वाण

Written by

#वाण

#१००शब्दांचीगोष्ट

पगार झालेला नाही . हातात फक्त १०० रुपये . त्यात वर्षाचा पहिला सण …. कसा मेळ बसवायचा याच विचारात राधा बसची वाट बघत उभी होती. तेवढ्यात कानावर शब्द पडले , ” मी जरा वेळ मंदिरा समोर बसतो , बघू औषधाचे पैसे जमले तर आज जावू दवाखान्यात”. तिने मागे वळून पाहिले तर पायाच्या जखमेला झाकण्यासाठी भलेमोठे कापड गुंडाळलेली भिकारीण वेदनेने विव्हळत बसली होती . तिला दवाखान्यात जाऊन उपचार घेण्याची नीतांत गरज होती . तिचा नवरा भिक मागून पैसे जमा करण्याची तयारी करत होता. तेवढ्यात बस आली. राधेचा हात आपसूक पर्समधे गेला. १०० ची नोट त्या भिकरणीला दिली . तिने मनापासून आशिर्वाद दिला. बसमधे चढल्यावर राधा स्वतःशीच प्रसन्न हसली . संक्रांतीचा सण वाण देवुन दणक्यात साजरा झाला होता.
©️ अंजली मीनानाथ धस्के

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.