लोक बोलतीलच… त्यांच कामच आहे तें… (कुछ तो लोग कहेंगे )

Written by

लोक बोलतीलच… त्यांच कामच आहे तें… (कुछ तो लोग कहेंगे )
✒️? ©जयश्री कन्हेरे -सातपुते
(रजनी रागाने तिळपापड होऊन रूम मधे येते..)

काय झालं ग रजनी.. इतकी चिडलीस का.?… सुमेधा

काय नालायक लोक असतात न काहीही.. स्वतःचं काही बघायचं नाही पण दुसऱ्याचं मात्र ऊनधुणं काढायला लगेच समोर येतात… रजनी

अग.. हो. पण सांगशील का काय झालं ते..?… सुमेधा

काही नाही ग.. खरंच आपण शिकलो इतकंच नाहीतर एकविसाव्या शतकात आहोत तरी देखील लोकांची विचारसरणी अगदी तशीच आहे 1857 सारखी.. बुरसटलेली.कधी कधी शंका येते हे लोक खरंच शिकलेत की फक्त आव आणतात सुशिक्षित पणाचा. ज्या शिक्षणाने आपली मानसिकता बदलू नाही शकत.. काय उपयोग आहे अशा शिक्षणाचा. कुठेतरी हे बदलायला हवं.. आपल्यासारख्यांची होणारी मानसिक प्रताडना थांबयला हवी..  ??..रागाने लालबुंद होऊन रजनी सुमेधाला सांगत होती. 

हे मात्र खरं बोललीस रजनी तू.. शिकूनही काही काही लोक असे बोलतात.. त्यांच एकूण असं वाटत यांच्या पेक्षा चांगले ते गावातील लोक…. कधी कधी माझाही संताप होतो ग, पण आता सवय झाली मला. मी लक्षच देत नाही….. सुमेधा

किती दुर्लक्ष करायचं ग काही मर्यादा असते न सहनशक्तीची.. आज तर हद्दच झाली.. (रागाने लालबुंद होत रजनी बोलत होती ) काय माहिती असते ग यांना आपल्याविषयी?  असं कस आपल्या वागण्या बोलण्यावरून हे लोक काहीही गॉसीप करत असतात.. यांना फक्त मज्जा घ्यायची असते.. दुसऱ्यांच्या मनाला काय वाटत असेल याच्याशी काडीचाही संबंध नसतो या बावळट लोकांचा…. रजनी

अग हो.. बरोबर बोलतेयस पण लोकांना त्या गोष्टीत आसुरी आनंद मिळतो ग..अशा आसुरी वृत्तीच्या लोकांना दुसऱ्यांच्या भावनांची कदर नसते. जेंव्हा त्याच्यावर वेळ येईल व त्यांनाही असं कुणी बोलेल तेंव्हा कळेल त्यांना असं टोचून बोलण्याचं दुःख किती होत ते…. सुमेधा

असं वाटलं न मला मगाशी.. पलटून जाव व दोन कानाखाली लावावे बोलणाऱ्यांच्या… पण.. रजनी

हा “पण” च आडवा येतो आपल्याला आणि आपण सहन करत असतो त्यांच बोलणं…. सुमेधा

असं काही नाही ग. पण कुणाकुणाला व काय काय बोलाव हेच कळतं नाही मला.यांना काय माहिती असते ग आपल्याविषयी?  वरवरची माहिती, याच्यात्याच्या तोंडून निघालेले वाक्य हे लोक तिखट मीठ लावून मोठी मोठी करून एकमेकांना सांगत असतात..  कसला आनंद मिळतो काय माहिती यांना..?… रजनी

हो.. त्यालाच विषय चघळणे म्हणतात.. आणि हे रिकामटेकड्या लोकांचे काम आहेत.. काही दिवस होईल तुला त्रास. नवीन आहेस न.. हळू हळू तुला सवय होईल याची व तुही या बोलण्याला इग्नोर करशील.. आणि म्हणशील कुछ तो लोग कहेंगे.. लोगोंका काम है केहना.. सुमेधा

लोकांचं न काम फक्त तोंड सुख घेण्याचं असत.. (आणखी भडकून रजनी बोलत होती )  ते म्हणतात न “ज्याचं जळत त्यालाच कळतं” तेच खरं आहे. बाकीचे तोंड सुख घेतात व भरलेल्या जखमेवरची खपली काढतात दुसऱ्यांच्या. देव करो नी यांच्या आयुष्यात किंवा यांच्या कुटुंबातील मुलींसोबत असं घडो मग कळेल यांना.. काय दुःख आहे आपल.  व कस सहन करतो आपण ते. (खूप दुःखी होऊन रजनी बोलत होती.. तिचा राग आता दुःखात परिवर्तित झाला होता. )??

अग जाऊ दे ते..तू शांत हो आधी व नीट सांग मला काय झालं नेमक?  काय बोलले तुझ्याविषयी?  व कोण बोललं?  ज्याचं तुला इतकं मनाला लागल….सुमेधा

तू कशी इतक्या शांत पणे असं म्हणू शकतेस… तुला पण तर असं बोलले असेल न लोक.. ? तुला नाही लागल का कधी मनाला?  माझ्यासारखा संताप नाही व्हायचा का तुझा? त्या बोलणाऱ्यांना फोडून काढावं असं नाही वाटत /वाटल का तुला?… (रजनीने स्वतःच्या रागाचं कारण न सांगता उलट सुमेधावरच प्रश्नांचा भडीमार केला. )

 माझ विचारतेयस… माझ सोड ग मला आता लोकांचं व त्यांच्या बोलण्याचं काहिच वाटत नाही. सुरुवातीला बराच त्रास झाला मला.. अगदी तुझ्यासारखीच रागवायची, चिडायची, स्वतःला त्रास करून घ्यायची मी.. पण नंतर विचार केला.. “लोक बोलून जातात. त्यांना आनंद मिळतो त्यात. व आपण ते एकूण स्वतःला त्रास करून घेतो.. मूड खराब करतो.” त्यामुळे काय होत आपल्यालाच हेल्थ प्रॉब्लेम येतात. आपण या समाजाला समजाऊ नाही शकत व बदलवू तर अजिबात नाही शकत. कितीही चांगलं केल तरी लोकांना त्यात वाईट दिसतच. मग मी काय ठरवलं माहिती आहे का.. “जे मला पटत. ज्यातून मला आनंद मिळतो, मी ज्यामुळे खुश असते असच मी करते ” मग “दुनिया जाये…….. ” 

कोणत्या लोकांचा विचार करून आपण स्वतःला त्रास करायचा ग रजनी..? ज्यांनी आपल्या दुःखाला स्वतःच्या मनोरंजनाच साधन बनवलं.. मी सोडल ग सगळं.  आणि मला माहिती आहे तुला वेळ लागेल हे सगळं स्वीकारायला… पण हळू हळू तू देखील माझ्यासारखं मन खंबीर करशील.. ते “पाषाण हृदय” म्हणतात न अगदी तसच होईल तुझं आणि त्यानंतर तुला या लोकांच्या बोलण्याचा काहीही असर होणार नाही आणि तू पण म्हणशील माझ्या सारखं..

कुछ तो लोग कहेंगे.. लोगोंका काम है केहना..

छोडो बेकार की बातो मे कही बित न जाये रैना.. 

कुछ तो लोग कहेंगे.. लोगोंका काम है केहना… 

कुछ रीत जगत की ऐसी है.. 

कुछ तो लोग कहेंगे……. सुमेधा 

मला नाही वाटत माझ्यात काही बदल होईल म्हणून. हो हे मात्र खरं की मी एखाद्याला कानपटीत नक्की शेकील.  हे काय आपल्याला जेवायला देतात की गरजा पूर्ण करतात आपल्या. जे यांना आपल्याविषयी बोलण्याचा अधिकार आहे. कुणीलातरी यांची तोंड बंद करावीच लागेल. कदाचित याची सुरुवात माझ्यापासून व्हावी असं देवाला वाटत असेल.. रजनी

   बर बाई.. तू मोठी हिम्मत वाली. कर तुला जे योग्य वाटते ते..पण रजनी समाजाला बदलवण इतकं सोपं नाही. इतक्या लोकांन मधे मूठभर लोक मिळतील तुला योग्य म्हणणारी किंवा साथ देणारी बाकी ढीगभर लोक हे अशीच आहेत वाईट बोलणारी.. चांगल्या गोष्टीतही वाईट शोधतात ग बाई लोक.. जाऊ दे तू ते…आधी सांग झालं काय तुला इतकं संतापायला… सुमेधा

अग ते नाही का…..रजनी

क्रमशः…

काय झालं असं.. ज्यामुळे रजनी भडकली? 

रजनी आणि सुमेधाने असं काय केल किंवा त्यांच्या आयुष्यात असं काय घडलं ज्यामुळे लोक त्यांच्याविषयी बोलतात..? 

जाणून घ्यायाचं आहे न…. उत्सुकता आहे न वाचण्याची मग वाट बघा पुढील भागाची.. ?✒️©जयश्री कन्हेरे -सातपुते 

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा