लग्न,प्रेम…धोका (भाग 3)

Written by

ठरल्याप्रमाणे आरव जाण्याच्या चार दिवस आधी घरच्यांसमोर अमृता आरवच कोर्ट मॅरेज झालं.आरवने छोटंसं काळे मनी आणि खाली डायमंडच हार्ट शेपच लॉकेट असलेलं मंगळसूत्र अमृताच्या गळ्यात घातलं.अमृता आणि आरव आपापल्या घरी आले. नंतरच्या सुट्टीत लग्न झाल्यावरच अमृता जळगावला जायचं ठरलेलं. दोघांनी लग्न करूनही दुरावा त्यांच्यात भिंत बनून उभा …पण दोघेही समजूतदार..दोघेही करिअरवर फोकस करणारे असल्याने एकमेकांचे प्रोब्लेम्स समजून घेतले. आता आरव गेला की लवकर येणार नाही म्हणून अमृता नाराज होती. आरवलाही थोडं दुःख होत होतं. त्यानेच मनवल अमृताला. आरवला तिने हसतच निरोप दिला.      अमृता आणि आरव एकमेकांपासून दूर राहत होते पण तरीही मनाने जवळ येत होते. वेळ मिळेल तस एकमेकांना फोन करणं, तासनतास चॅटिंग करणं,विडिओ कॉलवर बोलणं चालूच असायचं. या दुराव्याने हळूहळू दोघांच्या मनात प्रेमाची पालवी फुटू लागली होती. या विरहात दोघांचंही एकच गाणं आवडतं झालं होतं जे दोघे नेहमी गुणगुणायचे :

 

मुझसे जुदा हो कर तुम्हे दूर जाना है

 

पलभर की जुदाई फिर लौट आना है

 

साथिया, संग रहेगा तेरा प्यार

 

साथिया, रंग लायेगा इंतज़ार

 

प्रेमाचं बोलणं रोज होतच होतं त्यातून आरव अमृताला कधी कधी विचारायचा की तुझ्या वडिलांची एवढी प्रॉपर्टी आहे..तुम्ही दोघीच मुली मग तुमच्याच नावावर करणार असतील सगळं…पप्पांना सांग माझ्याही नावावर थोडी जमीन करायला..तुमचं ते फार्म हाऊस मला द्यायला. अमृताला वाटायचं हा मस्करी करत असावा म्हणून ती ओके म्हणत हसण्यावर न्यायची.

 

 

 

Dabur Lal tail

Dabur Lal Tail Dabur Lal Tail

 

आरवच्या आई वडिलांचे फोनही अमृताला,तिच्या घरच्यांना यायचे. लग्नाबद्दल नियोजन विचारत..मुलीला दागिने एवढे घाला..तिला सगळा संसार द्या..आम्ही देखील आमच्या मुलीला एवढं काही दिलं मग आमच्या सुनेनेही आणलं तर आम्हाला आवडेलचं..असं गोड बोलत त्यांच्या मागण्या वाढतच जात होत्या. एक दिवस तर त्यांनी आरवला फोर व्हीलर भेट म्हणून लग्नात द्या अस सांगितलं… अमृताच्या पप्पांना हे पटत नव्हतं..आरवच्या आई वडिलांचं बदललेलं हे रूप कुठेतरी खटकत होत. पण आता कोर्ट मॅरेज झालेलं…अमृता आरवमध्ये गुंतत चाललेली…सगळी परिस्थिती कशी हाताळावी, यातून कस बाहेर पडावं हे त्यांना समजत नव्हतं.

 

अशातच आरव एक दिवस अमृताला बोलला लग्न झाल्यावर तुला जळगावला राहावं लागेल निदान दोन तीन वर्षे. आई वडिलांची सेवा करावी लागेल. आमच्या घरातील चालीरीती शिकून समजून घ्याव्या लागतील मग बघू तुला मी अमेरिकेत आणेन किंवा मीच भारतात शिफ्ट होईन. हे ऐकून तर अमृताच्या पायाखालची जमीनच सरकली. आधी तर हा बोललेला काही दिवस जाऊ लग्न झाल्यावर…मी माझ्या सोबतच तुला अमेरिकेला घेऊन येईन आणि मग तू तुझ्या बिझनेस वर फोकस कर. अचानक हा असा कस बोलू शकतो? यावर त्यांचे बरेच वादविवाद झाले. यातूनच त्याचे विचार स्वतंत्र नाहीत,घरचे सांगतील त्यालाच हो म्हणणारा आणि स्त्रीने स्वतंत्र प्रगती करावी असेही विचार नाहीत हे अमृताला कळलं. पण ही गोष्ट घरच्यांना सांगू कशी? आता पुढे काय होईल याचा विचार करत असतानाच तिचं लक्ष तिच्या गळ्याकडे गेलं. तिच्या मानेवर, गळ्यावर पुरळ आलेले…लाल चट्टे पडलेले तिला दिसले.

 

अमृताला आर्टिफिशियल ज्वेलरीची ऍलर्जी होती त्यामुळे गळ्यात ती काहीच घालत नव्हती. आता तिच्या गळ्यात तर आरवने दिलेलं मंगळसूत्र होतं.. जे सोन्याचं आहे असं सांगण्यात आलं होतं..कुठेतरी पाणी मुरतय अस वाटत असल्याने अमृता आई आणि काकुला घेऊन त्यांच्या सोनाराकडे गेली…तिथे गेल्यावर ते मंगळसूत्र खोटं असल्याचं कळलं. एवढा मोठा धोका झाला होता अमृता आणि तिच्या कुटुंबियांसोबत. तिच्या आईचे तर डोळ्यातील अश्रू थांबतच नव्हते.

 

अमृताला आणि तिच्या पप्पांना आता सगळ्या गोष्टींचा संदर्भ लागत होता. आरवच्या घरच्यांचा अमृताच्या वडिलांच्या संपत्ती वर डोळा होता कारण आरवच्या डोक्यावर खूप कर्ज होत हे नंतर कळलेलं. आरव म्हणायचा जमीन,फार्म हाऊस नावावर करून द्यायला सांग पप्पांना हे मस्करीत नाही तर तो खरच बोलायचा.. त्यालाही फक्त घरकाम करणारी, त्याच्या आणि घरच्यांच्या ताब्यात राहणारी मुलगी हवी होती हे आता लक्षात आलं अमृताच्या. काय करावं काहीच सुचत नव्हतं… आरवचा नेहमीप्रमाणे फोन आला तेव्हा तिने मंगळसूत्र खोटं आहे हे सांगितलं.. त्यावर आरव भांबवला…अस कस होऊ शकत..आईनेच बनवून आणलेलं..मला तर यातलं काही माहीत नाही अशी उडवाउडवीची उत्तर देऊ लागला. असुदे आपण नंतर करू मोठं सोन्याचं असंही बोलला. पण अमृताचा विश्वास घात झाला होता… आता तिचा कणभरही विश्वास उरला नव्हता आरववर.

 

यावर त्याच्या घरच्यांशीही बोलणं झालं तर त्यांनीही उडवाउडवीचीच उत्तरं दिली..सोनाराने आम्हालाच फसवलं वाटतंय आम्ही बघतो त्याला..तुम्ही तसही नवीन बनवालच ना नीट बघून घ्या अस बोलायलाही त्यांना लाज वाटली नाही.

 

अमृताच्या मनातून आरव पूर्णतः उतरलेला..तिला तिच्या मतांचा आदर करणारा..घरच्यांचा मान राखणारा मुलगा जीवनसाथी म्हणून हवा होता पण आरवच खर रुप काहीतरी वेगळंच होत. एकदा कोर्ट मॅरेज केलं की ही कुठे जाणार असा विचारच आरवच्या घरच्यांनीही केला होता आणि लग्नाच्या जाळ्यात अमृता सोबत तिच्या कुटुंबियांना अडकवलेलं.

 

या बऱ्याच गोष्टींवर उत्तर प्रत्युत्तर दोन्ही कुटुंबात झाली.. वाद झाले…अमृताच्या कुटुंबीयांनी अवाजवी मागण्या अमान्य केल्या त्यावर आरवच्या कुटुंबांनी तुमच्या मुलीला घरात घेणार नाही अशी धमकी दिली. इकडे आरव अमृताशी बोलणं टाळत होता…जेव्हा फोन व्हायचा तेव्हा अमृता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मागायची. अमृतानेही आता त्याला फोन करणं बंद केलं.

 

आता काहीतरी ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे अमृताने घरच्यांना सांगितलं. “ज्यांनी मला फसवल,तुम्हाला फसवलं,आणि अजून यांच्याशी नातं जोडलं तर अजून ते आपल्याला फसवत राहतील..मुलीची बाजू कमजोर समजून लुबाडत राहतील….समाजाचा विचार करून,उद्या लोक काय म्हणतील असा विचार करून मी माझ्याच हाताने माझ्या आयुष्याची,स्वप्नांची राखरांगोळी करणार नाही…अशा खोट्या माणसांसोबत मला राहायला जमणार नाही आणि मी आता त्याच्या सोबत कोणतं नातं देखील जोडणार नाही.

 

मला हे लग्न मान्य नाही.” अमृताने तीच मत स्पष्टपणे कुटुंबासमोर मांडलं. तिच्या घरच्यांनाही आता ही सोयरीक नको होती. ती सभ्य,घरंदाज माणसं.. सरळ साधी…त्यांना आपली फसवणूक होते हे कळलंच नाही. मुळात ही फसवणूक कोर्ट मॅरेज नंतरच सूरु झाली. स्वतःच्या डोक्यावरच कर्ज कमी करायला अमृतासारखी श्रीमंत मुलगी त्यांना भेटलेली त्याचा पुरेपूर वापर आपण करायचा अस ठरवूनच आरवच्या घरच्यांनी पुढचं सगळं प्लानिंग केलेलं.

 

अमृताची श्रीमंती बघून तिला आणि तिच्या कुटुंबाची फसवणूक करण्यात येत होती हे अमृताच्या लक्षात आलेलं. तिने आरवसोबत लग्न मोडण्याचा निर्णय घेतलाय पण त्यांचं तर कोर्ट मॅरेज झालंय.. कसा सुटेल हा तिढा? अमृता आरवला माफ करेल की खरचं लग्न मोडेल???? नक्की वाचा पुढील भागात😊

 

तुम्हाला काय वाटत काय करावं अमृताने???

 

तुमचं मत नक्की कळवा कॉमेंट्स मध्ये. समाजात अशी फसवणूक खूप मोठ्या प्रमाणात होते त्यावर भाष्य करणारी सत्य घटनेवर आधारित ही कथा आवडल्यास नक्की लाईक, कॉमेंट्स करा…शेअर करा फक्त नावासहितच😊🙏.

©सरिता सावंत भोसले

Article Categories:
सामाजिक

Comments are closed.