लपंडाव

Written by

1…2…3…4…5…6…7…8…9…
10…
आले मी..कुठेत सगळे…..
मैत्रिणीचा आवाज..
आणि ती पटकन फ्रॉक सावरत त्या बंद पडलेल्या कार च्या मागे जावून लपली ..
हळूच दोन्ही हातांच्या करंगळी वाल्या कडा काचेवर टेकवून त्यामधून पलिकडे बघतानच कॉलनीतली लाईट गुडूप झाली नि ही घाबरलीच..पटकन घरी पळणार तेवढ्यात पाठी वर एक हात जाणवला..दचकून मागे वळली तर समोरचा टिनू दादा पाठी उभा.. दादाला पाहुन जरा जिवात जिव आला .. अंधाराची फार भिती वाटायची तिला.. दादा म्हणाला पण – “अगं घाबरु नको निशू मी आहे ना..”अस म्हणून पाठीवर हात फिरवायला लागला.. मग केसात ही ..
लहान होती पण आता हे काहितरी खराब आहे हे नक्कीच समजत होतं.. उगाच कसंतरी विचित्र वाटत होतं..
आणी त्याचा हात तिच्या फ्रॉक च्या चेन जवळ गेला.. आता जास्तच भिती वाटायला लागली..
“सोड दादा मी आता जाते..”
“अग कुठे जातेस थांब जरा..”
नाही दादा नको..
तरी दादा सोडेच ना..
तिच्या फ्रॉक ची चेन एका झटक्यात काढली गेली..तेव्हा मात्र
जाणवलं..काहितरी खुप किळसवाणं ..
ओंगळवाणं..
ती त्याला जोराचा हिसका देऊन निसटली.. अंधारात कुणी बघण्या आधी पटकन चेन वर चढवली .. रडत रडत घरी गेली म्हणून आईने विचारल .. सगळं सांगितल्यावर आईने हिच्याच पाठीत धपाटा घातला.. कशाला गं जायचं असतं तुला बाहेर खेळायला..पोरीनेच आपलं आपल्याला सांभाळावं बाई…असं काही काही बोलत होती आई..सगळं काही कळालं नाही पण बाहेर जाउन खेळायचं नाही हे समजलं.. बाकी मैत्रिणी खेळल्या तरी ही मात्र लपंडाव खेळायच म्हटलं की घरात लपून बसायची..
कितीही वाटलं तरी त्या दिवसाच्या त्या आठवणी पुसुन टाकणं अशक्य होत होतं..
हळू हळू मोठी झाली..
लग्न ही झालं..
ज्या गोष्टीचं दडपण होतं.तिच आता समोर आली.. लग्न ठरल्यानंतर खूप कमी वेळ असल्याने नवर्र्याशी जास्त बोलणं पण नाही झालं..
लक्ष्मीच्या पावलांनी तिने घरात प्रवेश केला..
धडधडत्या हृदयाने तिने त्यांच्या खोलीत पाऊल टाकलं.. पूर्ण खोली मंद मेणबत्यांच्या उजेडात..आणी निशिगन्धाच्या सुगंधात सजली होती..
वातावरण अगदी मंत्रमुग्ध करणारं असलं तरी तिला भिती पुढची होती..
ती आठवण.. तो स्पर्श..पुसट झालेला असला तरी मनात कुठतरी अस्तित्व टिकवून असलेला..
तेव्हा कोणताही हक्क नसताना त्याने केलेल्या त्या स्पर्शाविरुद्ध आपल्याला तक्रार करता आली नाही..उलट आपलच बालपण हरवलं..आज तर नवर्याला सगळा हक्क असताना तो मला सोडेल?मला काही नको वाटलं तर मी सांगू तरी कुणाला..कोण ऐकुन घेईल माझं..
मनात असंख्य प्रश्नांच काहूर माजलेलं..

इतक्यात तो आला..
ती जरा मागे सरकून बसली..
तो गालात किंचित हसतच जवळ येऊन बसला..
हिने नकळत एक आवंढा गिळला..
आणखी जवळ सरकून त्याने तिचा हात हातात घेतला..
तिने झटकन हात मागे घेतला..
आपण काय केलं..आता हा चिडणार अस वाटुन ती घाबरली..
तिची घालमेल त्याला तिच्या चेहर्यावर दिसली.. आणी तो बोलायला लागला..
निशी…..
घाबरु नको..
मला माहीत आहे आपलं लग्न घाईत झालंय..
पण मला हेही माहितीये की लग्न म्हणजे कुणाच्या ईच्छेविरुद्ध हवी तशी जबरदस्ती करण्याचा परवाना नाही..
नवीन घर नवीन जागा..
नवीन लोक..
सगळंच वेगळं..
अग मला नातेवाईकांकडे गेलो तरी किती वेळ झोप लागत नाही..तू तर तुझी सगळी नाती मागे सोडून माझ्यासाठी ह्या घरात आलीयेस..
नवरा म्हणून हक्क गाजवून मला तुला आपलं करायचं नाहिये..
तुला पहिल्यांदा पहिलं आणी तुझ्या बोलक्या डोळ्यांमधलं निरागस मूल मला दिसलं तेव्हाच मी तुला माझी बायको मानलं..
पण तू तुझ्या इच्छेने आणी पूर्ण मनाने तयार असशील तेव्हाच मला तुझा नवरा व्हायचंय..
तुझ्यावर खूप जिवापाड प्रेम करायचंय..पहिल्या पावसात तुझ्यासोबत बाइक वर लॉन्ग ड्राईव ला जाऊन बेभान व्हायचय..
कधीतरी धो धो पावसात तुला कांदा-भजी बनवून खाऊ घालायचीये..
ह्या माझ्या भोळ्या निशिगंधाला फुलांच्या निशिगंधाने सजवायचय..
तुझ्यासोबत मला चांदणं बघत. पहुडायचंय..
कधीतरी तुला चिडवायचय..भांड भांड भांडायचंय..कधी स्वत: फुरंगटून बसायचंय तर कधी तुझा रुसवा घालवायचाय..
माझा प्रत्येक श्वास मला फक्त आणी फक्त तुझ्याच नावे करायचाय…..
तुझ्यासोबत आयुष्यभर प्रेमाचा लपंडाव खेळायचाय..
” लपंडाव..
नाही..”
ती पटकन बोलून गेली..
त्या एका शब्दाने तिचा बांध फुटला नि किती दिवसांच्या साचलेल्या घुसमटीला वाट मिळाली ..
ती रडत रडत बोलत गेली..
तो फक्त तिला मनमोकळ रडू देत होता ..
तिच्या पाठीवर त्याचा आश्वासक हात फिरत होता..
किती फरक होता त्या आणी ह्या स्पर्शात..
क्षणात जाणवलं तिला..
खूप काही न बोलताही बरंच काही समजावलं होतं त्याने..
तो फक्त थोपटत राहिला..
तिला नकळत झोप लागली..
तिचा लोभस चेहरा..त्याला मोहात पाडत होता..
पण..
त्याच्या हातावर तिची मान ..
निश्चिंतपणे विसावली होती..
तिच्याकडे एकटक पहात
केव्हातरी त्याचाही डोळा लागला..
सकाळी उठला तर ती बाजुला नव्हती..डोळे चोळत बाहेर आला तरी ती कुठे दिसेना..
घाबरलाच..
कुठे गेली.. काय झालं..काही कळेना..
देवघर,
किचन,
बाथरूम,
बाल्कनी..
कुठेच नाही..
काही बरं वाईट तर नाही..
नाही.. नाही..
गाडीनेच जातो शोधतो तिला म्हणून निघाला..
तेव्हढ्यात..
कसलातरी छूम छूम आवाज आला..
कुणीच दिसेना.. जरा घाबरतच पुढे गेलो तर तिथेच होती
लाल लाल साडी..
मोकळे रेशमी केस..
छूम छूम वाजणारे पैंजण.., चेहर्यावर खट्याळ हसू असलेली..
आणि आउट हाउस च्या दरवाज्यामागे लपून माझ्याशी लपंडाव खेळणारी अल्लड ,अवखळ फुलपाखरु बनून बागडणारी माझी निशी..
चक्क माझ्यासाठी गाणं गुणगुणत होती..
“पलभर ठेहेर जाओ..
दिल ये संभल जाये..
कैसे तुम्हे रोका करु..
मेरी तरफ आता,
हर गम फिसल जाये..
आखो मे तुमको भरु..
बिन बोले बाते तुमसे करु..
अगर तूम साथ हो…
अगर तूम साथ हो…”

-प्रणाली

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा