“वळणावर त्या…”

Written by

“वळणावर त्या…”

वळणावर त्या…
एक कळी उमलली,
भावविश्वची फुलवून गेली.
तू बाबा, अन मी आई
जीवनाचे सार्थक करून गेली.

वळणावर त्या…
अनेक अडचणी आल्या,
तुझ्या सोबत असण्याने
त्या सहजची विरून गेल्या.

वळणावर त्या मागे पाहता
काळ किती झरझर गेला,
जन्म आणि मृत्यू मधील हे अंतर
आयुष्य सुंदर बनवून गेला.

© सौ. सुचिता वाडेकर…✍

Article Categories:
कविता

Comments are closed.