लेक

Written by

लेक

लेक असते..
मनाचं हळवं पान, गवतफुलांचं रान,
सळसळतं चैतन्य,खळाळती लाट
लेक असते..
हास्याचा धबधबा,झुळुझुळु वहाता झरा,
अंगणातली तुळस,नभातलं चांदणं टिपूर
लेक असते..
सुरांची मैफील,दिव्याची वात
हक्काची आई,गर्द वनराई
लेक असते..
मोगऱ्याचा सुगंध,चाफ्याचा परिमल
इंद्रधनुची कमान, हसरा गुलाब
लेक असते..
प्राजक्ताचा सडा,मौलिक हिरा
काळजाचा तुकडा,सुगंधी वाळा
लेक असते..
हळवी बाहुली,मायेची साऊली
वाटते अपुली,परि परक्याची संपत्ती
लेक असते..
सागराची निळाई,पुर्वजन्मीची पुण्याई
आईबापाचा श्वास,अन् सार्थ विश्वास✍️
———————गीता गजानन गरुड.आंब्रड.

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा