लग्नानंतरची अधीरता… भाग 1

Written by

लग्नानंतरची अधीरता…. भाग 1

 ✍️©®जयश्री कन्हेरे -सातपुते

शिवानी आणि प्रणव, हनिमून वरून  परतले…  परतल्यावर शिवानीच्या वागण्यात जरा वेगळेपणा जाणवत होता..  प्रणव अधिसारखाच वागायचा.. पण शिवानीच्या वागण्यात बरीच तफावत दिसत होती. तिचा चेहराच,  तिच धुमसत असलेलं मन सांगत होता..
त्याचं हे वागणं घरच्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही..
पण
काय आणि कस विचारणार..
नवीन नवीन लग्न झाल यांचं.. आणि तेही बळजबरीने नाही.. चांगले सहा महिने एकमेकांना पारखून, समजून घेतल्यावरच.
ही आजकालची पोर न थोड्याशा गोष्टीचा बाऊ करतात.. जरा काही मना सारखं नाही झालं की लगेच यांचे भांडण सूरु.. रुसवे -फुगवे आलेच त्यात “ अस प्रणवच्या आईला वाटत होत.. पण त्या काहीच बोलल्या नाही.
शिवानीने तर हनिमूनवरुण आल्यावर माहेरी जाण्याची रट लावली होती.. “आई मला माहेरी जायचं आहे काही दिवस.. आठवण येतेय आई -बाबांची. मी जाऊ का? “
पण
सासूबाई म्हणाल्या “अग आठ दिवसांनी जायच आहे, ती कसली तरी पूजा संगीतली न तुझ्या आईने, त्यासाठी दोघांनाही बोलावले आहे न. तेंव्हा गेली की सर्वाना भेटून घे, आणि चार दिवस राहून ये, ठीक आहे  न? मगच जा “

सासूला नाही कशी म्हणणार म्हणून ती आठ दिवसांची तर गोष्ट आहे म्हणून मन मारून कशीबशी राहिली खरी मात्र तिच्या वागण्यात तिचा राग दिसून येत होता..
या नवरा बायकोत नेमक काय झालं? हे काही कळलं नाही.
तस बघितलं तर प्रणव व शिवानी एक मेकांना आधीपासूनच ओळखत होते.. एकमेकांचा स्वभाव, आवडी सगळं माहिती होत.. एका वाक्यात सांगायचे तर त्यांचे अरेंज + लव्ह मॅरिज होत..
लग्नाच्या शॉपिंग पासून ते हनीमूनच ठिकाण ठरवण्यात दोघांचीही पसंती होती.. हनिमूनसाठी निवडलेलं ठिकाण हे शिवानीच्या आवडीचं  व पसंतीचं होत.

     लग्नातील सर्व कार्यक्रम अगदी स्वप्नवत आणि टीव्ही तल्या सारखे मजेशीर पार पडले होते..

हळदीचा कार्यक्रम ,  मेहंदी, संगीत,  मुलांची बॅचलर पार्टी.. आणि तिकडे शिवानी ने पण मस्तच एंजॉय केल होत सगळं..
त्या लग्नाच्या रितीरिवाजाच्या वेळी..दोघांनीही एकमेकांना भेटू नये.. बघू नये अशी सक्त ताकीद देऊनही हे दोघे ऐकत नव्हते..  एकमेकांची ओढ जरा जास्तच वाटत होती दोघांनाही.

फोनवर, व्हिडीओ कॉल वर बोलणे.. किस करणे.. सगळं कस जोमात आणि प्रेमात सुरु होत.. ??
बाकीचे म्हणायचे देखील त्यांना “अरे बस करा तो मोबाईलवर किस करणं.. आता तीन दिवसात आयुष्य भर सोबतच राहणार आहात तुम्ही..मग करा किती आणि काय करायचे आहे ते “??????
दोघेही… लग्नाच्या आणि त्यानंतर होणाऱ्या मिलनाच्या कल्पनेनेच मोहरून गेले होते. आणि इकडे मित्रांच्या, नातेवाईकांच्या चिडवण्याने लाजून -लाजून शिवानी लाल होत होती ???
सगळं कस हवंहवंसं सुरु होत..लग्न तीन दिवसांवर येउन ठेपल होत…  या तीन दिवसात एकमेकांना प्रत्यक्ष बघण्याची.. भेटण्याची इतकी आतुरता होती दोघांन मधेही,  की “कधी एकदाच लग्न होतो आणि आम्ही दोघेही एकत्र राहतो( म्हणजेच मिलनाची ओढ )” असं झालं होत.
लग्नाचा दिवस उजाडला.. धुमधडाक्यात… थाटामाटात नवरदेवाची एन्ट्री झाली… काय ती वरात, त्यांचा उत्साह काय वर्णू मी..
“आया मै आया… आया तुझको लेणे.
दिल के  बदलेमे दिलका नजराणा देणे ,
दिल की हर धडकन क्या बोलें है सुन.. सुन…. सुन..
राजाजी घर आये… दुल्हन क्यू शरमाये.. ” असं काहीस गाणं प्रणवच्या मनात वाजत होत..त्यावेळी.

???तितक्याच राजेशाही थाटात नवरदेवाचे स्वागत… वधू कडील मंडळीनी केल..

     शिवानीला लग्न मंडपात सुंदर अशा पालखीत आणण्यात आल..

पालखीमे होके सवार चली रे..
मै तो अपने साजन के द्वार चली रे

असच गाणं शिवानीच मन गुणगुणत असेल ???
अगदी राजकुमारी सारखी तिची एंट्री झाली. प्रणव तर तिच्या कडे एकसारखा बघतच होता.. खूपच सुंदर दिसत होती शिवानी.. का नाही दिसणार आजचा दिवस म्हणजे तिच्या आयुष्यतील खूप महत्वाचा आणि आयुष्याला वेगळं वळण देणारा दिवस होता..
लग्न जुळल्यापासून ते आज पर्यंतची एकमेकांविषयीची असलेली मीलनाची ओढ… आज सर्व साक्षीने पूर्ण होणार होती.
सगळा आनंदी आनंद होता… दोघांच्याही मनात “लड्डू फूट रहे थे ”
तसंही म्हणतात..

शादी का लड्डू जो खाये पश्चताये जो ना खाये ओ भी पश्चाताये.
दुरसे मिठा लगता है ये कडवा लड्डू प्यारा” असच समजा हवं तर..
लग्न झालं.. गृहप्रवेश झाला. आणि सगळे थकलेले होते त्यामुळे सगळे (दुल्हा.. दुल्हन देखील ) झोपी गेले..
दुसऱ्या दिवशी सकाळपासून कामाची व लग्नानंतर होणाऱ्या कार्यक्रमाची लगबग सुरु झाली… एका घरात राहूनही.. आज प्रणव व शिवानीला एकमेकांसोबत बोलायला पण सवड मिळत नव्हती. “लग्नाच्या आधींतरी फोन बोलायचो पण आता तर एकत्र असूनही बोलायला वेळ नाही.. “??असच दोघांच्याही मनात सुरु होत.

ते आटोपल्यावर सत्यनारायण पूजा झाली…
आणि नियमानुसार शिवानीकडले तिला घ्यायला आले. (काही भागात सत्यनारायण पूजा दोन्हीही घरी केली जाते )
शिवानी माहेरी गेली.. प्रणव दुसऱ्यादिवशी पूजेच्या वेळेवर जाणार होता. (सोबतही जाऊ शकला असता.. पण ते मूलवाले जरा…… जास्तच करतात… आल  न लक्षात काय म्हणायचं आहे मला ते.. ?)
दुसऱ्या दिवशी जरा जास्तच उशीर झाला शिवानीच्या माहेरी.. त्यामुळे त्या दिवशी तिथेच मुक्काम करावा लागला… म्हणजे अजूनही

मिलन अभी आधा अधुरा है..
मिलन अभी आधा अधुरा है..”???

दुसऱ्या दिवशी घरी आले… दोघेही.. आणि संध्याकाळी शिवानीची पाळी (mc) आली…. झालं ??
दोघांच्याही मिलनात अजूनही अडचण होतीच.. आणि ही आता चार.. पाच दिवस लांबणार होती..
चार दिवसांनी त्याचं हनिमूनला जाण्याचं रिझर्वेशन
होत. म्हणजे आता सुहागरात डायरेक्ट हनिमूनलाच… होणार होती. दोघांचीही मिलनाची उत्सुकता शिगेला पोहचली होती..
गेली सहा महिने एकमेकांना ओळखत असले तरी फिजिकली ते कधीच जवळ आले नाही… संस्कार हो. कितीही वाटलं तरीही दोघांचेही संस्कार आड येत होते.
आणि आता तर सगळे प्रॉब्लेम येत होते. म्हणजे मिलनाची आतुरता आणखी वाढत होती…
क्रमशः ……, ✍️
तुमची पण आतुरता ताणून ठेवते दुसऱ्या भागा प्रयत्न.. तेंव्हा यानंतरच पुढील भागात… काय होत लग्नानंतरच्या आतुरतेच.. भाग 2मधे…
हनिमून ला गेल्यावर काय होत…आणि शिवानी अचानक का बदलते ते बघूया भाग दोन मधे..
लेख आवडल्यास like, कमेंट करा,  आणि शेअर करायचा असेल तर नावासहित करा.., ©जयश्री कन्हेरे -सातपुते. वाचण्यासाठी धन्यवाद ?माझे इतर लेख वाचण्यासाठी मला फॉलो नक्की करा..

Article Categories:
रोमांचक

प्रतिक्रिया व्यक्त करा