायला देखील कोणी सापडत नव्हतं…….

शेवटी देवालाच पकडलं, काss रे काss???? मीच भेटते का तुला प्रत्येकवेळेला??? जरा मला अक्कल दिली असतीस चेक करण्याची तर तुझं काय गेलं असतं………असंच करतोस तू नेहमी?

देवाला दूषणं देऊन आता मन थोडं हलकं झालं ……आणि बिझनेस मॅनेजमेंट नामक विषयावरील वाकुल्या दाखवणाऱ्या प्रश्नांना टेपा लावायचं काम चालू केलं………..

आणि देवाला टेपांना यश दे म्हणून आळवण्याचं……..

वाकड्या तोंडाने का होईना घरी घडलेला सारा प्रकार सांगितला आणि स्वतःच्या झाडुन साऱ्या अवगुणाची महाआरती ऐकून झाली……..

तरीही माझा धीर खचला नव्हता……कुठेतरी वाटत होतं डोक्याचं भुगा करून मारलेल्या टेपा वाया जाणार नाहीत……..देव माझ्या हार नारळला नक्की जागेल.
लागला एकदाचा निकाल लागला……

टेपा अर्थातच पचल्या नाहीत आणि दोन मार्कांअभावी आमचा लटकूराम झाला……….

रुलाके गया सपना मेरा………????

आता मुलीची सकाळची शाळा सुरू झाल्यापासून मी तिची परीक्षा बुडवलीये अशी स्वप्न सारखी पडतात मला………..त्या धसक्याने परीक्षा कालावधीत मी रात्रभर जवळपास जागीच असते आणि नेमका पहाटे डोळा लागतो, मग पोरगीच मला उठवते (मातेवर सकाळी उठवण्याचा बाबतीत काडीचा भरोसा नसल्याने ती स्वतःच्या डोक्याशी पण एक गजर लावते)…..

आता हे स्वप्न खरं व्हायचा काही चान्सचं नाही पोरीच्या कृपेने?

टुक टुक माकड???

तुम्हालाही पछाडून सोडलंय का हो अश्या कुठल्या स्वप्नांनी…….चला सांगा पाहू?

©स्नेहल अखिला अन्वित

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा