वाचन प्रेरणा दिवस..!!

Written by

?वाचन प्रेरणा दिवस…!!

आज १५ आक्टोंबर डॉ.ए.पी.जे .अब्दुल कलाम यांचा जन्मदिन , आजचा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो.तरुण पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी त्यांनी उत्तमोत्तम लेखन वाचावे , ज्ञान मिळवावे व सर्वगुणसंपन्न व्हावे या दृष्टीने या महत्वाच्या दिवसाचे आयोजन केले जाते..
सर्व शाळेमध्ये याचे आयोजन करुन या दिवसाचे महत्व पटवून दिले जाते.उद्याचा सक्षम भारतनिर्मितीसाठी तरुण पिढी चांगल्या विचाराने घडली पाहिजेत ,त्यासाठी त्यांनी चांगले साहित्य वाचले पाहिजे , त्यातील विचार आत्मसात करुन दुसऱ्यांना प्रेरणा दिली पाहिजे या प्रणेतुनच सर्वजण आदर्श नागरिक बनले पाहिजेत तरच तुम्हाला कृतीशिल भारतदेश पहायला मिळेल …!!

करावे वाचन
स्मरावे चिंतन

हरपावे भान
मिळवावे ज्ञान

व्हावे कटीबद्ध
वाचूनी शब्द

घ्यावी प्रेरणा
वाचन दिना

©नामदेव पाटील ✍

प्रतिक्रिया व्यक्त करा