“वाटेवरती काचा गं” ©दिप्ती अजमीरे

Written by

 

नंदिनीला तिच्या friend चा फोन आला.. म्हणाली, “तुझ्याकडे पास असेल ना आजच्या शो चा!! तर मला पण दे ना please !
तू तर जाणारच असशील ना आजच्या शो ला !!
केव्हा जाणार आहेस??”

नंदिनी ला काहीच कळत नव्हते तिची friend काय बोलतेय ते…
नंदिनी म्हणाली, “अग, काय बोलत आहेस??
कुठला शो?? कोणाचा ?? मला कळेल अस बोलशील का??”

“अग तुला काहीच माहिती नाही का??
तुझ्या किरण चा खूप मोठा शो आहे आज…
तिकीट मिळत नाही आहे… तू ये मी address पाठवते तुला … तिथेच भेटू…
सत्कार समारंभ ही आहे आज किरण चा…
तू तिथे असायलाच पाहिजे…”

नंदिनी हे ऐकून स्तब्ध झाली…
ढसाढसा रडू लागली…
ती किरण ला भेटायला उत्सुक होती पण आपल्याला बघून किरण ला काय वाटेल, तो भेटेल का आपल्याला ?? हाच विचार ती करत होती…

शेवटी न राहवून ती गेली…
किरण चा शो बघितला तिने…
आपण केलेली मेहनत, बलिदान, संस्कार इतक्या सुंदर रित्या आपल्या समोर येईल याचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता…

किरणचा performance, लोकांची मिळणारी दाद, शाबासकी, कौतुक बघून ती भारावून गेलीं होती…

किरणचा सत्कार बघून आपल्या त्यागाचं सार्थक झालं हे तिला आज पटलं होतं…

आज कोणीही किरणचा तिरस्कार करत नव्हते… त्यामुळे ती आज खूप खुष होती…

किरणला कुशीत घ्यावं अस तिला फार वाटत असलं तरी तो आज तिच्यापासून फार लांब गेला होता..
म्हणून  तो आनंद सोहळा डोळ्यांत सामावून ती निघाली होती घरी जायला…

तोच स्टेज वरून आवाज आला…

आई !!!
माझ्या काटेरी वाटेत मला साथ देणारी
फक्त माझी आई…
पाठीशी खंबीर उभी राहून जगाशी लढणारी फक्त माझी आई…
माझं कौतुक, लाड, हट्ट पुरवणारी
फक्त माझी आई…
भक्कम संस्करांची शिदोरी देणारी
फक्त माझी आई…
वास्तवाचे सोसून चटके माझ्यातली “मी” जपणारी
फक्त माझी आई…
माझे अस्तित्व, नवी ओळख निर्माण करणारी
फक्त माझी आई…

आज मी जे काही आहे त्याचं श्रेय मी माझ्या आईला देईल…

हे ऐकून पाणावलेल्या डोळ्यांनी ती मागे बघू लागली, तर किरण तिला मागे उभा दिसला…

त्याने तिला स्टेज वर नेले आणि आपलं बक्षीस तिच्या पायी ठेऊन आशीर्वाद घेतला…

तिला माफी मागून आपल्या सोबत राहण्याचा आग्रह ही केला.. तिनेही तो accept केला… शेवटी ते दोघीच एकमेकांसाठी होते…

नंदिनीला दोन शब्द बोलण्यास सगळ्यांनी आग्रह केला… तिने हा प्रवास एकटीने कसा केला हे ऐकण्यास सगळे उत्सुक होते…

नंदिनी हळूहळू थोड्या घाबरलेल्या स्वरात बोलू लागली… कसं तिने हे आव्हान स्वीकारून,
अनेक संकटांचा, भयानक – गलिच्छ नजरांचा सामना केला होता…
तसा तिचा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोर नाचू लागला…

मी नंदिनी…
अगदी सर्व सामान्य…
पण मुलं जेव्हा पोटी येत ना तेव्हा त्या आईला असामान्य शक्ती मिळते आणि त्यातूनच आपल्याला वाट मिळते…

मी गरोदर होती…
घरांत अगदी आनंद आनंद होता…
सगळीकडे येणाऱ्या सुखाचा सोहळा साजरा होणार होता…

लग्नानंतर तब्बल 12 वर्षांनी पहिल्यांदा दिवस गेले होते…
त्यामुळेच की काय घरांत सतत चालणारा छळ थोडातरी कमी झाला होता…

सगळे प्रथम च खुष वाटत होते….
सासूबाईंचे टोमणे आता काळजीत बदलले होते… नवराही येता जाता माझ्याकडे लक्ष देऊ लागला… हवं नको ते बघू लागला होता…

हळूहळू दिवस भरायला लागले…
मला माहेरची ओढ लागली होती पण सासरच्यांनी कौतुकाने घरीच ठेऊन घेतले आणि सासरी च सगळे करण्याचे ठरले…

शेवटी तो दिवस आला ज्याची सगळेच आतुरतेने वाट पाहत होते…
हॉस्पिटलमध्ये  admit केले…
सगळं काही नीट चालू होतं..

थोड्याचवेळांत डॉक्टरांनी आनंदाची बातमी दिली… “अभिनंदन !! मुलगा झाला…”

घरांत सगळीकडे उत्साह होता…
धुमधडाक्यात बाळाचं बारसं झालं…

नव्याचे नऊ दिवस संपले…
बाळ ‘किरण’ हळुहळु मोठं होऊ लागलं…

तसतसे नवे नवे गुण ही दाखवू लागलं तर कधी अवगुण सुद्धा…

सुरुवातीला त्याच्या गुण आणि अवगुणांच सुद्धा कौतुक च व्हायचं… पण हे काहीतरी विचित्र घडतंय हे जाणवायला लागलं…

मुलगा असून त्याला सगळं मुलींचे सामान आवडायचे जसे कपडे, खेळणी, मेकअप, लिपस्टिक, nailpaint वगैरे…

पण मुल म्हणून अवगुणांचे दोष मात्र माझ्यावर  येऊ लागले…

सासू सासरे एक दिवस मला खूप बोलू लागले…

“ही अवदसा आमच्या घरात नको…
हे कोण कुठलं पोर जन्माला घातलं… आमच्या घराण्यांत असं पोर कसं जन्मले…
तुझ्यातच काही दोष असणार…
तुझेच थेरं हे…
आमच्या पोटी नाही आलं असलं पोर कधी…
जा निघ इथून आणि तुझ्या त्या पोर म्हणू की पोरगी घेऊन जा…
चालते व्हा, परत कधी तोंड दाखवू नका…”

असं काही काही घालून पाडून बोलू लागले…

नवरा साथ देईल अस मला वाटलं पण त्याने तर साधं तोंड पाहायचा सुद्धा त्रास घेतला नाही…

तूच कुठे तोंड काळं करून आली असणार आणि आमच्यावर हे पोर लादले म्हणून त्यानेही मला घालवून लावले…

पार एकटी पडली होती मी…
कसेतरी काम मिळवून मी किरणला एकटीच वाढवू लागली…
अनेक गलिच्छ नजरांचा रोज मारा होत असे..

पण जसजसा किरण वाढत होता तसतसा त्रास ही वाढू लागला… शाळेतून, शेजाऱ्यांकडून नेहमीच complaints येत असत किरणच्या…

त्याला मी खूप समजाऊन सांगत होती…
कधी लाडाने-प्रेमाने आणि कधी मार देऊन पण त्याच्यात बदल होण्याची शक्यता दिसतच नव्हती…

तो मुलींमध्ये जास्त रमत असे…
मुलींचे खेळ, त्यांची खेळणी त्याला आवडत असे…

किरण च्या अश्या वागण्यामुळे मुले त्याच्याशी खेळत नव्हते… कोणी आईवडील खेळू देत नसे…

आमच्या मुलांवर वाईट परिणाम होतील म्हणून अनेक ठिकाणी आम्हाला राहुही देत नसे…
आम्ही सतत एका घरातून दुसऱ्या घरी राहायला जात असू…

किरण मात्र लहान असल्यामुळे हे असं का होतं आपल्यासोबत त्याला कळत नसे आणि मी ही उत्तरं देऊ शकत नव्हते…
काही दिवसांनी तुला कळेलच एवढंच मी त्याला सांगत होती…

एक दिवस मी त्याला मेकअप करतांना बघितले… लिपस्टिक-काजळ सगळं अगदी माझ्यासारखेच लावलं होतं…

त्या दिवशी माझ्या तळपायातली आग मस्तकात गेली आणि मग मी किरणला चांगलाच फोडून काढला…

हात थकल्यावर मी किरण ला घेऊन बसली… आम्ही दोघेही रडत होतो एकमेकांच्या मिठीत… रडताना मी किरणचा चेहरा न्याहाळत होती…

कितीही काही झालं तरी मी एक आई होती…
माझ्या पोटचा गोळा च तो…

खुप सुंदर मेकअप केलं होतं… अगदी कुठल्याही मुलीला फिक पाडेल असा तो वाटत होता… पण मी भानावर आली…

किरणला समजावू लागली, “अरे तू मुलगा आहेस… हे असं सगळं मेकअप मुलं नसतात रे करत… कसं सांगू तुला??”

मी आला दिवस घालवू लागली…
काय करावं काही सुचतं च नव्हतं…
दिवस विचारातच निघून जात असे…

इकडे किरण katthak क्लास join करायचा म्हणून हट्ट धरून बसला होता तर मी त्याला कराटे, table-tennis, cricket शिक म्हणत होती…

दोघांचेही विचार अगदी विरुद्ध दिशेला धावू लागले होते…

शेवटी किरण जिंकला आणि मी हार मानली… पण मी किरणला पूर्णपणे support करण्याचा निर्णय घेतला…

आपल्या वाटेवर नेहमीच काचा चं असणार, काटे असणार पण त्यांचा विचार केला तर आपण कसे जगायचे….
त्यामुळे वाट बद्दलण्यापेक्षा त्या काचा काट्यांना बाजूला सारून आपल्याला आपला मार्ग शोधून आपलं ध्येय गाठायचं असतं…

पोटच्या गोळ्यासाठी हे आव्हान मी स्वीकारलं आणि किरणच्या प्रवाहात उडी टाकण्याचे धाडस केले…

त्याला katthak class लावून दिला…
त्याला हवं तसं वागू देत होती… त्याच्या आवडी निवडी जपत होती…

त्याच्या प्रत्येक कामात होईल तशी मदत करत होती… त्याच्या पाठीशी एक खंबीर आई म्हणून उभी होती…

आम्ही दोघेही मायलेक प्रवाहाच्या विरुद्ध धावत होतो… त्यामुळे अनेक संकटांना तोंड द्यावं लागत होतं…

शेजाऱ्यांनी तर जीव नकोसा करून टाकला होता… येता जाता हेळसांड होऊ लागली माझी आणि किरण ची…

किरण हे सगळं बघत होता…
तो जसजसा मोठा झाला तसं त्याला आईचं दुःख जाणवू लागलं होतं पण तो काहीच करू शकत नव्हता…

एक दिवस मला न सांगता किरण ने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला…

मी किरण ला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण पदरी अपयश च आले…

परत मी एकटी पडली…
कसेतरी दिवस काढत होती…

पण देवाने सुद्धा माझा साथ सोडला नाही म्हणून तर मैत्रिणीने फोन केल्या केल्या मी किरण ला भेटायला आली…

आणि आज…
आज माझा किरण आपल्यासमोर आहे…

टाळ्यांचा कडकडाट झाला…
दोघांची ही कहाणी ऐकून प्रेक्षकांचे डोळे सुद्धा पाणावले होते…

किरण आणि नंदिनी दोघांनाही सगळ्यांनी वाट मोकळी करून दिली आणि त्या पाठमोऱ्या मायलेकांकडे सगळे बघत राहीले…

खरंच आई किती कष्ट घेते ना पोटच्या गोळ्याला अस्तित्व देण्यासाठी…
ती काहीही करू शकते… कितीही आव्हानं पेलू शकते जर ती एक आई असेल…

कशी वाटली ही नंदिनी तुम्हाला???
नक्की कळवा….

(शुद्धलेखनाच्या चुका माफ असाव्यात…. तुमच्या प्रतिक्रिया आणि suggestions नक्की आवडेल… कथा आवडल्यास like आणि share करायला आणि comments द्यायला विसरू नका…?)

—दिप्ती अजमीरे

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत