वाट तुझी बघतांना

Written by

वाट तुझी बघतांना…

नभात फुलपाखरू
भिरभिरणारे..
आसमंतात तारे
लुकलुकणारे..

मनाच्या अंगणात पैंजण
रुणझुणणारे…
मधाळ वाणीत गीत
गुणगुणणारे…

तुला बघताच अधर ते
थरथरणारे…
वाऱ्याच्या झुळुकीसोबत केस ते
भूरभूरणारे…

मखमली स्पर्शाने अंतरंग
मोहरणारे….
अलगद तुझ्या मिठीत काही क्षण
विरघळणारे…

मन माझे वेडे हे सदा
खुलवणारे…
तुझ्या प्रतीक्षेत नेत्रज्योत तेवत
ठेवणारे…

किती अंत बघशील आता
येणा रे…
तुला बघावयास नयन हे
आसुसलेले….
©जयश्री कन्हेरे -सातपुते

Article Categories:
कविता

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा