रेस

Written by

रेस,….(लघुकथा)
©स्वप्ना मुळे(मायी)
आय.सी.यु च्या आत एकच जण बसू शकतो नर्स म्हणाली,….सगळे म्हणाले तुच बस बाई,त्याला शुद्ध आली आणि काही बोलला तर तू जवळ पाहिजेस ना,… ती सुन्न होऊन बसलेली होती,…अगदी उदास नजर त्याच्या निश्चल देहाकडे लावून,..तिला सगळा भुतकाळ आठवत होता,…जणु सुन्न होऊन पडलेल्या त्याच्याशी ती बोलत होती18च तर वर्ष झालीत लग्नाला,…अगदी विरुद्ध स्वभावाचे आपण दोघे बांधलोय लग्नाच्या बंधनात,…पहिल्याच रात्री तू तुझी स्वप्न सांगून मोकळा झाला,…किती मोठी होती ती स्वप्न,…मला ना कायम मर्यादेतली स्वप्न बघायला आवडायचं आणि तू तर तुझं आकाश सोडून फारच दूर उडण्याची स्वप्न बघतोएस,…मी असं म्हणताच.. कसला राक्षसी हसला होतास माझ्या वाक्यावर,..मला म्हणालास,मुळीच अडवायचं नाही हं मला,…अगदी घरापासून ते राहणीमान, खाणं पिणं सगळ्या गोष्टी अगदी हाय लेव्हलवर जगणार आपण,…मी करणार ती स्वप्न पूर्ण तू फक्त साथ दयायची सल्ले नाही,…उगाच ते अंथरूण पाहून पाय पसरावे असल्या फुटकळ गोष्टी तर सांगायच्याच नाही मला,…सगळं गिळून टाकलं तेंव्हा पासुन,… दिसायची तुझी मरमर स्वप्न पूर्ण करण्याची,…एक दोन वेळा सासुबाई जवळ बोलले होत तर त्या म्हणाल्या तो असाच आहे ग आणि आम्ही त्याला महत्वाकांक्षी बनवलंच आहे,…तो काही ऐकणार नाही,…जाऊ दे,… फार नवल वाटलं मला तेंव्हा,… मुलांना समाधान हि पायरी पण शिकवायला हवी ना,…विद्यार्थी दशेत ठिक आहे असं वागणं,..पण हा तर संसारी झाला पण तरी सगळा जीव त्या स्वप्नांमध्ये,…त्यासाठी तासंतास काम,..खाण्याचे हाल करून घेणं,जागरण,…आपण सगळं सहन केलं पण मग संसारात झालेले मुलं,… तुला परत त्यांची स्वप्न,..त्यांना हाय फाय शाळा,.. त्यासाठी परत पैसा,… परत ते स्वप्ना मागे धावणं,… तू भेटायचा नाहीस मुलांना मग रडायचे पण तुला ती भौतिक सुखांची स्वप्न सोडत नव्हती,…आनंदाची ही स्वप्न असतात हेच गावी नव्हतं तुझ्या,…मुलंही शिकले मग तुला ऍडजस्ट करायला,…आताही ह्या दोन महिन्या पासुन फॅमेली फॉरेन टूर साठी केवढा आटापिटा लावला होता जीवाचा,..आणि आम्हाला तर वेळही देत नव्हता ,…म्हंटल तर उत्तर ठरलेले,…आपल्याच साठी करतोय ना,…आम्ही म्हणायचो नको आम्हाला तुझी फॉरेन टूर,… इथेच जाऊ दोन दिवस जवळ कुठे,..निवांत समुद्र किनारी,….पण नाहीच ऐकलं,…एक्सट्रा वर्क,जागरण आणि मग त्या दिवशी कम्पणीतच आलेला अटॅक,… डॉकटरांनी प्रयत्न केलेत पण शेवटी देवावर पण सोडलंय,… आपण मात्र हरलो पत्नी म्हणून असंच वाटतंय,..पण त्याला खरंतर रेस मधुन समाधानाच्या पायऱ्यांवर अन अवघडच होतं,… ती विचारच करत होती आणि,…त्याची हालचाल तिला जाणवली,…तिला काहीच सुचेना,…पटकन नर्सला हाक दिली,…काही दिवसात तो बरा झाला,…पण रेसमध्ये धावणारा नव्हता,…आयुष्याची किंमत फार जवळून कळली त्याला,…आपल्याला सहज झेपेल तेच स्वीकारायला शिकला,…छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद शोधता येतो हे तीच म्हणणं त्याला पटायला लागलं,…खरंतर त्या आय.सी.यु ने शिकवलं त्याला महत्व जीवनाचं,..😊

©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.