लग्नबंधन की तुरुंगवास…

Written by

👉 एकदा अवश्य वाचा…. नक्की आवडेल… 🙏

 

 

लग्नबंधन…????

लग्नबंधन की तुरुंगवास…

 

लग्नबंधन किती प्रेमळ नात आहे ना… पण ते सर्वासाठीच असत अस नाही ना…काही स्त्रियांसाठी ते कटु आहे…

कशाच लग्नबंधन…हे तर स्त्रियांवर लादले गेलेले बंधन आहे… आताच्या युगात सुद्धा लग्नाच्या नावाखाली स्त्रियांचे छळ चालेले असतात…आई वडील जो मुलगा पाहतील त्या मुलासोबतच मुलीने लग्न करायचे… मग तो तिला आवडो किंवा न आवडो… चांगला निघाला तर ठिक नाहितर चांगला नसेल तर् ती आणि तिच नशीब… बायकोला कसा त्रास देता येईल एव्हढेच पाहणारे पण पुरुष आहेत… मग तो मानसिक त्रास असो किंवा शारीरिक…

काहींना लग्न म्हणजे… लग्न केल्यावर हुंडयाच्या स्वरूपात पैसा मिळतो म्हणून लग्न… मग लग्न झाल्यावर हुंड्यासाठी अजून त्रास… काहींना बायको हिं नावापुरती असते… काहीना बायको हिं फक्त भुक भागवणारी मशिन वाटते… काहींना घरातील कामवाली बाई वाटते…तर काहीं पुरुष तीच्याकडूनच काम करून घेऊन स्वतः आयत बसुन खातात… त्यात ते आपले व्यसनं पुरी करतात… जुगार… दारू… इ. तरीही तिलाच मारहाण करतात…तर काहीजण आपल्या घराला वंशाचा दिवा देणारी बाई असते… काही पुरुषांना तर आपण तिचे मालक आहोत आणि ति आपली गुलाम… अश्या वृत्तीचे माणसे आहेत…

लग्नाच्या मुलीच्या खुप अपेक्षा असतात… आणि लग्नानंतरच्या…पण काहींचा अपेक्षाभंग होतो…

 

मी पाहिलेले काही अनुभव तुमच्यासोबत शेअर करीत आहे…

 

१)

फक्त लग्नात हुंडा हवा म्हणून एका कुटुंबाने आपल्या नपुंसक मुलाचे लग्न लावून दिले… लग्नानंतर हे जेव्हा त्या मुलीला समजले… तेव्हा तिच्या पायाखालची जमिनच सरकली… तिला कुठे बाहेर जाऊ देत नसे…ति तिच्या घरच्यांना सांगणार या भितिने तिला सासरकडच्यांनी जाळून टाकले… आणि तिच्या घरच्यांना उलट हेच सांगितले किं तुमच्या मुलीचे बाहेर लफड आहे…आणि तिला आमचा मुलगा आवडत न्हवता…त्यामुळे तिने स्वत:च जाळून घेतले…

 

 

२)

वंशाचा दिवा मुलगा हवा म्हणून एका माणसाने त्याच्या बायकोच्या शरीराचा अक्षरश: खिळखिळा करून ठेवला आता आहे… त्यांना दोन मुली आहेत… तरीपण मुलगा हवा होता… तिचे ४ ते ५ वेळा चेक करून मुलीचे गर्भ असल्याने गर्भपात केले… त्या बाईच्या अंगात् आता अजिबात ताकद नाही… तरी पण अजून तिच्या नवऱ्याला आणि सासूला मुलगाच हवाय… आणि हे सगळ ति पण सहन करते कारण का तर तिची सासू तिच्या नवऱ्याचे दुसरे लग्न लावून देईल म्हणून… तिला भोंदू बाबाकडे नेतात… आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली काहीपण करायला लावतात…

 

अश्या स्त्रियांना कुठे जाता येत नाही म्हणून तिथे राहून सगळ सहन करत रहायच…

 

हे अनुभव मी स्वतः गावाला पाहिलेले आहेत…

 

 

 

 

©®प्रीती बडे ❤

 

 

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा