लग्नानंतरची अधीरता…… भाग 2

Written by

लग्नानंतरची अधीरता… भाग 2

भाग 1 खालील link वर वाचा…

https://www.facebook.com/581606972323826/posts/670120986805757/?sfnsn=scwspmo

आता भाग दोन.. पुढील प्रमाणे…

शिवानी आणि प्रणव च लग्न होत,…लग्न झालं….  सगळे कार्यक्रम पार पडतात…..त्यांच्या मिलनात अडचण येते… आणि आता थेट हनिमून… (थोडक्यात मागील भाग )

शिवानीला देखील लग्नानंतर प्रत्येक क्षण फुलत जावा असं वाटत होत.प्रेम हळूहळू खुलत जाव, नवऱ्याने सगळं आपल्या कला… कलाने (मनाणे )करावं, लटके राग आणि मग नवऱ्याने त्याच चुकत नसूनही सॉरी म्हणावं, अगदी सिरीयल मधले नायक करतातात तस.. कदाचित हे सगळ्या नववधूला वाटत असेल.. आपल्या हक्काच्या माणसाने आपल मन जपावं….

तिला शारीरिक ओढ नव्हती असं नाही..

तिलादेखील ते मिलन हव होत…

पण

हळू हळू…

कळी कशी बहरते एक एक पाकळी.. आणि जेंव्हा ती पूर्ण बहरते तेंव्हा त्या कळीचे रूपांतर फुलात होते… अगदी तसेच हिचे विचार होते. नात्याला जरा वेळ द्यावा, नात उमलू द्यावं, ते एकदाच उमललं की बहरायला कितीसा वेळ लागतो…

दोघेही आधीपासून एकमेकांना ओळखत होते त्यामुळे प्रणव तितकी स्पेस आपल्याला, आपल्या नात्याला नक्की देईलच अशी तिला खात्री होती. किंवा तिने ते गृहीत धरले होते.

प्रणव आणि शिवानी एकमेकांना ओळखत असले तरी काही बाबतीत ते अजूनही मोकळे बोललेले नव्हते.(फिजिकल रिलेशन )

आवडी -निवडी माहिती असणे, इथपर्यंत ठीक होत त्याचं. काही गोष्टी या संस्काराने बांधल्या जातात. त्यामुळे ते फिजिकल रिलेशनवर बोलले नाही कधी,(आजकाल बोलतात मूल मुली.. तरी देखील काही अपवाद असतात )

अशा न बोललेल्या विषयासंदर्भात (काही गोष्टीत ) एकमेकांना गृहीत धरून स्वतःच परस्पर ठरवल्या जातात. या नुसार दोघांनीही आपापल्या मनानुसार /मतानुसार एकमेकांना गृहीत धरलेलं होत.. इथेच कुठेतरी दोघांचंही चुकत होत..

एक मात्र खरं, सगळ्यांच्या फिलिंग सारख्या नसतात. किंवा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील सारखा नसतो. हे प्रणव आणि शिवानी या दोघांवरून दिसून येते.

“कुणी अर्धा ग्लास भरलेला आहे म्हणतो.. आणि कुणी अर्धा ग्लास रिकामा आहे म्हणतो” तसच काहीस या. दोघांच्या बाबतीत घडलं..

शिवानी अशी मुलगी होती जिला प्रत्येक गोष्ट ही हळू.. हळू..खुलावी, प्रेमाने, भावनेच्या बंधाने पूर्णत्वास जावी असं वाटायचं.

जसं चंद्र अमावसेला काहीच नसतो… आणि कलालाकलाने वाढत जाऊन पौर्णिमेला परिपूर्ण होतो, त्यामुळे त्याच सौंदर्य आणखीनच खुलते.. पण या सर्वात कुठेही घाई, गडबड नसते तो चंद्र अगदी कलाकलाने आपल सौंदर्य खुलवतो आणि त्यांच्या प्रेमात पडणारे देखील त्याची तितकीच शांततेने प्रतीक्षा करतात 15दिवस.. पोर्णिमेपर्यत (उदाहरणं देतेय )

लग्न-हनीमूनच्या निमित्ताने आयुष्यात पहिल्यांदाच हा मिलनाचा अनुभव दोघेही अनुभवणार होते. अनुभवायला मिळणा-या या आनंदाच्या लाटा मनात भरती -ओहोटी आणत होत्या.

पण

…. या लाटांसोबतच नातेसंबंधांच्या ज्या गाठी बांधल्या गेल्यात त्या कशा पक्क्या कराव्या? किंवा त्या गाठी कधीच सुटू नये म्हणून काय करावं? हे एक प्रकारचं अव्हान असत नवीन जोडप्यानं समोर, त्यातही मुलांपेक्षा मुलींना अशी आव्हाने पेलावीच लागते.(समाजाचा अलिखित नियम मुलींसाठी )जी आव्हानं येतात, ती कशी हाताळायची याची तिळमात्र ही कल्पना नसलेले प्रणव आणि शिवानी हनिमूनला शिमल्याला पोहचले..

प्रवासामुळे आणि लग्नातील धावपळीमुळे शिवानी बरीच थकलेली होती.. प्रणवच काय….. जरा जास्तच उतावळा झाला होता.. त्यामुळे त्याचा थकवा काही त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता.

रूम मधे आल्यावर शिवानी फ्रेश व्हायला गेली…. मस्त, मोकळेपणाने, शॉवर घेत होती (कारण कामाचं टेन्शन नव्हतं.. घरी नव्हती हॉटेल मधे होती न )

प्रणवची लुडबुड सुरु होती… बाहेरून तिला बोलण्याची आणि… ???❤❤❤…. (कळलं असेलच तुम्हाला)

ती सुद्धा.. “थांब रे… जरा धीर धर…just आलोय आपण लगेच घरी नाही जाणार आहोत…सब्र करो पतीदेव, सब्र का फल मिठा होता है??? ” असं म्हणून तिने तेंव्हा वेळ मारून नेली.

ती बाहेर आल्यावर… तिच रूपं… ❤❤❤तिच ओलंचिंब रूपं बघून प्रणव पुन्हा एकदा घायाळ झाला… आधीच उतावळा त्यामुळे त्याने तिला जवळ ओढत मिठीत घेतलं…

शिवानी… लाजतच त्याच्या पासून लटकी (लाडातच ) दूर झाली..

प्रणवला मात्र आता कळेना.. तो सरळच म्हणाला.. “और कितना सब्र राणी सरकार ” म्हणून तिथेच उभा राहिला.. तिच्या जवळ पुन्हा गेला नाही…

या वेळी शिवानीला अपेक्षित होत…. त्याने पुन्हा माझ्या जवळ येऊन मला मिठीत घ्याव… (हो बरोबर ओळखलंत तुम्ही, सिरीयल /फिल्म मधील नायक -नायिका करतात तस ) पण ही रियल लाईफ आहे हे ती जणू विसरली होती. कदाचित तिच्या लग्नानंतरच्या मिलनाच्या कल्पना वेगळ्या होत्या… टिपिकल सिरीयल मधल्या कपल सारख्या..

प्रणव मात्र प्रॅक्टिकल होता… अरे इतके महिने आणि आता मंगळसूत्र बांधून मला परवानगी मिळाली समाजाची तरी देखील “इतना इंतजार क्यू?” असच त्याला वाटत होत

त्याला शिवानीच मन आणि तिला काय वाटत हे कळलंच नाही… तो देखील तिला गृहीतच धरत होता की आपल्याला मिलनाची अधीरता आहे तर हिला देखील असेलच..

मुलींच्या लग्नानंतरच्या पहिल्यां रात्रींविषयीच्या कल्पना वेगळ्या असतात हे तो खरंच समजू शकला नाही.

शिवानी…. हिरमुसली होती तो पुन्हा जवळ नाही आला म्हणून… ते न दिसू देता तिने त्याला फ्रेश व्हायला पाठवलं “मला खुप भूक लागलीय तेंव्हा तू फ्रेश होऊन ये मी ऑर्डर करते रूममधेच ”

“जो हुकूम राणी सरकार….. तुमचं पोट भरलं की माझा देखील विचार कराल.. ??” असं गमतीने म्हणतं प्रणव फ्रेश व्हायला गेला.. आणि त्याला नेमक काय म्हणायचं आहे हे स्पष्टच सांगितलं..

इकडे हिने मस्त डिनर ऑर्डर केल… हा फ्रेश होऊन आला… त्यानंतर दोघांनीही छान जेवण केल.. लग्नात एकमेकांना भरवलं(घास भरवणे ) ते लाजत… लाजत. आज शिवानीने प्रणवला भरवलं…

आणि हा… “ओ.. हो… मॅडम मूड मधे आल्या वाटत.. आता मी पण घास भरवायचा का राणी सरकारला? ”

कदाचित प्रणवच हे बोलण शिवानीला वेगळं वाटलं.. “मी पण घास भरवायचा का? ” अशा रोमँटिक मूड मधे असं प्रश्नार्थक बोलल्या पेक्षा…. जे समोरच्याला अपेक्षित आहे ते कृतीतून केल तर…. रोमँटिक मूड आणखी रोमँटिक होतो… नाही का? (रोमँटिक मूड आणखी रोमँटिक होतो… नाही का?हा प्रश्न वाचकांना बर का, ?? )

कसा न प्रणव,जरा सुद्धा रोमँटिक नाही वागत…. की मीच जरा जास्त वेगळा विचार करतेय पहिल्या रात्रीच्या मिलनाचा .. तिला खुलवण्याचा? ??? मग त्या सिरीयल आणि फिल्म मधे दाखवतात ते कुणाच्याच नशिबी नसत का? ??असा विचार तिच्या मनात सुरु होता.. (वाचकहो तुम्ही देखील करा हा विचार )

अग.. शिवानी…  अग…ये…. शिवानी कसला विचार करतेयस?

प्रणवचा आवाज आल्यावर शिवानी विचारांच्या तंद्रीतून बाहेर येते… “काही नाही… तुझ्या प्रश्नांचा विचार करतेय “मी देखील घास भरवायचा का?” याचा ”

गम्मत करतोय ग.. तू म्हणशील तर अख्ख जेवण भरवतो माझ्या लाडक्या बायकोला.

मी म्हणेल तर? तुला नाही वाटत का स्वतः असं काहीतरी रोमँटिक करावं म्हणून..

माझा तर कधीचा मूड बनलाय रोमँटिक तूच तर साथ देत नाहीस न…. आणखी किती वाट बघायची ग…  “अधीर मन झाले….. अधीर मन झाले”???? ”

तुला फक्त ती एकच गोष्ट रोमँटिक वाटते का? बाकी नाही… (शिवानी )

मगाशी तुला जवळ घेतलं तर तूच दूर झालीस न… मग आता आणखी काय रोमँटिक करावं मी हनिमूनला आल्यावर… तूच सांग राणीसरकार…..

आधी जेवण करूया मग सांगते…. (शिवानी )

आणखी सांगणार आहेस… करणार काहीच नाहीस ?मिश्किल पणे प्रणव म्हणाला. ???

जेवण आटोपलं…. आणि शिवानी खिडकीजवळ जाऊन बाहेरील दृश्य न्याहाळत होती..

चल आपण बाहेरून फिरून येऊया… रात्रीचा नजारा अनुभवुया… तो पर्यंत तुझाही मूड रोमँटिक होईल… काय म्हणतेयस ..

हो.. चालेल मला अशा चांदण्या रात्री तुझ्या हातात हात गुंफून भटकंती करायला…

इकडे प्रणव ने मॅनेजर ला सांगून रूम आणि बेड…जस्ट मॅरीड, सुहागरात स्पेशल सजवायला लावली होती.. हे शिवणीसाठी सरप्राईज होत… आणि आम्ही रूम मधे परत आल्यावर … do not disturb चा बोर्ड लावायला लावला होता…

मस्त मनसोक्त चांदण्यातली भटकंती करून झाल्यावर… शिमल्याची थंडी आता जाणवू लागली होती… तितक्यात प्रणवला मॅनेजरचा कॉल आला.. (त्याने सांगितलं होत तस.. रूम रेडी झाल्यावर कॉल करा, “उतावळा, ????”) sir your roomis ready….

Ok… म्हणतं प्रणवने कॉल कट केला आणि.. जायचं का mam रूमवर? डोळा मारतच,  असा प्रश्न शिवानीला केला..

थंडी देखील…. वाढत होती. आणि प्रवास.. जेवण.. झोप हे आपल समीकरण आहे.  त्यानुसार शिवानीला खरच रूमवर जाऊन झोपावस वाटत होत.. त्यामुळे ती देखील लगेच त्याचा हात तिच्या दोन्ही हातानी घट्ट पकडून मान त्याच्या खांद्यावर टाकून…. लाडिक “हो” म्हणाली..

दोघेही हॉटेलात आले… रूम उघडलं.. तर सगळीकडे कँडल चा उजेड होता.. लाईट ऑन करायला गेली शिवानी तर प्रणव ने तिला थांबवलं… कारण त्याने सगळं प्लॅन आधीच केलेलं होत… आता त्याला बेडजवळचे कॅण्डल लावलायचे होते…. तो समोर गेला आणि ते कॅण्डल लावले… आणि बेडची सजावट बघून शिवानी लाजलीच… तिच्या श्वासाची गती वाढली होती “धडकन तेज हो गयी” थोडी भीती.. थोडा आनंद…असा मिश्रभाव तिच्या डोळ्यात दिसत होता……

तिच मन देखील पूर्णतः तयार होत… कारण तिला माहिती होत, आता तो क्षण आलाय…. ज्यावेळी आपण आपल सर्वस्व आपल्या जीवनसाथीला अर्पण करतो…लग्नानंतरची अधीरता संपुष्टात आणण्याचा… मिलनाचा तो क्षण तिलाही भरभरून अनुभवायचा होता…

प्रणव…. तिच्या जवळ येउन… “काय मग आवडलं का सरप्राईज.. राणीसरकारला?? ”

ती आश्चर्याचे भाव चेहऱ्यावर आणत, हे सगळं कधी ठरवलंस तू…???

आता पुन्हा प्रश्न सुरु झाले तुझे…. ती प्रश्नपत्रिका उद्या सोडवतो मी… आजची रात्र तू बोलायचं नाहीस..

कारण

“मुझे हक है….. मुझे हक है” म्हणतं त्याने तिला आपल्या बाहुपाशात घेतले…. आणि प्रश्न विचारणारे ओठ कधी उत्तर देणाऱ्या ओठात मिसळे?? हे शिवानीला देखील कळले नाही…

“आधा अधुरा मिलन” पूर्ण तर झाला खरा….

पण…..

शिवानीच मन त्या मिलनानंतर अस्थिर झालं… तिला स्वतःची चीड येत होती… धुमसत होत तिच मन आतल्याआत.. तिला झोप तर आली नाही..  पण तिची होणारी तगमग बघायला प्रणव जागा नव्हता…

प्रणवच्या मिलनाची अधीरता शमली होती…

पण

शिवानीच काय…?

तिला काय झालं जे तिच मन अस्थिर झालं..? तिला सुद्धा शारीरिक ओढ होती….. मग तरीही ती अशी का वागत होती…?

हे पुढील भागात… तो पर्यंत विचार करा.. ???

शिवणीच्या मानाची अस्थिरता पुढील अंतिम भागात स्पष्ट होईल….

क्रमशः….. ✍️जयश्री कन्हेरे -सातपुते

कमेंट करून मत नक्की द्या like करा व शेअर करायचा असेल तर नावासहित करा.. धन्यवाद ?

वाचक मित्र – मैत्रिणींनो तुम्ही “लग्नानंतरची अधीरता.. भाग 1” ला प्रचंड प्रतिसाद दिला.. त्यासाठी मनापासून आभार.. याही भागाला तसाच प्रतिसाद द्याल व हाही भाग आवडेल अशी अपेक्षा करते… ?? माझे लेख वाचण्यासाठी मला फॉलो नक्की करा.. शेअर करायचा असेल तर नावासहित करा.. धन्यवाद ??

फोटो साभार गुगल ???

प्रतिक्रिया व्यक्त करा