लग्नानंतरची अधीरता भाग 3(अंतिम )

Written by

लग्नानंतरची अधीरता…. भाग तिसरा अंतिम पुढील प्रमाणे… त्याआधी थोडक्यात भाग 1 व दोन चा सारांश… पुढील प्रमाणे.

प्रणव शिवानीच… लग्न होत…. सगळं छान व व्यवस्थित पार पडत.. दोन्हीकडील सत्यनारायण पूजा पार पडते…. घरीआल्यावर शिवानीची पाळी (mc)येते त्यामुळे “मिलन अभी आधा अधुरा है “…. असं काहीस होत…. त्यानंतर ते शिमला येथे हनिमून ला जातात… त्या प्रत्येक क्षणा गणिक मिलनाची अधीरता दिसून येते.. प्रणव एक सरप्राईज प्लॅन करतो शिवणीसाठी.. तिथे छान रोमँटिक सुहागरातची तयारी प्रणव करतो….. ते सगळं बघून शिवानी पुन्हा प्रश्न विचारते.. आणि “प्रश्न विचारणारे ओठ…. उत्तर देणाऱ्या ओठात कधी सामावतात हे तिलाही कळत नाही “….. प्रणवची अधीरता या मिलनामुळे पूर्णत्वास जाते…. पण शिवानी तिच काय…?  ती तळमळत असते, ती का??????  हे आता पुढील भागात..

लग्नानंतरची अधीरता… भाग अंतिम

हनीमूनच्या दिवसांत प्रणव आणि शिवानी यांच मिलन …  झाल खर, पण त्यांच्या शरीरांच्या तारा काही जुळल्या नाहीत.

शिवानीला त्या मिलनात प्रणवचा धसमुसळेपणा, आक्रमकपणा जाणवला. तिच्या मनाचा… तिच्या पहिल्यां रात्रीच्या कल्पनेचा सगळा बट्ट्याबोळ झाला होता.. तिला जो विश्वास होता प्रणववर की तो नात्याला स्पेस देईल…. तो विश्वास डळमळाला होता… तिलाही हे मिलन हवं होत पण

कस…

जस फूल उमलत एक एक पाकळी तस...

जसा चंद्र कलाकलाने पूर्णत्वास जातो तस तिला हे मिलन हवं होत.. 

पण त्या मिलनात प्रणवचा आवेश, उतावळेपणा, आक्रमकपणा, धसमुसळेपनाच तिला जाणवला … त्या सगळ्यात तिला होणाऱ्या त्रासाचा त्याला एक क्षणही विचार आला नाही.. तो फक्त त्याची अधीरता, त्यांच्या शरीराची भूक शमवत होता..

पहिल्यांदा होणाऱ्या या मिलनामुळे, या संबंधाचा बायकोला काही त्रास होतोय का.. या कडे त्याच लक्ष गेलंच नाही.. कारण…….. आजकाल इंटरनेट, मोबाईलच्या काळात येणारे पॉर्न व्हिडीओ सर्वांनाच उपलब्ध झाले आहे. त्यातून ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार, आवडी-निवडीनुसार प्रत्येकाच्या लैंगिक प्रेरणा, लैंगिक वर्तन प्रभावित होत आहे.(जरा स्पष्टच लिहीत आहे ). असे व्हिडिओ बघून प्रणव सुद्धा उतावळा झाला होता… त्यामुळे त्याला त्या मिलनाच्या आवेगात शिवाणीचा त्रास व तळमळ दिसलीच नाही… इथेच चूक झाली प्रणवची..

ज्यामुळे शिवानीला त्याचा राग येत होता..

आणि तो झोपल्यावर ही एकटीच आतल्याआत तडफडत होती.

असंख्य प्रश्न तिच्या समोर होते…..  “का नाही समजू शकला प्रणव आपल्या अव्यक्त भावना…? त्या लावलेल्या कॅन्डलच्या उजेडात त्याला माझा चेहरा दिसला नसेल का? माझ्या चेहऱ्यावरन माझ्या त्रासाची जाणीव का नाही झाली? हळूहळू देखील हे नात फुलवता येऊ शकल असत न? मग का असा धसमुसळेपणा केला याने? अधीरता समजू शकते मी .. पण बायकोच्या त्रासापेक्षा याला याची भूक शमवन जास्त गरजेचं होत का? लग्न म्हणजे स्त्रीच शरीर तिच्या त्रासाची परवा न करता ओरबाडणे असा होतो का? समाजात असच चालत का सगळं,? लग्न म्हणजे समाजमान्य बलात्काराचं प्रमाणपत्र असत का पुरुषांना मिळालेलं? “……….. या सर्व प्रश्नांनी कल्लोळ माजवला होता शिवानीच्या डोक्यात…

” हे असच होत राहिल तर ? याला कधी माझ्या या विषयीच्या भावना आणि गरजा कळल्याच नाहीतर? मग मी फक्त याच्या उपभोगाची वस्तू बनून राहायचं का?”एक एक प्रश्न तिच्या डोक्यात येत होते..

बरेच प्रश्न आणि त्यामुळे तीच धुमसत असलेलं मन यामुळे तिने तब्येत बरी नसल्याचं सांगून हनिमून वरुन परत येण्याचं ठरवलं… आणि माहेरी जाऊन जरा शांतपणे विचार करून निर्णय घ्यावा म्हणून शिवानी माहेरी जायचं म्हणतं होती… या रागामुळे तीच वागणं बदललेलं होत.. जे सासरच्यांचा लक्षात आल होत.

लग्न-हनीमूनच्या निमित्ताने आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवायला मिळणा-या आनंदाच्या लाटांसोबत नातेसंबंधांची जी आव्हानं येतात, ती कशी हाताळायची हे माहित नसल्यामुळे नवी जोडपी गोंधळतात. मनमोकळ्या संवादाच्या अभावामुळे त्यांची मानसिक घालमेल होते आणि मग शिवानी सारख्या नववधूला विचार येतो आता काय करावं.. सोडावं की याच्यासोबत राहावं.? समाज काय म्हणेल याची भीती जास्त असते स्त्रियांना.

लग्नानंतरच्या नात्यात नवरा-बायकोमधील शरीर संबंधांचं महत्व अनन्यसाधारण आहेच, ते नाकारून चालणार नाही.
नवरा -बायकोच हे मिलन ही एक अत्यंत खासगी, नाजूक, संवेदनशील बाब आहे. तरी तिच्या पलीकडेही भावभावनांचं, सुखदु:खाचं, कौटुंबिक नातेसंबंधांचा, जबाबदारीचं एक खूप मोठं आव्हान असत नवीन जोडप्यानं (कपल )समोर…

ते आव्हान एक जोडपं म्हणून एकत्रितपणे पेलायचं असेल तर नवरा-बायकोंमध्ये सर्वात आधी भावनिक जवळीक निर्माण व्हायला हवी. भावनिक जवळीक आणि मनाचा मोकळेपणा नात्यात निर्माण झाल्याशिवाय लग्न- हनीमून करणं हेच मुळी आजच्या जमान्यात चुकीचं आहे. जिथे लिव्ह इन रिलेशन ची पद्धत रूढ होतेय, समलैगिंग लग्नाला मान्यता मिळतेय अशा खुल्या समाजव्यवस्थेत.. मूल-मुलीनी या विषयावर बोलायला हवं.. लग्ना आधी नाहीतर लग्नानंतर तरी या मिलनाविषयीच्या एकमेकांच्या भावना ऐकून, समजून घ्यायला हव्या.. नात्याला खुलू द्यावं, हळूहळू आणि नंतर मिलनाचा विचार करावा..

एक उदाहरणं देते… मला एका वाचकांनी मॅसेंजर वर msg करून सांगितलं हे.. म्हणून विशेष नमूद करतेय…  पुरुषांच्या धसमुसळेपणा मुळे.. हनिमूनला गेल्यावर… त्या मुलीला पहिल्याच रात्री तेथील दवाखान्यात ऍडमिट करावं लागल… ब्लीडींग बंदच होत नव्हतं म्हणून.

 

दुसरं उदाहरण… “लग्नानंतरच्या पहिल्यारात्री पत्नीशी अनैसर्गिक संबंध प्रस्थपित केले म्हणून पत्नीची घटस्फोटाची मागणी ” ही बातमी मी स्वतः ऐकलेली आहे न्यूज चॅनल वर…

तिसरं उदाहरण… “हनिमूनला गेल्यावर पतीचा धसमुसळेपणा आणि आक्रमकता आणि यामुळे तिला होणाऱ्या “त्रासाकडे दुर्लक्ष करणारा नवरा..” यामुळे हनिमून अर्ध्यावर सोडून परत येउन घटस्फोटाची मागणी करणारी पत्नी ” ही पण न्यूज मी वाचली आहे…

या बातम्यांवरून मला लिहावंसं वाटल “लग्नानंतरची अधीरता ” हा लेख..

यात तीन भाग यासाठी केले.. लग्नाआधीचे पार्श्वभूमी कळावी.. भाग दुसऱ्या मधे.. शिवानी म्हणजेच मुलीच्या मिलनाविषयीच्या कल्पना मांडल्या आहे. कदाचित प्रत्येक मुलीच्या असतील त्याच भावना. चंद्राच उदाहरण देऊन.

तरीही मिलनानंतर अधीरता संपवून झोपलेला प्रणव आणि तळमळत असलेली शिवानी म्हणजे, वरील मी जी तीन उदाहरण दिले त्यातील मुलीच्या मानाची घालमेल दर्शवते.

बऱ्याच जणांना हा लेख अतिशोयोक्ती वाटेल.. पण हे असं होत हे मला देखील न्यूज मधूनच कळलं.. त्या मुली खंबीर होत्या म्हणून जनावरांसारखं आयुष्य जगत बसल्या पेक्षा त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.. मुलीनी घटस्फोट घ्या असं सांगत नाही आहे मी. तर बोलून व्यक्त व्हा.. तुमच्या भावना जोडीदारापर्यंत पोहचवा स्पष्ट रित्या. आणि मिलनाची गरज दोघांनाही असते. त्यामुळे एकमेकांचा विचार करून जर मिलन केल..तर  प्रेम कलाकलाने खुलत जाईल.. आणि नात बहरत जाईल

आणि पहिल्या मॅसेंजर वर आलेला वाचकाचा मॅसेज मधली मुलगी, असच असत लग्नानंतर असं समजून अजूनही नवऱ्यासोबत आहे.. घटस्फोट घ्या असं सांगत नाहीच आहे मी.. फक्त नात्याला वेळ द्या बहरायला, हळूहळू फुलू द्या… आणि मनाच्या तारा जुळल्या की बघा नात कस बहरत जात…

नात्यात भावनांचे बंध असले तर मनाच्या तारा जुळतात आणि एकदाच्या मनाच्या तारा जुळल्या की मग “मिलन अधुर नाही ” तर पूर्ण होत.. “मुझे हक है ” असं म्हणतं..

पण त्यातही बायकोच्या मानाची घालमेल समजणाऱ्या पुरुषांना “हक है ” कारण लग्न फक्त दोघांचं नाही तर दोन कुटुंबांच होत असते… त्यामुळे आधी समजून घ्या एकमेकांना… तुमचं नात तुटलं तर दोन कुटुंब देखील विखुरतात… त्यामुळे आधी मनाच्या तारा जुळवा, भावनिक बंध निर्माण करा आणि नंतर….. ?….(कळलंच असेल )

लग्नानंतरची अधीरता सुफळ संपूर्ण ?

याविषयावर लिहिण्याच पहिल्यांदा धाडस केल… मी.

प्रयत्न सफल होईल अशी आशा ठेवते. वाचकहो तुम्हाला भाग पहिला खुप आवडला… भरभरून प्रतिसाद दिला तुम्ही… हा लेख भागात टाकण्यामुळे बऱ्याच वाचकांना त्रास झाला त्यांची माफी मागते. पण शेवटचा भाग वाचल्यावर तुम्ही समजून घ्याल मी असं का केल…  अशी आशा करते..

Akshita.. “)या वाचिकेची एक कमेंट आली ती या लेखात नमूद करावीशी वाटते… ती अशी.. -“बऱ्याच नवऱ्यांना, बायकोचा  होणारा त्रास माहिती नसतो… तेंव्हा मुलीनी स्वतःचं त्यांना सांगाव, सांगूनही जर नवरा ऐकत नसेल तर वेगळं व्हावं (घटस्फोट ).पण न सांगता आपला त्रास नवरा समजुन घेईल अशी अपेक्षा ठेऊ नये. ज्यांच्यासोबत लग्न होणार आहे किंवा झालं आहे त्याच्याशी सविस्तर बोलायला काहीच हरकत नाही. असं लग्नानंतर घडू नये म्हणून लग्नाआधी मुलगा -मुलगी यांचं “शारीरिक संबंध ” यावर समुपदेशन केल जाते. त्यामुळे मिलनातील अधीरता आणि मिलनानंतर होणाऱ्या त्रासाची कल्पना मुलांना असते आणि ते नात्याला स्पेस देतात बहरायला.. ”

मी ती कमेंट कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न केला पण झाली नाही.. त्यामुळे माझ्या शब्दात ती कमेंट वरील प्रमाणे होती आणि योग्य देखील. धन्यवाद Akshita जी ?

मुलगा – मुलगी यांनी लग्नाआधी या विषयावर बोलणे गरजेचे आहे. नाहीतर समुपदेशन करून घ्यावे..

लेख आवडल्यास like, कमेंट करा, आणि शेअर करायचा असेल तर नावासहित करा.., ©जयश्री कन्हेरे -सातपुते. वाचण्यासाठी धन्यवाद ?माझे इतर लेख वाचण्यासाठी मला फॉलो नक्की करा..

फोटो साभार गुगल ?

Comments

  • खुप छान लेख लग्नानंतरची अधीरता. आपण या गोष्टीचा विचार पण नाही करत असे का होते म्हणून. खुप छान प्रकारे त्या मुलीच्या भावना तू व्यक्त केल्या

    Triveni 12th सप्टेंबर 2019 8:54 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा