लग्न..

Written by

काही दिवसांपूर्वी एका लग्नाला जायचा योग आला. तिथे नवर्‍या मुलीच्या खोलीत जमलेल्या आया-बाया आणि अनुभवी ताया तिला उपदेशाचे डोस पाजत होत्या. ‘सगळ्यांशी जमवून घे.’ ‘नीट वाग’ , ‘ तिथे नाही चालणार हे लाड’ , ‘adjustment काय ती आपणच करायची ग बाई’, ‘नोकरी करतेस ठीक आहे पण म्हणून घरात दुर्लक्ष नको’ इत्यादी इत्यादी…??
मनात आलं की हे सगळं ठीक आहे… पण असंच काहीतरी आत्ता कुणी त्या ‘नवर्‍या मुलाला’ही सांगितले असेल का???
तर उत्तर मिळाले नाही. पण आता वाटतंय की त्यालाही कुणीतरी सांगितले पाहिजे की ” बाबारे आज लग्न करून नवीन मुलगी घरात येतेय. तिला जप. आपल्या प्रियजनांना सोडून तुझ्यासाठी ती येतेय. कदाचित वेळ लागेल तिला adjust व्हायला, समजून घे. ती पण नोकरी करते, दमून भागून येईल ती . . तेव्हा थोडी मदत तू ही कर तिला, खूष हेईल ती…☺☺ . जसे तुला वाटतंय की तिने तुझ्या घराला आणि घरातल्यांना आपलंस करावे, तू ही तिच्या घरातला होऊन जा…. सुरेख, सुरेल आणि सुखी संसार करा…”
खरंच असा विचार प्रत्येकाने केला, तर लग्नानंतरचा हा प्रवास खूप सुखकारक होईल. ☺

मैत्रेयी दीक्षित-समेळ.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत