रूखरूख

Written by

रूखरूख

आज धनत्रयोदशीचा दिवस. उद्यापासून तीन दिवस बॅंकेला सुट्टी होती. त्यामुळे सकाळपासूनच बॅंकेत भरपूर गर्दी होती.संध्याकाळी वेळेत घरी निघायचे होते त्यामुळे माझेही लक्ष काम उरकण्याकडे होते. तेवढ्यात मध्येच एक म्हातारे गृहस्थ येऊन “ताई उटण घेतल का?”अस विचारलं आणि मी हो म्हणताच निघूनही गेलें पुढे.
पाच मिनिटांनी लक्षात आलं तेव्हा मला माझंच वागण फार खटकल. या सणाच्या निमित्ताने किती तरी अनावश्यक खर्च केला होताच की मी.ज्या अर्थी तो माणूस इतका आतपर्यंत येऊन सगळयांना विचारत होता त्याअर्थी त्याची निकड खरच जास्त होती.
आणि हा खर्च सगळयात आवश्यक होता जो मी केला नाही याची रूखरूख मनाला लागली.

प्रज्ञा बापट

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा