वाट बघतेय…

Written by

 

वाट बघतेय…. 

अवघडले ते क्षण,
आणि
भिरभिरणारी नजर…

घाबरलेल ते हृदय,
आणि
थरथरणारे अधर…

सैरभैर ते मन ,
आणि
कातरवेळचा प्रहर…

आसुसलेले नयन ,
आणि
तुझ्या प्रतिक्षेचा कहर…

दिसताच तू तृप्त झाले मी,
आणि
वेदनेचा पडला रे सख्या विसर…

              ✍️©जयश्री कन्हेरे -सातपुते

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा