लग्नाचा पहिला वाढदिवस

Written by

उद्या मयांक आणि अर्पिता च्या लग्नाचा पहिला ला वाढदिवस. अर्पिता आजपासुन‌चं मनात कितीतरी स्वप्न घेवुन बसली होती. उद्या मयांक आपल्याला काय सरप्राइज देणार ,  गिफ्ट काय असेल , दिवस कसा असेल आणि रात्र ही किती गोड होईल … अशा बरेचं आशा-आकांक्षा अर्पिता मनात घेवुन मयांक ची वाट बघत बसली होती. रोज पेक्षा आज मयांकला जरा उशीरचं झाला. इतक्यात बेल वाजली , मयांक असेल म्हणुन अर्पिताच्या चेहर्यावर हसु उमटलं. ती साड़ी नीट करत , केस व्यवस्थित करत दाराकडे गेली. तीचा छान खुलुन हसणारा चेहरा मयांकला खुप आवडतो म्हणुन छान हसत दार उघडलं.

“आज बराचं वेळ झाला.… ”      अर्पिताने मयांकच्या हातातील बैग घेत म्हटलं.

“काम असले तर उशीर होणारचं .. मुद्दाम तर काही बाहेर भटकत नव्हतो मी… अन् मी काही लहान नाही जे सगऴ तुला सांगुन करणार… ”        मयांक खुप चिडल्यासारखा बोलला न् सोफ्यावर जाऊन बसला.

“अरे , किती चिढतोय मी तर सहज म्हटलं..  बर चल तु फ्रेश हो मी ताट वाढते आपण जेवण करु..”         अर्पिता मयांकच्या चिढत बोलण्यावर थोडं दुर्लक्ष करत म्हणाली.

“हे बघ , मला भुक नाही मी जेवण करुन आलोयं . मला एकचं गोष्ट दे ती म्हणजे शांती , मिळेल का ..!
मला झोप येत आहे… ”          म्हणत मयांक आपल्या बेडरूम मधे जायला निघुन गेला.

अर्पिता त्याला जाताना बघतचं राहली. तिच्यासाठी हे सगळ भयंकर होतं. रोज जी व्यक्ती आल्याबरोबर दारामधुनचं बायकोला बघुन दिवसभरातली सगळी टेंशन विसरुन जाते , बायको काही काम करत असताना मागुन मिठी मारत , किती काम करशील म्हणत तिला जवळ घेते , बायकोला जेवण केल की नाही आवर्जुन विचारते आणि सोबत घेवुन जेवण भरवते… त्या व्यक्तीचं आज अस रुप बघुन अर्पिताला काहीच कळेनासं झालं. अर्पिता मयांकसाठी जेवणासाठी थांबली होती पण आता मयांक ची अशी विचित्र वागणुक बघुन तिची भुक मरुन गेली होती. अर्पिता ने डोळ्यांच्या पापण्यावरचं पाणी पुसलं आणि सगळ आवरायला लागली. अर्पिता स्वत:च्या मनाला समजावत होती.. आज काही कामाच टेंशन असेल म्हणुन मयांक ला चिढचीढ झाली असणार .. याआधी तर अस कधी नाही घडलं.. मी वाईट मानुन नाही घेणार.. मी मयांकशी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरुन त्यालाही बर वाटेल अन् मयांक ला बोलायला मोकळिक मिळेल. सगळ आवरुन , स्वत:ला आधीसारखं सहज दाखवत अर्पिता बेडरूम मधे गेली. मयांक पलंगावर झोपुन होता मात्र झोप नव्हती आली. अर्पिता मयांकच्या बाजुला येवुन झोपली. अर्पिता मयांकला बघत होती. मग हळुचं मयांकच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याच्या केसांमधुन हात फिरवत म्हणाली , ” काय झालयं मयांक ? कामाच काही टेंशन आहे का ?”     ती पुढे आणखी काही बोलणार तेवढ्यात मयांक ने तिचा डोक्यावरचा हात खाली झटकत म्हणाला , ” अगं तुला सांगितल ना मला शांती हवी आहे म्हणुन कळत कसं नाही तुला.. अन् मला काही टेंशन वगैरे नाही आहे , ठिक आहे मी. झोप येत होती मला पण तु काही झोपु देणार नाहीस…..”         म्हणत मयांक रुम च्या बाहेर निघुन गेला.

आता मात्र अर्पिता सहन नाही करु शकली. जे तिने आतापर्यंत कसतरी रोखुन ठेवलं होतं ते अश्रु आता काही केल्या थांबत नव्हते. कसे थांबणार , थोड्या वेळ आधी पर्यंत ती उद्या येणार्या लग्नाच्या वाढदिवसाचे किती गोड स्वप्न बघत होती आणि आजचं हे सगळ असं अचानक… तिच्यासाठी हे सगळ विश्वास न होण्यासारखचं होतं. आता तर उद्याची बघीतलेली सर्व स्वप्न , सर्व आशा-आकांक्षा फार तुटल्या होत्या. अर्पिता रडत होती. इतक्यात घड्याळाचे ठोके वाजले. अर्पितानेचं १२ वाजताचा वेळ घड्याळात लावला होता मयांक ला छान शुभेच्छा देण्यासाठी. ठोके एकताच तिला आणखिणचं‌ रडायला आलं. आपण काय विचार केला होता आणि हे सर्व काय घडत आहे , याचं आश्चर्य वाटत होत. हा सगळा विचार करत असतानाचं दारावरची बेल वाजली. इतक्या रात्रि कोन‌ असेल म्हणुन ती थोड़ी दचकली. रडणं थांबलं होत. परत बेल वाजली . आता मात्र ती रुम च्या बाहेर जायला निघाली.

अर्पिता ने रुमचं दार उघडताच ………
बाहेर हॉल मध्ये मेणबत्त्यांचा मंद प्रकाश , सगळीकडे ह्रदयाच्या आकाराचे फुगे लावलेले , काही मेणबत्त्या सोफ्याजवळ , काही सोफ्यासमोर टेबल वर , पुर्ण हॉल भर खाली जमिनीवर फुगे जणु पुर्ण हॉल फुग्यांनीचं भरलेला , अर्पिताच्या रुम समोरुन हॉल मध्ये येणारा पुर्ण रस्ता गुलाबांच्या पाखळ्यांनी सजवलेला होता त्यावर चालत अर्पिताला समोर हॉल मध्ये जायच होत. अर्पिता हे सगळ बघतचं राहली होती. आपल्या डोळ्यांवर तिचा न
विश्वास ही बसायला तयार नव्हता. ती गुलाबांच्या पाखळ्यांनी बनवलेल्या वाटेवर चालायला निघाली. ती वाट सरळ हॉल मध्ये जात होती. हॉल मध्ये मयांक तीची वाट बघत होता. मयांक ला बघताचं तिला नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हे सुद्धा कळत नव्हते. काही‌ वेळ आधीचा मयांक आणि आता हे सर्व ……..

अर्पिता ने धावत जाऊन मयांक ला मिठी मारली. मयांक ने अर्पिताला मिठीत घेत “Happy First Anniversary बायको” म्हणुन शुभेच्छा दिल्या. अर्पिताला अक्षरक्ष: रडायला आलं होत पण आता डोळ्यांत आनंदाचे अश्रु होते. “Happy Anniversary” म्हणत तिने मयांक ला शुभेच्छा दिल्या.
    “I Love U So Much अर्पिता” ,  मयांक ने हळुचं मिठीत घेतलेल्या अर्पिताच्या कानात म्हटलं.
तशीच अर्पिता मिठी सोडत म्हणाली , ” खोटं बोलतोस तु. तु‌ मला प्रेमच नाही करत. तु जर मला खरच प्रेम करत असता तर आजच्या दिवशी अस इतक रडवलं नसतं.”

“अगं बायको , ते सगळं मुद्दाम होत तुला हे सरप्राइज देण्यासाठी. बघ , मी असा वागलो नसतो तर माझ काय सरप्राइज आहे हे तु माझ्याकडुन आधीच माहित करुन घेतल असत आणि ते‌ तुला फार चांगल्या प्रकारे जमते सुद्धा आणि मग मी पण हे सर्व इतक्या गुप्ततेमध्ये करु शकलो नसतो. तुला आताचा हा आनंद देण्यासाठी मला अस वाईट वागाव लागलं. बरं तरी तुला माझ्यावर रागवायच असेल ना तर उद्या परत मनभरुन रागावशील , पण मला आजचा हा दिवस , हा क्षण अजिबात गमवायचा नाही”.     मयांक अर्पिताची समजुत काढत होता.

अर्पिताच्या चेहर्यावर गोड हास्य उमटल. ती आधीच सगळ काही विसरली होती. दोघांनी मिळुन केक कापला. एकमेकांना केक भरवला. आणि दोघ आपल्या बेडरूम मध्ये निघुन गेले आजच्या दिवशीला , त्या रात्रि ला आणखी विस्मरणीय बनवायला.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा