वळण भाग 1

Written by

गायत्री # वळण भाग 1
आज मधुरा चे आई वडील खूप खुश होते. कारण मधुराला बघायला जी मंडळी येऊन गेली, त्यांनी त्यांची पसंती फोनवरून कळवली होती. घरात सगळी लगबग चालू झाली कारण मुलाकडच्या मंडळींचं म्हणणं होतं लग्न लवकरात लवकर केल पाहिजे. दोन दिवसात साखरपुडा आणि पुढच्याच आठवड्यात लग्न, असा बेत ठरला. सगळेच घाईघाईत चालल्यामुळे मधुरा चे मन बेचैन होतं. तसं बघितलं तर तिला पण प्रकाश खूप आवडला होता. त्याच्यात नाही म्हणण्यासारखं काहीच नव्हतं. दिसायला स्मार्ट चांगल्या पगाराची नोकरी घरी आई-वडील छोटे कुटुंब. आणि तसं म्हणलं तर प्रकाश ची मधुरा कडून जास्त काही अपेक्षा पण नव्हती तिने फक्त माझ्या आई-वडिलांना आणि मला नीट थांबायला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा. मग काय सगळ्या धामधुमीत चालू झालं, खरेदी सोने कपडे नातेवाईकांना आमंत्रणे सगळ्यांची लगबग चालू होती. साखरपुडा झाला आणि प्रकाश आणि मधुराला एकत्र फिरायचं परमीट मिळालं. प्रकाशला वेगवेगळ्या जागा, ऐतिहासिक गोष्टी एक्सप्लोर करायची खूप आवड होती. पण प्रकाशच्या आईला हे अजिबात आवडत नसे. तशातच त्याला कळले की त्यांच्या गावाजवळ एक आर्किओलॉजीकल सर्व्हे चालू आहे, पुराणकाळातील एक गुफा सापडली आहे. जेव्हा प्रकाश आईला याचा सुगावा लागला तेव्हा प्रकाशाला तिने चांगलीच तंबी दिली, अजिबात त्या गुहेकडे फिरायचं नाही. का कोण जाणे पण प्रकाश च्या आईला कसली तरी एक अनामिक भीती वाटत होती. पण प्रकाशच मन काय त्याला शांत बसू देत नव्हतं. एक दिवस मधुराला फिरायला न्यायच्या बहाना करून तो ती गुहा बघायला गेला. त्यादिवशी नेमका रविवार होता. त्यामुळे तिथे काम करणारे कामगारांची सुट्टी होती. मग काय प्रकाश ला भलताच चान्स मिळाला सगळी गुफा फिरायचा. मधुरा साठी हे सगळं नवीन होतं.
प्रकाश वेड लागल्यासारखा ती गुफा फिरत होता आणि मधे मधे मधुराला पण एक्सप्लेन करून सांगत होता. त्या गुहेच्या भिंतींवर खूपशी पुराणकाळातील चित्र कोरली गेली होती. त्यातली बरीशी चित्रे खूपच अंधुक अंधुक दिसत होती. मधुरा ही फाइन आर्ट्स ची स्टुडंट असल्यामुळे तिलाही या गोष्टींमध्ये हळूहळू रस वाटू लागला. त्यातल्याच एका चित्राने तिचे लक्ष खूप वेधून घेतले. ती एकटक त्या चित्राला न्याहाळत होती. गुफा फिरता-फिरता कधी सकाळची संध्याकाळ झाली हेदेखील त्या दोघांना समजले नाही. आता मात्र मधुराला काळोखाची भीती वाटायला लागली.
मधुरा: अरे प्रकाश, चल ना खूप अंधार पडला मला खूप भीती वाटायला लागली आहे
प्रकाश: येडाबाई मी असताना तुला कसली भीती? अजून थोडंसं पुढे जाऊयात.
मधुरा: अरे ऐक ना खूपच अंधार पडलाय थंडी पण वाजायला लागली आहे.
गुहेत आल्यापासून तिला सारखं असे वाटत होते की कोणीतरी त्यांचा पाठलाग करते आहे, पण प्रकाश तिला वेड्यात काढेल म्हणून ती काहीच बोलली नव्हती.
मधुरा: “अरे सोन्या ऐक ना आपण परत नंतर कधीतरी येऊ”
प्रकाश: अगं थांब ग!!
ते दोघे तसेच अजून थोडे पुढे गेले. पण आता हवेमध्ये गारवा खूपच वाढला होता. प्रकाशलाही याची जाणीव झाली आणि त्याने मागे फिरायचा निर्णय घेतला. दोघे हातात हात धरून परतीच्या वाटेवर लागले होते. मधुरा शांत होती. प्रकाश अधून मधून काहीतरी बोलणे चालू होते, तो मधुराला बोलतं करायचा प्रयत्न करत होता. कारण त्याला चांगलंच माहित होतं ती त्याच्यावर खूप चिडली आहे.
प्रकाश: एक राणी, बोल ना माझ्याशी!! इतका राग बरा नव्हे. नाक लाल होतो माहित आहे ना!!
असे म्हणून तो जोरात हसला. त्याच्या हसण्याचे प्रतिध्वनी सगळ्या गुहेमध्ये पसरले. तरीही मधुरा खाली डोकं घालून शांतपणे चालत होते. प्रकाशलाही वाटले जाऊ दे एकदा आपण गुहेच्या बाहेर गेलो की होईल व्यवस्थित आपोआप ती.
प्रकाश: “” मै जिंदगी का साथ निभाता चला गया…
हर फिकर को धूवे मे उडाता चला गया….””
चालत चालत ते दोघे गुहेच्या दारापाशी पोहोचले.प्रकाशला आता जाणवू लागले की मधुरा त्याला मागे मागे खेचते आहे. त्याला वाटले तिला चालताना प्रॉब्लेम होत आहे म्हणून ती हळू हळू चालायचा प्रयत्न करतीये.पण थोड्यावेळाने त्याला जाणवलं की त्याच्या हातावरची तिची पकड खूपच घट्ट झाली आणि ती त्याला जागेवरून हलू पण देत नाहीये. त्याने तिच्याकडे बघितले पण पण तरीही हि ती खाली डोके करून उभी होती. त्याला कळेना नक्की काय झाले.
प्रकाश: हे मधुरा ग हात सोड माझा खूप दुखतोय. मधुरा मधुरा…
मधुरा: “कोण मधुरा?? मी इंद्राणी हाय इंद्राणी”
असे म्हणून मधुराने वर बघितले, तिचे डोळे आग फेकत होते आणि ती दात विचकत हसत होती जोरजोरात.. “मी परत आली हाय सांग सगळ्यांना… “कोणाला सोडणार नाही सगळ्यांचा बदला घेणार…”” असे म्हणून मधुरा जोर जोरात हसू लागली आणि अचानक बेशुद्ध होऊन खाली पडली. प्रकाशला समजेना हे स्वप्न होते का सत्य. त्याला तिचा तो अवतार बघून तिच्या जवळ जायची पण भीती वाटत होती. तेवढ्यात तिथे रात्रपाळी करण्यासाठी ठेवलेला वॉचमन सदाशिव तिथे आला त्यानी हा सगळा प्रकार बघितला.
सदाशिव: काय साहेब काय झाले? कोण तुम्ही? इथे काय करता? तुम्हाला माहित नाही इथे येण्यास कोणालाही परवानगी नाहीये.
प्रकाश: ये बाबा मी तुला सगळं सांगतो पण आधी हिला उचलायला माझी मदत कर. ही माझी होणारी बायको आहे.
त्या दोघांनी तिला तसेच उचलले आणि गाडीमध्ये सीटवर झोपवले. प्रकाशने घडलेली सगळी हकीकत सदाशिवला सांगितली. सदाशिव यावर एवढेच म्हणाला, ” साहेब खूप मोठी चूक केली तुम्ही इथे येऊन!!!”

काय खरंच प्रकाश ने मोठी चूक केली होती त्या गुहेमध्ये जाऊन, मधुराला काय झाले असेल, कोण हि इंद्राणी? ती कोणाचा बदला घेणार आहे आणि सदाशिव असं का म्हणाला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील पुढच्या भागात तोपर्यंत… Stay connected.

Article Categories:
भयपट

Comments are closed.