लहानपण देगा देवा….. रम्य ते बालपण, रम्य त्या आठवणी

Written by

अरविंद नुकताच मृत्यूच्या दाढेतून परतला होता…. त्याला हार्ट अटॅक येऊन गेला होता आणि वेळेतच त्याची अँजिओप्लास्टी झाली होती….म्हणून त्याच्या जीविताला होणारा धोका टळला होता.

अरविंदचे वय फक्त पस्तीस वर्ष. लहानपणापासून एकदम हुशार. त्याने iit मध्ये त्याचे इंजिनीरिंग पूर्ण केले आणि तो एका top असलेल्या कंपनीमध्ये नौकरीला लागला.त्याला मिळणारे मानधन हे ही पाच अंकी होते.आणि काम तो अगदीच मन लाऊन करायचा म्हणून त्याची दिवसेंदिवस दिवस प्रगती चालली होती.

त्याच्या या प्रगतीमुळे कामाचा व्याप मात्र वाढत होता.बॉस सोबत पार्टी अटेंड करणे,ड्रिंक करणे,वेळी अवेळी जेवण करणे, फास्ट फूड खाणे, वेळी अवेळी झोपणे… हे त्याच्या नित्त्यनेमाचे झाले होते.

कामाचा ताण काही केल्या कमी होईना,आणि अरविंदला प्रत्येक गोष्ट स्वतः चेक करण्याची सवय होती आपल्या हाताखालील एम्प्लॉयी वर तो पूर्ण पने विश्वास ठेवत नसे.त्यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ तो काम करत असे.

या सगळ्या अनियमित दिनचर्येने एक दिवस त्याला धोका दिलाच आणि  छातीत दुखतंय असं सहज म्हणून तो डॉक्टरांना दाखवायला गेला… आणि त्याची अँजिओप्लास्टी झाली होती.

पोस्ट ऑपेरेटिव्ह रूममध्ये शुद्धीवर आल्यावर तो सहजच विचार करत होता की खरंच काय महत्वाचे आहे पैसे की जीव? आपण उगाचच इतकं पैश्यांच्या मागे लागलो…. थोडक्यात समाधानी असतो तर ही वेळचं आली नसती.

अरविंदला आता आईच्या कुशीची आठवण येत होती, त्याला आठवत होतं की आपलं बालपण किती छान होतं.कशाचा ताण नाही… की काही नाही,आपली स्वप्नही किती छोटी छोटी असत.इकडे तिकडे हुंडरायच,शाळेत कधी होम वर्क पूर्ण झाला नाही म्हणून वही घरी विसरली असं खोटं सांगायचो….शाळेत मिळालेल्या शिक्षा हसत खेळत पूर्ण करायचो…. आई रागावते म्हणून शाळेत खाल्लेले लबदू तिला सांगायचो नाही….नुसती दिवस भर दंगा मस्ती…. आणि थोडी देखील ताप आली की आईच्या कुशीत झोपायचं… मग आई हलकेच, बाम लाव, डोकं दाब थापटून झोपी घालायची. माझ्या आवडीचे पदार्थ करायची…. आजारी पडणं म्हणजे मजा वाटायची. शाळेला दांडी मारता यायची….. विशेष म्हणजे कुठलीच जबाबदारी नसायची….. कुठेही खेळताना  स्टेटस वगैरे ची गरज नव्हती.कसलाच ताण नसायचा आणि छोटया मोठया गोष्टी रडलं की हातात मिळायच्या… कधी कुठे पडलो,मार लागला की, आई मलम लावायची…. कधी कुणी काही चिडवलं तर रडत आईला घट्ट मिठी मारली की सगळा ताण दूर व्हायचा. आणि आता???

अरविंदने आता मात्र ठरवले की आपण अल्पसंतुष्ट राहायचे.आपली प्रकृती महत्वाची.आपल्याला कुठलाही शारीरिक किंवा मानसिक त्रास होईल असे वागायचे नाही.आणि आपल्यातील बालमन जागे ठेवायचे.

#माझेलेखन

कथा आवडल्यास like करा, share करायची असल्यास नावासहित share करा.

©®डॉ सुजाता कुटे

 

प्रतिक्रिया व्यक्त करा