लग्नानंतरचे प्रेम भाग चौथा

Written by

लग्नानंतरचे प्रेम भाग तिसरा

अभीचे मित्र अभीला लग्नाच्या पार्टीबद्दल सारखे विचारू लागले होते. आज अभी त्याच्या मित्रांना पार्टी देणार होता.
तो त्याच्या आईला फोन करून म्हणाला, “आई अगं माझे मित्र पार्टी मागत आहेत म्हणून आज मी त्यांना पार्टी देणार आहे.”
“ठीक आहे. पण घरी लवकर ये” आई.
अभी “ठीक आहे” असे म्हणतो.
संध्याकाळी जेवण झाले आणि सगळं आवरून झाल्यावर अभीच्या आई आणि प्रिया दोघीजणी अभीची वाट बघत थांबलेले असतात. रात्रीचे अकरा वाजतात. अभी अजून आलेला नसतो.
प्रिया अभीच्या आईला म्हणते “आई तुम्ही झोपा आता. मी आहे. हे आल्यानंतर मी दार उघडते.”
मग अभीची आई “ठिक आहे.” असे म्हणून झोपायला जाते. रात्रीचे बारा वाजतात. मग अभी येतो. अभीचा मित्र त्याला दारात सोडतो आणि निघून जातो. अभी खूप दारू प्यायलेला असतो. तसा तो कधीही दारू पीत नाही परंतु त्याला मित्रांनी जबरदस्तीने कोल्ड्रिंगमध्ये दारू मिक्स करून पाजली होती असं तो सोडायला आलेला मित्र सांगून लगेच निघून गेला.
मग प्रिया कशीबशी अभिला रूम मध्ये घेऊन गेली. तिने त्याचे कपडे बदलले. कपडे बदलून त्याला बेडवर झोपवणार इतक्यात तिचा तोल गेला आणि ती अभीच्या अंगावर पडली. मग ती स्वतःला सावरून उठत असताना तिची ओढणी अभिच्या खाली अडकली होती. ओढणी हळूच ओढून घेत असताना अभीने तिला जवळ ओढले आणि तो तिला मिठीत घेऊन झोपला. कारण तो दारूच्या नशेत होता. प्रिया तर त्याच्याकडे एकटक बघत झोपली. तिच्या अंगावर एकदम शहारे आले.
ती म्हणाली “हा वाटतो तितका भांडखोर नाही, आणि वाटतो तसा तर अजिबातच नाही. हा खूप चांगला आहे. परंतु ती श्रेया याचा गैरफायदा घेत आहे. ती चांगली मुलगी नाही हे त्याला कधी कळणार?” या विचारातच तिला कधी झोप लागली हे तिचं तिला हे कळले नाही.
सकाळ झाली प्रिया फ्रेश होऊन खाली गेली. अभी उठला पण त्याच्या डोक्यात सतत जडपणा वाटत होतं.
इतक्यात त्याला मित्राचा फोन आला “काय साहेब कुठला काय? काय कालची उतरली नाही अजून?”
अभी आश्चर्याने “काय? काल मी दारू प्यायलो होतो?”
अभिचा मित्र “होय, अरे काल आम्ही तुला कोल्ड्रिंगमध्ये दारू मिक्स करून पाजली होती.”
अभी आता घाबरून “मेलो आता आजी आई ओरडणार. त्यांना माहिती झालं असणार.” म्हणून फ्रेश होऊन घाबरतच तो खाली येतो.
खाली आल्यानंतर अभीची आई अभिला विचारते “काय झालं बाळा डोकं दुखतय का? तब्येत बरी नाहीये का?” आई असे विचारताना तो आणखीनच घाबरतो.
“काही नाही आई” इतकच बोलतो. परंतु कोणीच ओरडत नाही. “रात्री किती वाजता आलास? मी झोपी गेले. प्रिया तुझी वाट बघत थांबली होती. जरा लवकर येत जा ना रे बाळा.” अभीची आई.
अभी सुस्कारा सोडत “म्हणजे कुणाला माहीत नाही” असे मनात म्हणाला.
मग तो मनात पुन्हा विचार करू लागला की ‘प्रियाने घरी का सांगितलं नसेल? ही तर लगेच सांगणार. मला ओरडा कसा बसेल इतकच तर पाहिजे असते तिला आणि कस काय सांगितले नाही?’
मग तो कोणीही नसताना प्रियाकडे गेला आणि तिला “थँक्स” म्हणाला प्रिया म्हणाली “कशाबद्दल” तर
“काल तु जे घडलं ते घरी सांगितलं नाहीस म्हणून”
“मी सांगितलं नाही कारण घरच्यांना टेन्शन नको म्हणून. पण तुझं कालच मला अजिबात आवडले नाही.”
“अगं मला पण कळालं नव्हतं ते कोल्ड्रिंगबरोबर….” असे तो म्हणणार इतक्यात “ठीक आहे” असे प्रिया म्हणाली.
“हा पण या उपकाराची परतफेड मी नक्कीच करणार” अभी.
प्रिया “काही गरज नाही.”
अभी म्हणतो “बरं फ्रेंड्स आपण नवरा-बायको नाही पण चांगले मित्र बनू शकतो. मला तुला गमवायचं नाहीये. त्यामुळे आपण आयुष्यभर एक चांगले मित्र म्हणून राहू. तुला चालेल.”
प्रिया “हो” म्हणाली

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.