रेल्वेतली हिरकणी,..

Written by

“ए इअर रिंग,….
“ए इअर रिंग,…
रेल्वेच्या डब्यात प्रचंड गर्दीतुन हा आवाज,…तसा दुरवर असेल असा अंदाज,…मनात म्हंटल घेऊ एक दोन कानातले तेवढाच हातभार,…बसल्या सीटवरून दूरवर नजर टाकली ती अजून लांब होती तिच्या डोक्यवरच्या प्लास्टिक डब्यात रिंग दिसत होते,…
ती येई पर्येंत सहज निरीक्षण सुरू झालं माझं,…फार गम्मत असते नाही रेलवे प्रवास,…
आवाजांचे अनेक प्रकार,…भांडण, खिदळण, तान्हुल्याचे रडणं,…आणि त्यात हे विक्रेते,…
ह्यात सगळ्यांची धडपड जागा मिळण्याची,…पलीकडे सामान ठेवण्याच्या रॅकला ओढणीची झोळी बांधलीये,..आणि त्यात एक टुकटुक माकड अडकवलंय(छोटं बाळ)
जे ह्या सगळ्या गर्दीला पाहू शकतय आणि मस्त प्रवास एन्जॉय करतंय,…सगळ्यात सुखी वय,….
असा विचार सुरू आणि ती इअर रिंग वाली अली मी हात दाखवताच थांबली,….इअर रिंगचे डबे माझ्या मांडीवर ठेवून ती त्या झोळीतल्या बाळाकडे वळाली,… त्याला टाटा करू लागली ,हसवू लागली,…
कानातले निवडताना माझं लक्ष तिच्याकडेही होतंच,….
“तिने बाळाच्या आईला विचारलं किती महिन्याचं आहे बाळ,???”
आई म्हणाली 10 महिन्याचं,…
कानातले वाली चा परत प्रश्न,… बसतं का?रंगतो का?काय काय खाऊ घालता?
ती आई सगळ्या प्रश्नाचे उत्तर देऊन म्हणाली तुम्ही का एवढं विचारता,…
कानातल्या वाली म्हणते माझं एवढंच बाळ आहे,…आज मला त्याची फार आठवण येतेय कारण मी रोज रेल्वेत कानातले विकायला 4 स्टेशन पुढे येते आणि उतरून परत च्या रेल्वेत वापस जाते,…पण आज एका गिऱ्हाईकाने पैसे द्यायला उशीर केला अन गाडी धकली अन माझी परतीची गाडी हुकली आता पुढच्या ठेसनावरून लागलं गाडी लै रात्र होईल,…माझं बाळ लै वाट पहात असल माझी,…तुमचं बाळ पाहिलन मला त्याचीच आठवण आली असं म्हणून ती रडायला लागली,…
डोळे पुसत माझ्याकडे आली मी उगाच 8 ते 10 जोड घेतले,…पैसे देऊन म्हंटल आहो जाताल हो लवकर घरी,..
तिला अजूनही रडु आवरत नव्हतं म्हणते कशी ,…असं वाटतंय पळत जावं वाऱ्यासारखं,.. माझं बाळ एकटं आहे घरी,शेजाऱ्याला सांगून आलीये ,…नवरा मेलाय दारून पण आईला तर बाळ जगवायचंय ना म्हणून हे कामं रोजचे,…पैसे घेऊन डोळे पुसत ती निघून गेली,…
थोडयावेळाने एका प्लॅटफॉर्म वर उतरून सुसाट पळत अंधारात नाहीशी झाली,…
आणि मला नकळत शिवरायांच्या हिरकणीची आठवण झाली,…म्हंटल हिरकण्या अजून जिवंत आहेत,..पण त्यांच्यासाठी शिवराय आता राहिले नाहीत जगात………
***स्वप्ना मुळे..

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा