लग्नबंधन झुगारून बनवली स्वतःची ओळख!

Written by

ऋता,दिसायला अगदी देखणी,हुशारही होती पण वडिल लवकर गेले,गरीब परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करू शकली नाही.कमी वयातच लग्न झालं पण स्वयंपाकात कुणीही तिचा हात धरू शकत नव्हतं इतकी तरबेज.सासरी गेली पण तिथेही सुख मिळालं नाही,नवरा दारुडा निघाला.शारीरिक,मानसिक अत्याचाराला बळी पडली.

सगळे सांगायचे सहन कर,नवऱ्याला सोडलं तर कुठे जाशील?काय करशील?तुझं तर शिक्षण पण नाही की नोकरी करशील..

काय करावं तिला समजत नव्हतं..खूप हिम्मत करून नवऱ्याला सोडलं.

तिच्या पाककलेलाच हत्यार बनवायचं तिनं ठरवलं,आधी टिफिन सर्विस मग लहानशी जागा भांड्याने घेऊन हॉटेल सुरू केलं.व्यवसाय छान सुरू झाला.पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाकस्पर्धेत देशाचं नाव तिने गाजवलं आणि नामांकित शेफ म्हणून तिला नवीन तिची नवीन ओळख मिळाली.

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा