लग्न,प्रेम…धोका (भाग 2)

Written by

बाहेरून आवाज येतो मूलाकडचे आलेत. आईने डोळे भरून आलेले डोळे अलगद पदराने पुसले आणि बाहेर गेली. अमृताची धकधक आता जास्त वाढली. त्यात बहिणी चोरून मुलाला बघायच्या आणि हिला सांगत यायच्या ” ताई राजबिंडाच दिसतोय ग…शोभेल तुमचा जोडा”. अमृता नकळत लाजून, “काही काय बोलताय.. इथे अजून बघायचा पत्ता नाही नी तुम्ही जोडा च केलात उभा..शांत बसा जरा…माझें हात पाय थरथरू लागलेत..तिथे गेल्यावर ततपप नाही झालं म्हणजे मिळवलं”.     बहिणींना तिची अवस्था बघून हसु काही आवरत नव्हतं तोवर काकू तिला घ्यायला आल्या. काकूंनी घाबरू नकोस अस सांगून जरा धीर दिला. अमृता बाहेर आली…समोर आरवचे बाबा, आरव आणि त्याची आई बसलेली. अमृताच्या घरचेही सगळे होते. आरवने अमृताला येताना बघताच त्याच “दिल गार्डन गार्डन”झालं. फोटो मध्ये दिसत होती त्याहीपेक्षा सुंदर ही प्रत्यक्षात दिसते अस तो स्वतःशीच पुटपुटला. अमृता समोर येऊन एका खुर्चीवर बसली. थोडी घाबरलेली असली तरी आत्मविश्वासाने ती सगळ्यांकडे बघून हसली. नेहमीचे प्रश्न उत्तरांची देवाण घेवाण झाली की घरचे म्हणाले तुम्हा दोघांना एकांतात बोलायचं तर बोलून घ्या. आता दोघांच्याही मनात होतच पण तरीही नकारार्थी मान हलवली. तरीही काकूंनी दोघांना बाहेर बागेत फिरून यायला सांगितलं. बागेत आल्याबरोबर आरव म्हणाला, “छान दिसतेस”. अमृताने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं तर तो सावरत म्हणाला

 

“हे गुलाबाचं फुल छान दिसतंय”.

 

अमृता लाजली. पुढे शिक्षण, आवडी निवडी वरून दोघे बोलायला लागले. आरवच पुन्हा भारतात येण्याचं काही नक्की नव्हतं हे त्याने सांगून टाकलं. अमृतानेही तिला तिची स्वतःची कंपनी काढायचं स्वप्न आहे हे सांगितलं…”मी फ़ार महत्वकांक्षी आहे आणि माझ्या करिअर वर फोकस करणारी आहे…घर मी सांभाळेनच पण माझं स्वप्नही पूर्ण करणारच आणि यात मला साथ देणाराच जोडीदार मला हवाय…तुम्हाला हे सगळं मान्य आहे का?” अमृताने थेट विषयाला भाग घालून त्याच मत विचारलं. “तुला आणि तुझ्या स्वप्नांना आयुष्यभर साथ द्यायला मला नक्की आवडेल”. आरवनेही कोणतेच आढे वेढे न घेता क्षणात उत्तर दिलं. दोघेही खुश होते…नजरेला नजर आता भिडली होती…ही भेट संपूच नये असं काहीसं दोघांची मनं सांगत होती. पण अमृता म्हणाली निघुया का? आरव म्हणाला एक बोलायचं होत…तुला पाहून मला एक गाणं आठवलं. तिने विचारलं कोणतं?

 

 

 

 

Nestle` Ceregrow Organics

 

 

“डोळे शराबी शराबी

 

झुकले ग खाली

 

लाजेची आली कशी

 

ग गालावर लाली”

अमृता खरंच लाजून चुर झाली…तिथून निघून घरी आली. मागोमाग आरवही आला. त्यांच्या चेहऱ्यावरूनच सगळ्यांना दोघांची पसंती आहे हे कळलेलं. आरवला सुट्टी कमी आहे त्यामुळे पुढच्या पंधरा दिवसातच साखरपुडा घेऊ अस ठरलं.

 

साखरपुड्याचा सगळा खर्च अमृताच्या घरच्यांनी करायचं ठरलं. मुलीचं भलं होतंय..आणखीन काय हवं असत आई वडिलांना. सगळ्या अटी मान्य करून साखरपुड्याचा मुहूर्त ठरला. आज सगळीकडे आनंदाच वातावरण पसरलेलं अमृताच्या घरी. घरची मंडळी साखरपुड्याच्या तयारीला लागले सुद्धा तर इकडे अमृता डोळे शराबी शराबी गाणं मोबाइल वर ऐकत स्वतःशीच लाजत आरवच्या स्वप्नात हरवली. पण स्वप्नाच सुख तिला फार काळ उपभोगता आलं नाही…बहिणी ताईला चिडवायला लगेच आल्या. दोन्ही घरी जोरदार तयारीचे वारे घुमत होते..आरवने आईला सांगून अमृताचा मोबाईल नंबर मिळवला.

 

अमृतालाही तस वाटत होतंच की फोनवर बोलावं तेवढीच ओळख होईल…एकमेकांना समजून घेता येईल…तितक्यात तिचा फोन वाजतो… ती उचलते..समोरून आरवचा आवाज..अमृता धावत टेरेसवर येऊन आरवशी बोलू लागली.आधी पंधरा मिनिटे,मग अर्धा तास आणि हळूहळू एक तासही दोघांना बोलायला कमी पडायला लागला.

पहला नशा, पहला खुमार

 

नया प्यार हैं नया इंतज़ार

 

करलूँ मैं क्या अपना हाल

 

ऐ दिल-ए-बेक़रार मेरे दिल-ए-बेक़रार

 

तू ही बता

अशी अवस्था दोघांची. दोघांनाही वाटत होतं साखरपुड्या दिवशीच लग्न करावं…तस आरव म्हणाला की अमृताही म्हणायची मला चालेल. पण लगेच अमेरिकेत जाता नाही येणार..तुला इथे म्हणजे जळगावला राहावं लागेल काही दिवस मग मी घेऊन जाईन. यावर अमृता थोडी हिरमूसायची आणि आरव तिला मनवायचा. प्रेमाची एक एक पायरी चढत चढत साखरपुड्याचा दिवस आला. दोघेही खूप खुश. अमृता जितकी देखणी दिसत होती तेवढाच राजबिंडा आरव दिसत होता. मोठ्या दिमाखात अमृताच्या घरच्यांनी साखरपुडा करूम दिला. त्यावेळी आरवच्या घरच्यांच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या त्यांनी पूर्ण केल्या. आता तर दोघे officially engaged झालेले मग एकमेकांना वेळ देणं सुरू केलेलं.

 

आरव अजून पंधरा वीस दिवस भारतात होता. आता आहे तेवढा वेळ अमृतासोबत घालवायचा अस त्याने ठरवलेलं.

 

या दरम्यान तो खूपदा अमृताच्या घरी येऊन गेला. दोन्ही कुटुंब एकत्र अमृताच्या बाबांच्या फार्म हाऊस वर पिकनिकलाही गेले. तेव्हाच आरवने ळ्सगळ्यांसमोर लग्नाचा विषय काढला. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला पुन्हा लवकर सुट्टी मिळणार नव्हती आणि इतके दिवस फक्त साखरपुडा करून ठेवणं कुठेतरी पटत नव्हतं..पुन्हा अमृतालाही लोक विचारतील किंवा उलट सुलट चर्चा होतील त्यापेक्षा जाण्याआधी कोर्ट मॅरेज करू असा प्रस्ताव त्याने मांडला. परत आल्यावर धुमधडाक्यात लग्न करू सगळ्या पाहुण्यांना बोलवून अस त्याच आणि त्याच्या कुटुंबाचं म्हणणं होतं. थोडा विचार केल्यावर अमृताच्या घरच्यांनाही ते पटलं..शेवटी मुलीचे आईवडील ते..मुलीची काळजी होतीच त्यांना.

 

अमृता आरवचा कोर्ट मॅरेजचा प्रस्ताव मान्य करते का?? दोघांचं कोर्ट मॅरेज होईल का आणि कोण कोणाला कसा धोका देईल?? नक्की वाचा पुढील भागात😊. तुम्हाला काय वाटतं तेही सांगा कंमेंट्स मध्ये. पुढील भाग वाचण्यासाठी मला नक्की फॉलो करा😊🙏.

 

कथा आवडल्यास लाईक, कॉमेंट्स करा आणि शेअर करा पण नावासहितच😊🙏.

©सरिता सावंत भोसले

Article Categories:
सामाजिक

Comments are closed.