लटका राग

Written by

लटका राग

हल्ली तुला लटका राग
जरा जास्तच येऊ लागलाय
तुला चिडवताना माझ्या
खोड्यांना अजून रंग चढलाय

तुझ्या मागेपुढे भिरभिरत
तुला मनवण्यात मी व्यस्त
कधी कळलं तुला रे हे
मनवून घेण्याचं सुख मस्त

माझ्या मेसेजेसची वाट
चातकासारखी पाहतोस
मग का बरं वेड्या राजा
तु असा उगाचच रुसतोस

गालावरच्या पुऱ्यांची हवा
सांग कशी बरं काढावी
की हलकेच टेकवून ओठ
गालांचीही फिरकी घ्यावी

आता हसलास ना मनात
गोड हसू गालात आणून
अरे ही सुद्धा खोडी समज
तुझ्या आनंदित मनातून

सौ. वर्षा विशाल ठुकरुल
Velvet Kavisha

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा