लग्न ठरवताना खरं बोला….

Written by

 

@अर्चना अनंत धवड ✍️

डॉ अभिजीत,  सायकॅट्रीस्ट एक नामवंत डाक्टर आपल्या क्लिनिक मध्ये बसले होते. एक आईवडील आपल्या विवाह योग्य मुलीला घेऊन क्लिनिक मध्ये आले.

मागील चार वर्षापासून तिची डॉ.अभिजीत कडे ट्रीटमेंट सुरू होती.वडील म्हणाले डॉक्टर आम्हाला या मुलीच लग्न करायचेआहे………

करू शकतो ना……

करू शकता…… पण मुलाकडील लोकांना सगळ सांगा…. त्यांना अंधारात ठेवू नका…

अहो पण डाक्टर अस कोण तयार होइल……….अस सांगितल तर कुणीच तयार होणार नाही……..

म्हणून काय कुणाला फसवायचे का…… डाक्टर खूप जोरदार ओरडले…….. इतक्या वर्षात त्यांना असं रागावलेले कधीच बघितले नव्हते. डॉक्टर नंतर शांत झाले.. त्यांना म्हणाले, अस अंधारात ठेवून लग्न करून काय फायदा. जर त्यांना माहिती पडल तर…… ते दुसर्‍या दिवशी आणून सोडतील… तीच आयुष्य खराब अणि मुलाचं ही….. . अणि तुमचा लाखो रुपयांचा खर्च वाया……… त्यापेक्षा एखादा गरीब होतकरू मुलगा बघा…… त्याला सर्व परिस्थिती ची कल्पना द्या….. तुमच्या कडे एवढी प्रॉपर्टी आहे मुलीच्या आयुष्याची घडी व्यवस्थित लावून द्या.

अहो पण…. मुलाकडून होकार आलाय…. मुलगा इंजीनियर आहे…. तशीही ती आता ठीक आहे……… डॉक्टर आपल्या खुर्चीतून उठले. खिडकीतून बाहेर पाहू लागले.. एक दीर्घ श्वास घेतला… अणि बोलू लागले…. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती ऐका अणि नंतर काय ते ठरवा……

दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे….. माझे आई वडील माझ्या लग्नासाठी मुलगी शोधत होते. मला एक छोट्या शहरातील  स्थळ सांगून आले. आम्ही मुलगी बघायला गेलो. मुलगी बी. ई. एमबीए. झालेली… दिसायला सुंदर होती. अश्विनी नाव होते. आई वडील उच्चशिक्षित, अणि दोघेही मोठ्या हुद्द्यावर , गडगंज श्रीमंत . आम्हाला मुलगी पसंद पडली. लगेच एंगेजमेंट करण्यात आली. मला मात्र तिचे बघणे थोडे विचित्र वाटायचे. मी आई ला म्हटले….. आई मला मुलगी थोडी वेगळी वाटते…….

वेगळी म्हणजे रे…..

अग ती वेगळीच बघते….. मला काहीतरी प्रॉब्लेम वाटतो…

आई रागवली…. अरे ती तुझी पेशंट नाही. अरे तुझी होणारी बायको आहे….. अस डॉक्टर च्या नजरेने काय बघतोस… प्रियकराच्या नजरेने पहा.. अरे ती मुंबईची नाही… ती लहान शहरातील घरंदाज मुलगी आहे. त्यांच वागणे असेच सौजन्यशील असते.
आई जवळ आली. माझ्या केसातून हात फिरवला अणि म्हणाली असे फालतू विचार डोक्यातून काढून टाक………….

मी तिला फोन करायचो..मी किती… बोलायचो पण ती मात्र हो… नाही…. असच करायची. आई ला सांगितले तर आई आपल एक च लावायची की ती लाजाळू… घरंदाज…. वगैरे… वगैरे……….

लग्न झाले…. लग्नात पण मला तीची वागणूक खटकत होती पण आईला सांगून उपयोग नव्हता.

आमची पहिली रात्र होती ज्याची प्रत्येक युवक युवती आतुरतेने वाट पाहत असते. मी खोलीत गेलो ती बेड वर बाहुली सारखी बसली होती…. मी तिच्या जवळ गेलो.. तिचा हात हातात घेतला… पण काहीही प्रतिक्रिया नाही…. मला शंका यायला लागली.. मी तिला विचारले की हे लग्न तुझ्या मनाविरुद्ध झाले का… पण ती काहीच बोलत नव्हती… तिने माझ्याकडे बघितले.. मला तिच्या डोळ्याची भीतीच वाटली…. मी तिला झोप म्हटले अणि ती शांतपणे झोपी गेली. मला शंका येत होती पण आईचे शब्द आठवत होते…… घरंदाज, लाजाळू वगैरे..  अणि मानसशास्त्रा नुसार काही काही मुली घाबरतात….. त्यांना वेळ द्यायला हवा. मी म्हंटले थकली असेल बिचारी………

दुसर्‍या दिवशी मी तिला आमच क्लिनिक दाखवायला आणले. ती यंत्रवत माझ्यामागे चालत होती. मी कौतुकाने भरभरून क्लिनिक ची माहिती देत होतो… ती मात्र चुप….. एक अक्षर सुद्धा बोलली नाही.

घरी आलो………  जेवणाची वेळ झाली होती. आईनी टेबलावर जेवण लावले. माझा मूड खराब होता. आई म्हणाली…. जा… अश्विनी  ला बोलाव, मी म्हंटल तूच बोलाव. आई अश्विनी  ला बोलवायला गेली. आईने आवाज दिला. तीच लक्ष्य नव्हते. आई जवळ गेली अणि तिच्या खांद्यावर हात ठेवला.ती जोरदार आईवर ओरडली. आईला मारायला धावली. आई जोरदार ओरडली. बाबा अणि मी धावलो. आई सोबत तिची झटापट सुरू होती  आम्हा दोघांना सांभाळत नव्हती. कशीतरी आईची सुटका केली. . मी गाडी काढली अणि हॉस्पिटल मध्ये एडमिट केले. घरी आलो तीच सामान तपासले. तिच्या बॅगमध्ये मानसिक रोगाची औषधि सापडली. तीची बॅग भरली… हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो… तेथूनच तिच्या बाबांना फोन केला.. तिचे बाबा आले.. ते मानायलाच तयार नाही की तिला मानसिक आजार आहे. त्यांना तिची औषधि दाखवली तरी ते आमच्यावर आरोप करीत होते. तुम्हीच माझ्या मुलीला काहीतरी त्रास दिला असेल म्हणुन तिची तब्येत बिघडली. मी त्यांच काहीही ऐकले नाही अणि तिला घरी वापस न्यायला सांगितले. ते तिला घेऊन गेले परंतु पाहून घेण्याची धमकी देऊन गेले.

हुंड्यासाठी छळले म्हणून केस केली. खटला त्यांच्या शहरात  चालविला. मला दर महिन्याला  दोनशे  किलोमीटर वर जावे  लागत होते. दोन वर्ष खटला चालला. मागच्या महिन्यात मी खटला जिंकलो.. काहीही चूक नसताना मला अणि माझ्या परिवाराला किती त्रास झाला……..

त्याांनाही  त्रास झाला…. अणि लाखो रुपए वाया गेले….
तिला एवढा जोरदार अटैक का बर आला माहिती आहे?  लग्न जुळल्या पासून ती प्रचंड तणावात होती………कारण ……आपला आजार यांना माहिती पडला तर………..तिनी चार दिवस औषध घेतलीच नाही. कारण औषधी घेताना कोणाला दिसलो तर……

तुम्ही म्हणता तुमची मुलगी आता ठीक आहे. ती पण ठीकच असेल ना. अन्यथा एवढे शिक्षण ती घेऊ शकली असती का……. तिची तब्येत एवढे खराब होण्याचे कारण….. त्यांनी तिचा आजार लपवून ठेवल्यामुळे तिचा वाढलेला मानसिक तनाव… मला सगळ्यात जास्त राग कशाचा आला माहिती आहे….. त्यांनी माझी फसवणूक केली……….

आता तुम्हीच  ठरवा …. .  अस अंधारात ठेवून लग्न करणे योग्य आहे का……..

ती मुलगी बोलू लागली… सर तुमचे म्हणने बरोबर आहे. आई बाबानी जरी नाही सांगितले तरी मी त्या मुलाला सर्व सांगणार. ती आपल्या बाबाला म्हणाली……..

बाबा….  तुम्ही काळजी करू नका. जो मुलगा सर्व सांगितल्यावर लग्न करायला तयार होइल त्याच्याशीच लग्न करणार. ….

©अर्चना  अनंत धवड….

मुलामुलींचे आई वडील लग्न ठरवताना खोटं बोलतात…. पण का खोटं बोलतात?? तर आपल्या मुलांच्या प्रेमापोटी…. खोटं बोलून लग्न जुळवणे चुकीचेच आहे…

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत