लग्नानंतरचे प्रेम भाग तिसरा

Written by

लग्नानंतरचे प्रेम भाग दुसरा

अभी आणि प्रिया भेटतात. त्या दोघांच ठरत. अभी म्हणतो, “लग्नाच्या आदल्या दिवशी आपण काॅन्ट्रॅक्ट करूया. तुला याव लागेल. पत्ता तुला मेसेज करतो.”
प्रिया, “बरं” म्हणते.
दोघे जाणार इतक्यात अभी, “हॅलो मॅडम तुझा मोबाईल नंबर दे की.”
प्रिया, “ओ साॅरी.” म्हणून नंबर देते आणि अभीला मेसेज करायला सांगते. मग दोघेही निघून जातात.
लग्नाच्या आदल्या दिवशी अभी, श्रेया आणि मानसी काॅन्ट्रॅक्टच्या ठिकाणी पोहोचतात. प्रिया अजून आली नव्हती.
श्रेया, “अभी ती येणार आहे ना. की ऐनवेळी पळ काढणार? बघ बाबा नाही तर तुला संपूर्ण आयुष्य तिच्यासोबत घालवावे लागेल.”
अभी, “ती येणार.”
इतक्यात प्रिया येते. तिला बघून श्रेया आणि मानसी तोंड फिरवतात.
अभी, “यायला उशीर का झाला?”
प्रिया, “आई पाठवतच नव्हती. कशीबशी परवानगी मिळाली.”
अभी, “बरं चला आता.”
दोघांनी एक वर्षांच्या काॅन्ट्रॅक्टमध्ये सह्या केल्या. श्रेया, “चला आता आपण पार्टी करूया.”
अभी, “ओके” म्हणाला. सगळे जात असताना अभी मागे वळून प्रियाला म्हणतो, “चल ना तू पण.”
प्रिया, “नको मला काम आहे. तुम्ही जा.” मग सगळे पार्टी करायला गेले आणि प्रिया घरी गेली.
अखेर तो दिवस उजाडला. आज प्रिया आणि अभीच लग्न. लग्न अगदी साध्या पद्धतीने झालं. कारण अभीच्या आजीची तब्बेत बरी नसते म्हणून खूप पाहूणे सांगितले नाहीत.
लग्न झाले आणि प्रियाने माप ओलांडून घरात प्रवेश केला. घरात जे मोजके पाहुणे होते तेही आता गेले. राञ झाली अभीची आई प्रियाला म्हणाली, “हे बघ अभीची रूम वरती आहे. जा झोप जा.”
प्रिया, “मी खाली झोपले तर चालणार नाही का?”
आई, “अगं आता तुमचं लग्न झालं आहे तेव्हा तुम्ही एकञच झोपायचं.”
प्रिया, “बरं” म्हणते.
प्रिया रूममध्ये जाते तेथे कोणीच नसत. मग ती मनात, “तो यायच्या आधी मी झोपी जाते.” म्हणून ती बेडवर झोपते. अभी येतो आणि त्याला प्रिया बेडवर झोपलेली दिसते. मग तो मनात, “हिची हिम्मत कशी झाली माझ्या बेडवर झोपण्याची?” असे म्हणून तो तिला उठवू लागला. ती मुद्दाम तसेच झोपून राहिली. अभीने मग एक ग्लास भरून पाणी घेतले आणि तिच्या तोंडावर फेकले. ती उठून बसली.
प्रिया, “काय आहे.”
अभी, “हा बेड माझा आहे.”
प्रिया, “मग”
अभी, “मग काय ऊठ.”
प्रिया, “नाही.”
अभी, “माझ्या जवळ झोपायची हौस आहे. मग रात्री काही अभद्र घडलं तर मला माहित नाही.”
प्रिया रागाने अंथरूण घेऊन खाली झोपते. पण तिच्या मनात आपणसुद्धा त्याच्या तोंडावर पाणी फेकणार हे पक्के करून ती झोपली.
दुसर्या दिवशी प्रिया अभीला बघते तो बसलेला असतो. मग ती एका जग मध्ये पाणी घेऊन जाते आणि पडल्याची अॅक्टिंग करत अभीच्या तोंडावर सगळयांच्या समोर पाणी फेकते. अभी रागाने ओरडतो, “तुला अक्कल आहे की नाही?” प्रिया खाली पडलेली असते. अर्थात तेही अॅक्टिंगच असत. अभीची आई, आजी घाबरून प्रियाला उठवण्यासाठी येतात.
आजी, “अरे ओरडतोस काय? पडली की बिचारी. लागल काय बाळ तुला?”
प्रिया, “इतकं नाही थोडसं लागल. पाय घसरला.” असे म्हणून ती अभीकडे बघून हळूच हसली. अभीला समजले की हीने मुद्दाम केलं आहे. तो मनात म्हणतो, “ही दिसते तितकी साधी नाही. हिच्यापासून जरा जपूनच रहावे लागेल.”

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.