लग्नानंतरचे प्रेम भाग पाचवा

Written by

लग्नानंतरचे प्रेम भाग पहिला

भाग पहिला

लग्नानंतरचे प्रेम भाग दुसरा भाग दुसरा

भाग तिसरा

लग्नानंतरचे प्रेम भाग तिसरा

भाग चौथा

लग्नानंतरचे प्रेम भाग चौथा

अभीची आजी प्रियाला बोलावून घेते. प्रिया, “आजी तुम्ही बोलावलंत?”
आजी, “हो ये बाळा”
प्रिया, “काय आजी, माझं काही चुकलं का?”
आजी, “अगं नाही ग. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं.”
प्रिया, “हा बोला ना आजी.”
आजी, “तुझ्यात आणि अभीच्यात सगळं ठिक आहे ना.”
प्रिया, “हो आजी पण तुम्ही असे का विचारता?”
आजी, “अगं नविन लग्न तुमचं पण मला तसं काही वाटतंच नाही. तुम्ही हनिमूनला सुध्दा गेला नाहीत. तुमचं जास्त बोलन पण होत नाही म्हणून विचारले.”
प्रिया, “तस काही नाही आजी.”
आजी, “तस काही असेल तर सांग. अगं ती मानसीची मैत्रीण आहे ना श्रेया ती याच्या मागे लागली होती. मग मीच अभीच्या मागे लग्नासाठी लागले. मग तो तयार झाला. ती मुलगी चांगली नाही. तू अभीला सांभाळून घेशील ना?”
“हो आजी” प्रिया म्हणाली.
आजी “तू साधी समंजस आहेस म्हणून तर मी तुला अभीसाठी पसंत केलं.”
प्रिया “बरं आजी मी येऊ?”
आजी “हा ये पण मला एक वचन दे की काहीही झाले तरी तू अभीची साथ सोडणार नाहीस.”
प्रिया “बरं आजी”
नंतर प्रिया आपल्या खोलीत जाते. अभी खोलीमध्येच बसलेला असतो.
प्रिया अभीला म्हणते “तुझ्यामुळे मला आज सगळ्यांशी खोटं बोलायला लागत आहे. ”
अभी म्हणतो “का? काय झालं”
“आजी मला विचारत होत्या तुम्ही नवरा-बायकोसारखे वागत नाही आहात.” प्रिया.
“मग तू काय म्हणालीस?” अभी.
प्रिया “मी काय म्हणणार. तसं काही नाही म्हणून म्हणाले.”
अभीला हुश्श झाले.
“असे किती दिवस आपण लपवून ठेवणार आहोत? मला असं खोटं बोलायला आवडत नाही.” प्रिया.
अभी म्हणतो “एक वर्षाचा कॉन्टॅक्ट आहे आपला. एका वर्षानंतर तू मोकळी आहेस. बाकी सगळं माझं मी सांभाळून घेतो.”
“ठीक आहे” असे प्रिया म्हणते खरी. परंतु बाकीचे सगळे तिचे खूप लाड करत असतात. प्रिया अभीच्या आईला कामात मदत करत असते. तशी तिला आधीपासूनच कामाची सवय असते. ती आजीची सेवा पण अगदी चांगल्या प्रकारे करत असते. त्यामुळे आजी आणि आई तिचे खूप लाड करत असतात. आपण या दोघींना फसवत तर नाही ना अशी तिची अपराधीपणाची भावना होत असते.
प्रियाची आई प्रियाला फोन करून बोलावून घेते. कारण लग्न झाल्यापासून प्रिया एकदाही माहेरी गेलेली नसते. प्रिया माहेरी गेल्यानंतर जेवण वगैरे आटोपल्यावर प्रियाची आई प्रियाला म्हणते “प्रिया काही अडचण आहे का?”
प्रिया म्हणते “नाही तू असं का विचारत आहेस?”
प्रियाची आई “अगं नवीन लग्न झालेल्या मुली आपल्या सासर बद्दल किती काही सांगत असतात. पण तू काही सांगतच नाही. नवऱ्याबद्दल तर अजिबातच सांगत नाहीस म्हणून विचारले.” प्रिया “अगं आई तसं काही नाही.”
प्रियाची आई “हे बघ पियू लग्न झाले की मुलीला तिचं सासर हेच प्रेमाचे असतं. मुलीला ज्या घरी दिले जाते त्याच घरी तिला आयुष्य काढावे लागते. त्यामुळे काही अडचण असल्यास तू आम्हाला नक्की सांग.
प्रियाला आता खूप वाईट वाटू लागते. आपण खोटे बोलून कॉन्टॅक्ट वर सही केली. आपण अभीची काळजी घेऊ अस आजीला वचनही दिलेला आहे. तो काही वाईट मुलगा नाही पण तो श्रेयावर प्रेम करतो आणि ती याचा फक्त वापर करत आहे हे अभीला कळत नाही. आपण याला त्याच्यातून बाहेर काढू शकतो का? आणि जर मला तो आवडू लागला तरी त्याला मी आवडेन का? असे एक नाही अनेक प्रश्न तिच्या मनात येऊन गेले. आता काय करावं हे तिला कळत नाही.

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.