लेखणीने देखील बंड केले..

Written by

तुझ्या डोळ्यातील आसवांची झळ,
आता कुणालाच लागत नाही…
तुझ्या तोडलेल्या लचक्यांचा दाह,
आता कुणालाच जाणवत नाही…

जळून झालेली राख तुझ्या कोमल देहाची,
दिसूनही आता कुणालाच दिसतं नाही….
मदतीची हाक तुझी आर्त हाक झाली,
कानांनी ऐकूनही आता कुणालाच ऐकू येत नाही…
श्रद्धांजली देण्यासाठी चार ओळी लिहाव्या म्हंटल,
पण लेखनीही बंड पुकारून म्हणाली लिहिणार
नाही …. 

लिहीन बंद कर म्हणे
काहीतरी उपाय कर….
तुझ्या पोटी देखील लेक आहे,
निदान तिचा तरी विचार कर…

कृतीकरून दाखव,
कवितेचा असर आता होतं नाही..
न्यायाची वाट बघण्यात,
आता उरला राम नाही… 

              ✍️©जयश्री कन्हेरे -सातपुते

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा