लग्न–स्वतःसाठी की समाजासाठी?

Written by

       प्रिया एका छोट्याश्या खेड्यात राहणारी मुलगी. अतिशय कष्टाळू, जिद्दी   आणि   अभ्यासात  अत्यंत हुशार..  कोणतीही परिस्थिती येईल तरी शिक्षण करणार असा निर्धार केलेली..जिद्द बघून घरातील व्यक्तींनी देखील तिला दहावी नंतर शिकण्याची परवानगी दिली.
आता प्रिया खूप खुश होती पुढे शिकता येईल म्हणून..तिने ठरवले होते  बारावी  नंतर डी एड  बी एड वगैरे करून  आपल्याला शिक्षिकेची नोकरी तरी करता येईल..गावाकडे यापेक्षा दुसरी नोकरीची परवानगी नसायची. अशा प्रकारे तिची अकरावी बारावी होत होती..तिला त्यासाठी बरेच कष्ट होत होते रोज 4 किलोमीटर जाणे आणि येणे असा तिचा दिनक्रम होता .परंतु मनातून जिद्द असेल तर माणूस काहीही करायला तयार होतो असेच प्रियाचे होते.
आज बारावीचा निकालाचा दिवस घरातील सर्व मंडळी खूप खुश होती खास करून तिचे वडील तर खूप कारण त्यांना खात्री होती माझी लेक नक्कीच छान मार्कांनी पास होईल आणि झाले पण तसेच प्रियाला  जवळपास 80 टक्के मिळाले  होते बारावीला.. घरातील काम सांभाळून पायी जाऊन येऊन एवढे मार्क्स मिळवणे म्हणजे नक्कीच सर्वांसाठी गर्वाची गोष्ट होती .आजूबाजूच्या मुली देखील प्रियामुळे प्रेरित होऊन पुढे शिकण्याचे ,कष्ट करण्याचे स्वप्न बघू लागल्या. आता प्रिया ने घरी सांगितले की मी डीएड करणार म्हणजे करणार. आता लेकीची एवडी इच्छा आणि हुशार असतांना तिला नकार तरी कोण देणार.
मग काय तालुक्याच्या ठिकाणी प्रियाचे ऍडमिशन झाले रोज  एक तासाचा प्रवास करून प्रिया कॉलेज ला जाऊ लागली.
असेच दिवसामागून दिवस जात होते.त्यांच्या च गावातील रोहन हा देखील त्याच कॉलेज ला होता तो रोज प्रियाला बघत असे आणि तिच्या मघोमाग कॉलेज ला जात असे ..पण प्रियाला हळू हळू समजत होते कोणीतरी तिच्या मागावर असते पण तिला खात्री करून घाययची होती. आणि झाले असेच एक दिवशी तिने रोहन ला पाठलाग करताना पकडले आणि चांगला जाब विचारला  तेव्हा मात्र तो पुरता गोंधळला त्याला काही समजेना पण त्याने उडवा उडवि चेउत्तर देऊन वेळ मारून नेली.. मात्र तेव्हा पासून प्रियाच्या डोक्यात त्याच्या बद्दल होते.हळू हळू तिचे देखील त्याच्याकडे लक्ष जात.. तिलाही तो बस मध्ये कॉलज मध्ये नसला कीं आवडत नसे. असेच काही दिवस रोहन आलाच नाही तेव्हा मात्र प्रिया बेचैन झाली. तिला स्वतःला समजत नव्हते नक्की काय झाले प्रेम की त्याच्या असण्याची सवय .असेच एक दिवस अचानक रोहन येतांना प्रिया ला दिसला आणि तेव्हा तिचा चेहरा मात्र खुलला.तेव्हा हे कोणापासून लपले नाही. तेव्हा दोघांनाही  खात्री पटली एकमेकांबद्दल.. मग काय हळू हळू बोलणे चालणे वाढले. रोज सोबत जाणे येणे कधी कॉलेज मधून बागेत जाणे फिरणे असा त्यांचा दिनक्रम सुरु होता,आता दोघांनीही एकमेकांना प्रेमाची कबुली दिली होती आणि आयुष्यभर सोबत राहण्याची शपथ घेऊन ते आपल्या शिक्षणाला देखील तेवढ महत्व देऊ लागले. असे करता करता त्याचे डीएड संपत आले त्यांना आता सुट्ट्या लागल्या..त्यामुळे त्यांना भेटण्याचा बोलण्याचा प्रश्न निर्माण झाला मात्र ते जमेल तसा संपर्क करत होते..काहीच दिवसात डीएड चा निकाल दिला आणि दोघेही उत्तम मार्कांनी पास झाले..आता त्यांचे एकच ध्येय होते छान नोकरी मिळवून घरी आपल्या प्रेमा बद्दल सांगून लग्न करण्याचा..
थोडे दिवस गेले रोहन ला तालुक्याच्या ठिकाणी एका शाळेत नोकरी मिळाली आणि प्रियाचे भाग्य तिला देखील मोठ्या शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली..दोघेही खुश झाले आता त्यांना वाटले सर्व मनासारखे होणार ..पण नियतीच्या मनात मात्र वेगळेच होते.
घरी सर्व समजल्यावर खूप विरोध झाला.. सर्वांचा स्वाभिमान दुखावला गेला आम्ही असताना तू तुझं स्वतः लग्नाचा निर्णय घेतला तरी कसा..पण कोणालाही तिच्या भावनांशी घेणं नव्हते.. रोहन ला तर दारातून च हकलण्यात आले ..आता दोघेही खूप दुःखी झाले काय करावे त्यांना काहीच सुचेना.घरच्यांच्या विरोधात जाण्याची इच्छा दोघांचीही नव्हती.एकांतात भेटून दोघेही खूप रडले आणि त्यांनी घरच्यांची मर्जी राखण्याचा निर्णय घेतला जो दोघांसाठी खूप अवघड होता. परंतु गावात आपल्या आई  वडीलांची समाजात इज्जत  राहावी एवडीच त्यांची इच्छा त्यासाठी त्यांनी त्यांच्या प्रेमाचा बळी दिला.
काही दिवसात प्रियाच्या घरच्यांनी तिचा विवाह करण्याचे ठरवले..त्त्यांनी त्याच्या नात्यातील च मुलाशी लग्न ठरवले जो प्रिया पेक्षा कमी शिकलेला आणि ज्याला शिक्षणात काही रस नाही असा ..आता मात्र प्रिया अत्यंत चिडली आणि घरी तिने बोलावून दाखवले पण घरच्यांनी तिलाच सुनावले कारण त्यांचे म्हणणे होते आम्ही खूप आधी पासून हे ठरवले होते आता आम्ही शब्द मागे घेऊ शकत नाही पाहिजे असेल तर तू तुझी नोकरी सोड आता मात्र प्रिया निशब्द झाली. जिथे तिला तिच्या आयुष्याच्या निर्णयात काहीच बोलण्याची मुभा नव्हती ..निवडीचा अधिकार नव्हता . ती खूप रडली. एक मन वाटले तिला सर्व सोडून जावे रोहन कडे परंतु समाज घर सर्व आठवून ती शांत झाली आणि आहे त्याला सामोरे जायचे तिने ठरवले..अशा प्रकारे एकेक दिवस जात होता आणि प्रियाच्या लग्नाची तारीख जवळ येत होती.
अखेर तो दिवस आला त्या दिवशी प्रिया सर्व स्वतःच दुःख विसरून घरच्यानसाठी तयार झाली..  नवरीच्या रुपात प्रिया अतिशय सुंदर अशी दिसत होती .. अजून पण तिचा नवऱ्या मुलाशी खूप ओळख किंवा संभाषण नव्हते झालेलं पण तिने सर्व ठीक असेल अशी आशा ठेऊन मन कणखर केले.. लग्नाचा दिवस व्यवस्थित पार पडला आणि प्रिया आपल्या सासरी गेली तिला रोहन ची खूप आठवण येत होती आणि इकडे रोहनची अवस्था काही वेगळी नव्हती.पण त्यांनी आता आहे तसे स्वीकारून पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
प्रियाचे सासर तसे श्रीमंत मोठे घर नोकर चाकर ..प्रथम दर्शनी हेवा वाटावा असे सर्व वाटत होते . तिने पण सर्व आहे ते आपली माणसे असे समजून आयुष्याला नवीन सुरवात केली. तिचा नवरा विजय तसा अबोल च होता . हळू हळू ते संसारात रुळत होते एकमेकांना समजून घेत पुढे चालले होते. नवीन नवीन सर्व छान असेच होते त्यामुळे प्रिया आपलं दुःख बाजूला ठेऊन संसारात एकेक पाऊल टाकत होती.
आता मात्र घरच्यांच्या अपेक्षा वाढत चालला होत्या . नोकरी घर असे एक काहीतरी निवड असे देखील तिला सांगण्यात आले. अशा वेळी तिच्या नवऱ्याने देखील तिला साथ दिली नाही उलटपक्षी तिच्यावर संशय घेणे ,शाळेत कोणाशी बोलले तर त्रास देणे असे प्रकार सुरू केले .तिचा सर्व पगार सासरी त्यानां भेटत असे तिला रोज तिला लागतील असे पैसे त्यांच्याकडून मागावे लागत .अश्या प्रकारे तिचे एकेक स्वातंत्र्य कमी होत गेले तिला खूप बळजबरी करण्यात आली नोकरी सोडण्याची पण ती मात्र ठाम राहिली..यामुळे घरच्यांकडून तिला अधिक त्रास होऊ लागला.. इकडे प्रिया नशिबाला दोष देत रडत असायची..घरी सांगावे तरी कोणत्या तोंडाने म्हणून ती काही दिवस गप्प राहिली..आता मात्र तिला रोहन ची खूप आठवण येऊ लागली.त्याचा समजदार स्वभाव त्याचे विचार सर्व आठवू लागले.पण घरच्यांसाठी समाजासाठी तिने तिच्या आयुष्याची होळी केली होती. असेच काही दिवस त्रास सुरू राहिल्याने नाईलाजाने तिला घरी सांगावे लागले आता मात्र घरचे तिच्या बाजूने आले.सर्वांना ऐकून दुःख आणि प्रचंड चीड आली. आता घरच्यांनी ठरवले काही झाले तरी प्रियाला सासरी पाठवायचे नाही . कोर्टात केस दाखल झाली अनेक दिवस गेले काही दिवसांनी तिचा घटस्फोट झाला . या सर्व मध्ये तिने तिच्या आयुष्याचे कितीक वर्ष दुःखात घातले ते पण फक्त घरच्या लोकांसाठी समाजासाठी.
आता मात्र ती प्रचंड चिडलेली होती .. तिची रोहन शी भेट झाली रोहन अजून पण अविवाहित होता ते म्हणजे फक्त प्रियाच्या दुःखात . त्याची भेट झाली दोघे खूप रडले आणि त्यांनी ठरवले काही झाले तरी आता साथ सोडायची नाही,..
प्रिया च्या घरी देखील नकार द्यायला कारण नव्हते कारण त्त्यांनी त्याच्या इज्जती साठी तिच्या आयुष्याची केलेली होळी आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहणारी होती. अशाप्रकारे काही दिवस गेले आणि प्रिया व रोहन चे लग्न अतिशय थाटामाटात लावून देण्यात आले,. त्या दिवशी प्रिया अधिक सुंदर दिसत होती आणि स्वताला खूप नशीबवान समजत होती आणि इकडे रोहन आणि त्याचे कुटुंबीय देखील अतिशय आनंदात होते. कारण त्यांनीं कित्येक दिवस त्यांच्या मुलाला हसतंना बघितले नव्हते.. अश्या प्रकारे दोघे हि विवाहाच्या बंधनात अडकले ते कायम साठी आनंदी राहण्यासाठी .. आणि दोघेही सुखाचा संसार करू लागले राजा राणी सारखा.

(टीप-कथा काल्पनिक असून वास्तवाशी संबंध आढळल्यास योगायोग समजावा.)

तात्पर्य– केवळ आपल्या समाजातील माना साठी प्रतिष्ठे साठी काही माहिती न काढता योग्य नसलेल्या अश्या व्यक्ती सोबत लग्न लावून त्यांच्या आयुश्याची होळी करू नका

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत