लग्ना नंतर

Written by

लग्ना नंतर परतलेली मुलगी

का हो इतकी जड होते

आपलं घर समजून ती

घरी परत येते

सासरी झालेल्या जखमांनी

ती व्यथित होते

लग्ना नंतर परतलेली मुलगी

का हो इतकी जड होते

माहेरी आधार मिळेल

म्हणून ती आशा करते

आधार सोडा पण ती

सहानुभूती ला ही पारखी होते

लग्ना नंतर परतलेली मुलगी

का हो इतकी जड होते

बाप नीट बोलत नाही

आई तर दुसरी सासू होते

भाऊ तर विचारात ही नाही

बहिणी साठी गौण होते

लग्ना नंतर परतलेली मुलगी

का हो इतकी जड होते

ज्यांची सेवा करण्यात ती

अर्ध आयुष्य काढते

त्यांच्या कडून अपमानित होऊन

कोपऱ्यात जाऊन रडते

लग्ना नंतर परतलेली मुलगी

का हो इतकी जड होते

कमावत असेल तर जरा बर

पण अपमान चुकत नाही हे खरं

घरात किती राबली तरी

समाधान त्यांचं होत नाही

लग्ना नंतर परतलेली मुलगी

का हो इतकी जड होते

नातेवाईकांची करडी नजर

घाराच्याची बोलणी जहर

स्वतः ला देऊन दिलासा

जळत राहते रात्रं दिवसा

लग्ना नंतर परतलेली मुलगी

का हो इतकी जड होते

आप्तेष्टां ची रूपे पाहून

पुन्हा नवा डाव मांडते

तडजोड करून(दुसऱ्या) लग्नाची

घरातून निघून जाते

लग्ना नंतर परतलेली मुलगी

का हो इतकी जड होते

गेल्यावर एकदा परत फिरून येत नाही

माहेर बद्दल तीच्या मनात प्रेम जरा राहत नाही

आई तक्रार करते माहेर पणाला येत नाही

काही केल्या तिच्या मनातली जखम भरत नाही

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत