वटपौर्णिमेचा दुसरा दिवस…?

Written by

©️सौ.योगिता विजय टवलारे
✍️

तो दमून ऑफिस मधून आला..तीही आलेली..त्याने आल्याबरोबर बूट नी सॉक्स काढून एका कोपऱ्यात ढकलून ( फेकून ) दिलेले..चप्पल ठेवायचं स्टँड त्या बुटापासून बऱ्याच अंतरावर.. आणि बॅगही एका कोपऱ्यात भिरकावून दिलेली..

तो सावकाश सोफ्यावर रेलून बसलेला..तिने हळूच त्याच्याकडे कटाक्ष टाकला.. त्याचीही नजर आतापर्यंत तिच्याकडे वळलेली..त्याने मंद स्मित करत तिच्याकडे एक कप कॉफीचा ☕ फरमान सोडलेला.. ?

तीही त्याच्याकडे छद्मी हसत म्हणाली…आज डेट कोणती रे?? तो – ह्म्म , मला वाटतं १७( जून ) … ती प्रश्नार्थक नजरेने …तो थोडा गोंधळलेला…तिचा वाढदिवस?? की आपली anniversary??? ?? छेss !! हीचा वाढदिवस पुढच्या महिन्यात नी anniversary दोन महिन्यापूर्वी होऊन गेलेली…?

मग आज आहे तरी काय?? तो अजुनही संभ्रमात…ती – त्याच्याकडेच बघतेय..अगदी मारक्या म्हशी सारखी…तो मात्र थोडा बावरालेला की घाबरलेला?? हे त्याचे त्यालाच ठाऊक!!
?

भीतीची हलकीशी लाट त्याच्या मनाला उध्वस्त करून गेलेली..
तो अजुनही विचारात …तिने नकळत फरमान सोडला..जा!! आपल्यासाठी दोन कप कॉफी ☕ करुन घेऊन ये..आज फार दमलेय मी..आता ती सावकाश रेलून बसलेली..आणि तो एका झटक्यात एखाद्या घायाळ पक्ष्यासारखा जमिनीवर कोसळलेला..?

अगदी रक्त बांबाळ झालेलं त्यांच मन कुणी समजून घेणारं नाही..एवढ्या मोठ्या जगात फक्त आपण एकटेच असल्याचा त्याला भास झाला..आणि एका क्षणात त्याच्यासमोर कालचा दिवस तरळून गेला..?

कालची वटपौर्णिमा झालेली..त्याला आठवलं , तिने अगदी लाडिक स्वरात त्याला झोपेतून उठवलेल..तेव्हा आपण किती बावरून गेलेलो .. तिच्या त्या अनपेक्षित लाडिक हल्याने??
एरव्ही, एका झटक्यात अंगावरच पांघरूण ओढून मला उठवणारी आपली बायको!! आणि आज चक्क मला प्रेमाने उठवते आहे म्हणल्यावर मीही मग माघार घेतली नाही…?

मीही जितके लाड पुरवून घेता येईल, तितके लाड पुरवून घेतले..आणि तीही न चिडता माझे लाड पुरवत गेली..माझ्यासाठी तिने केलेला उपवास आणि पुजेसाठी नटतांना बघून ,अभिमानाने आपले उर भरून आलेले..?

मला उगाच वाटून गेले, कामाच्या व्यापात उगाच चिडचिड करतो आपण हिच्यावर ..पण , आता बाssssसं झाले..ह्यानंतर कधीच हिच्यावर चीडायच नाही म्हणून मनाच्या कोर्टात ग्वाही सुद्धा दिलेली …?

पूजा आटपून जेव्हा ती मला नमस्कार करायला वाकली..तेव्हा मी लागलीच तिला मिठीत घेऊन म्हणालेलो.., सॉरी !! मी जरी तुला रागवत असलो, भांडत असलो ..तर, ह्याचा अर्थ असा नाही की माझे तुझ्यावर प्रेम नाही..कामाच्या व्यापामुळे कळतच नाही अगं माझ्या चुका ..राणी!! रागवलीस का माझ्यावर?? प्रॉमिस !! मी पुन्हा म्हणून कधीच तुला रागवणार नाही..?

त्याचं हे बोलणं ऐकून ती नुसतच हसली नी परत त्याच्या मिठीत शिरली..त्याला कोण आनंद झाला म्हणून सांगू?? जगातले सगळे सुख तिच्या पायथ्याशी अर्पण करायलाच हवेत..हा निर्धार केव्हाच पक्का झालेला..?

आणि आज , म्हणजे वटपौर्णिमेचा दुसरा दिवस ( १७ जून)…ती अजुनही त्याच्याकडे बघत होती..ती – अरे!! असं काय बघतोय वेड्यासारखा?? कालचा दिवस गेला राजा..अजुनही तू कालच्याच धुंदीत वावरतोयस.. असं दिसतंय… पण पहाटे मला आणि सायंकाळी तुला बनवायची असते कॉफी!! हा अलिखित नियम नाही का आपला?? तिचं बोलणं ऐकून त्याचा चेहरा एका क्षणात खर्रकन उतरला..?

तो काहीच न बोलता किचनकडे वळला..कॉफीची बरणी काढली आणि तिचा आवाज आला..अरे , आज काय बनवणार आहेस जेवायला?? मला फार भूक लागलीय..नाहीतर एक काम कर, मला आधी मॅगी बनऊन दे..नंतर कॉफी कर..आज , जाम डोकं फिरवला बॉस ने..?

स्वयंपाकाला लागायच्या आधी , तुझे बुट व बॅग नीट जागेवर ठेऊन दे..तोपर्यंत मी निवांत पडते..मॅगी झाली की रूम मध्येच आण.. असं म्हणून ती केव्हाच रूम मध्ये गेलेली..?

आणि हा इकडे विचारात..काल आपण आपल्याच चुका मान्य करून मोकळं झालेलो.. पण हीचा छळ पार विसरून गेलो… आपलं लग्न ठरले तेव्हा पहिल्या भेटीतच तिने क्लिअर केलेलं की लग्नानंतर घरातली प्रत्येक कामे आपण दोघे मिळून करायची कारण तुझ्या बरोबरच मी सुद्धा नोकरी करणारे..ती तिच्या निर्णयावर अजूनही ठाम आहे..?

ती काय कमी भांडते? चिडते? पण मनाने फार निर्मळ आहे..?

असू देत, आपण मात्र दरवर्षी प्रमाणे वटपौर्णिमेची आतुरतेने वाट बघायची..निदान, एक दिवस तर आपला हक्काचा असतो..??

लेख काल्पनिक असून , ह्याचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही..संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा..ही कडकडून विनंती…??

लेख आवडल्यास माझ्या नावासकट शेअर करा!! तसे न आढळल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल..

?योगिता विजय?

१६/६/१९

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत