लग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का? (भाग १)

Written by

“कोमल तू घरी लवकर निघून ये मिराचे सासरचे लग्नाची बोलणी करायला येणार आहेत, घरात खुप काम आहे” म्हणत कोमलच्या नव-याने तीला फोन केला आणि लगेच निघून ये म्हणून सांगितलं.

उत्तरादाखल कोमल तिच्या नव-याला सुमीतला म्हणाली की, “अहो पण इथे माझ्या आईला अॅडमिट केलं आहे आणि तिच्याजवळ थांबायला कोणी नाही बाबा रात्रभर हाॅस्पीटलमधे बसून होते माझ्यासोबतच म्हणून मीच मुद्दाम त्यांना घरी पाठवलंय. जर मी घरी अाले तर ईथे अाईजवळ कोण राहणार”?

हे बघ तू ह्या घरची सून आहेस आता घरचं सगळं तुलाच बघायचंय. तुझ्याच सख्या ननंदचं लग्नाचं चालू आहे म्हणजे तुला तर इथे यावच लागेल ना? आणि आईला सगळं मॅनेज होणार नाही. घरातलं काम कोण करणार , ते लोक आल्यावर त्यांच्या करण्यात काही कमी रहायला नको तू पटकन निघ.

अहो, मला पण सगळं कळतंय, पण तुम्हीही मला समजून घ्या ना, जर मी तिकडे आले तर इथे आईपाशी कोणीच नाही राहणार आणि डाॅक्टरांनी सांगितलंय की, वयोमानामुळे तिचा त्रास बळावला तर लगेच हालचाल करावी लागेल. बाबा जरी आले तरी सगळी धावपळ करणं त्यांना एकट्याला होणार नाही, कोमल म्हणाली.

अच्छा म्हणजे मिराच्या लग्नाचं तुला काहीच वाटत नाहीये आणि इथे माझ्या आईने सगळं कसं करावं ह्याचंही तुला घेणंदेणं नाही का? सुमित जरा आवाज वाढवूनच बोलला.

अहो, तुम्ही रागाला येऊ नका आईंना त्रास होणार याची चांगली सोय मी करते. तुम्हाला सगळं व्यवस्थित व्हावं हेच वाटतंय ना?  तुम्ही काळजी करू नका मी करते काहीतरी पण कोमलचं वाक्य मधेच तोडत सुमित म्हणाला की,

काहीतरी करते म्हणजे?    तुला समजत नाहीये का की, मी काय बोलतोय ते  , तू बाकीचं कशाला बोलते कोमल, मी म्हणतोय ना की, लगेच घरी ये मग ये समजलं का?   इथे सगळंकाही करायला तु हवी आहेस , उगाच बाकीच्या गोष्टी मला नको सांगूस समजलं का?  म्हणत सुमितने फोन ठेवला.

कोमल विचार करू लागली की, नक्की तिचं काय चुकलं? सुमित जराही ऎकायच्या मनस्थितीत नव्हता. आईला बरं नाही म्हणून थोडे दिवस ती माहेरीच राहणार आहे हे सासरकडच्यांना सांगूनही सुमितने अशा प्रकारे आपल्याला समजून न घेणं कोमलला अजिबात पटलं नाही.

लग्न होऊन मुलगी सासरी येते तेंव्हा सासरची सगळी जबाबदारी ती पार पाडतच असते पण ह्याचा अर्थ हा तर होत नाही की, माहेरच्यांच्या बाबतीत तीची सगळी जबाबदारी संपली . खास तर तेंव्हा जेंव्हा मुलगी एकुलती एक असते किंवा त्या घरातला मुलगा तिथली जबाबदारी उचलत नसेल तर ?

कोमल एकुलती एक मुलगी म्हणूनच तिने सासरसोबत माहेरची जबाबदारीही लीलया पेलली होती पण कधीकधी आधी सासर का आधी माहेर या परिस्थितीत अडकायला होतं आणि त्याच परिस्थितीत कोमल आज अडकली होती.

क्रमश:-

©Sunita Choudhari.

(मित्रमैत्रिणींनो आणि माझ्या प्रिय वाचकांनो नमस्कार. लग्न झाल्यावर माहेरची जबाबदारी झटकायची असते का?  मुलगी असलो आणि त्यात लग्न झालं म्हणजे फक्त सासरच्याच लोकांना आधी महत्व देणं कितपत योग्य आहे ?आता कोमल नक्की काय करेल? ती तिच्या आजारी आईला सोडून जाईल का सासरी? का अजून काहीतरी वेगळं करेल नक्की वाचा आपल्या पुढच्या आणि अंतीम भागात)

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा