वादळी पावसाची एक सकाळ

Written by

आज तब्येत ठीक नसल्यामुळे work from home करु असा विचार करुन मीरा घरीच थांबली. ४-५ दिवसांपासून वादळी पावसाची संततधार चालूच, पण खिडकीतून डोकवायलाही वेळ मिळला नाही तिला. अॉफिस ते घर-घर ते अॉफिस त्यात so called monthend..हा monthend पुढच्या महिन्याच्या ३-४ तारखेला संपणार. काय्य ते schedule आहे राव..स्वतः ला वेळ द्यायलाही वेळ नाही..पण पर्याय नाही..असो. असा विचार करत ती concentrate करत होती.

सकाळी स्वयंपाक करणाऱ्या मावशीही रोजच्या वेळेआधीच हजर होत्या..पाऊस जरा थांबला म्हणून लवकर आलेल्या. बरं नाही कळाल्यावर त्यांनी मीरा साठी चहा आणून दिला..अॉफिसच्या चहापेक्षा उत्तम झालेला चहा…मावशी माझ्या सोबत तुम्हीही घ्या की चहा, त्या फार संकोचून हो म्हणाल्या मीराला. मीरा आणि मावशींची भेट येता जाता Hi..आणि Bye पूरतीच व्हायची..
“फार छान वाटलं मावशी..आईचीच आठवण आली..कितीतरी दिवसांत आईचं नी माझं बोलणंच नाही..फोनवरही फार काही लपवते बहूतेक बोलताना..मला उगाच काळजी लागू नये म्हणूनही असे करत असावी..” मावशींनी दोघींचे चहाचे कप उचलले आणि किचन मध्ये निघून गेल्या.
“ताई, तुमच्या आवडीची भरली भेंडीची भाजी करते छान, बरं वाटेल तुम्हांला..” मीरा बरं म्हणाली  फक्त.
आणि कामात गढून गेली. अचानक Skype वर conference call join करण्यासाठी नोटिफिकेशन आलं. Call पूर्ण होतो ना होतो तोच फोडणीचा वास आला. “आईईई..Please सक्काळी सक्काळी फोडणी??” एवढ्या रागात बोलली मीरा, पण पटकन लक्षात आलं, आई इथे नाही. इतक्यात मावशींसोबत चांगलं बोलणं झालं, काय वाटेल त्यांना लगेचच रागावलेही. लॕपटॉप बाजूला केला..तिनं दोन्ही हातात चेहरा झाकून घेतला. थोड्या वेळाने मावशी गरम भाजी पोळीचं ताट घेऊन आल्या.
“लग्गेच खाऊन घ्या बरं गरम आहे, मला पुढची पोळी लाटायला” मीरा ला तर वरही पाहवेना..त्या किचनमध्ये गेल्यावर मीराने ताट ओढलं जवळ, पण खाण्याची काही इच्छा होईना. त्या परत गरम पोळी घेऊन आलेल्या.
“हे काय आधीच काहीच संपलं नाही अजून?”
“नाही मावशी घेते मी” एक अबोल पॉज गेल्यावर पटकन मीरा “सॉरी मावशी” म्हटली आणि तिने वर पाहिले. मावशी हसत हसत “असूद्या..असूद्या” म्हणाल्या.
मावशींनाही मीराशी पगार घेताना जुजबी बोलणं होई तेव्हडीच बोलण्याची सवय..कधी बोलण्याचाही प्रसंग आला नाही. तरिही त्या फार मोकळेपणे बोलत होत्या. “वातावरण छान वाटून राहिलं नई??”
मीराही गप्पागोष्टी करु लागली ..” हो मावशी..मला तर आत्ता असं वाटतंय, मला जणू शाळेत जायला उशिर होतोय, तरिही आईनं वाढलेली तव्यावरची गरम पोळी खायचा मोह माझ्याने सुटत नाहीये, शाळेला या एका कारणाने दांडी मारायला मी तयार असायचे..घाई घाई मी सर्वच तिच्याकडे मागायचे, डोक्याचा बेल्ट, सॉक्स, रूमाल..आणि रोजचे सुट्टे ६ रुपये..बसने जायचे तिकिट ३ रुपये..यायचे तिकिट ३ रुपये..अगदी कालचीच गोष्ट हो, बस नंबर ४७६४ मुक्तविद्यापिठ. बस चूकली होती, आईनं घाई घाई स्वयंपाक आवरुन मला रिक्षाने शाळेत सोडवायला आलेली..माझी आपली “चाचणी परिक्षा पहिलाच पेपर, कोणत्या वर्गात येईल नंबर? पहिल्या बेंच वर तर अजिबात नको” बडबड आरामात चाल्लेली..तिचाच जीव वर खाली उशिर नको म्हणून.
“एवढा विचार अभ्यासाचा कर” आईचं हे वाक्य ऐकून माझा ठोकाच चुकायचा, धपाटा बसतो की काय असं वाटून मी गप्प बसायची. मी शाळेच्या छोट्या गेटवर घाई घाई उतरुन पाचवीच्या वर्गात पळायचे.
“अगं थांब, फार चिखल आहे हळू, पाय सरकेल..माझा हात धरतेस का?” तिच्या ह्या वाक्याला मी माघारी तिच्याकडे आले याचं तिला हायसं वाटतं ना वाटतं तोच मी तिला फटकन बोलून बसले, “मी लग्गेच पोहचेन वर्गात, खालीच तर आहे वर्ग एकच पायरी चढायला लागते मला”
“हो का? मग काही वेळ नाही लागणार मी…” मी तिचं वाक्य तोडून बोलले, “करिश्माची आई किती सुंदर साडी घालून येते, मेकप पण करते..तू घरातलीच साडी आणि लिपस्टिक पण नाही लावत कधी..तू नको येऊ..” मी त्यावेळी तिच्याकडे न पाहताच वर्गाकडे पळाले..मावशी काय वाटलं असेल तिला??
तरिही संध्याकाळी परत आल्यावर हातपाय धुण्यासाठी गरम पाणी आनंदाने काढून द्यायची. गरम उकडलेल्या शेंगा मला करुन द्यायची. सकाळी तिला काही बोल्ले याची धास्ती मला लागून रहायची, पप्पांना सांगेल की काय सतत भीती मला. ती काहीही रागवायची नाही, इतका पेशन्स कुठून येत असेल..हे वातावरण मला नकोसं होतं..माझ्या चुका सतत आठवण करुन देतं. माझं सगळं बालपण आठवतं.  मावशी खरंच सॉरी ..मी तुम्हाला रागानं बोल्ले”
“अगंबाई..मी तर विसरली पण..जाऊद्या..आईये ती,.एकवार भेटून या, बरं वाटंल माऊलीला..मी पाहतेय ना, तुम्ही येक दिवस तुमच्या कामाला खाडा करत नाई, तुमच्याच कडनं शिकले मी म्हणून माझे बी खाडे नाई बगा कामाला..पण आता मला बी सुट्टी पाईजेय..”
तितक्यात रमा तिथे आली, “ओ हॕलो..कसली सुट्टी? प्लिज, I will not cook anything..अजिबात सुट्टी वगैरे मिळणार नाही हा मावशी तुम्हाला. ए मीरा, please you say something re..”
मावशींनी मुकाट ऐकून घेतलं, मीराकडे पाहिलं आणि म्हणाल्या, “नका उगा कांगावा करु. मीराताईंच्या आईनं तुम्हा दोघींना त्या ओला कि फोला च्या गाडीनं बोलवलंय घरी, लागा तयारीला”
“what? what a surprise..am ready मी पॕकिंगला घेते” असं म्हणून रमा आत बॕग काढायला गेली.
“मावशी…मला काहीच सुचत नाहीये, काय बोलू..पण ठिके असंही work from home घेतलंय, अॉफिसला सुट्टी पडण्याची चिंता नाही. दोन मिनिटांत किती सोपं सोल्युशन शोधलंत तुम्ही. मी भेटून येते” एवढं बोलून आपोआपच मीराच्या चेहर्यावर स्माईल येत होतं.
मावशीही आनंदात होत्या, “मला फोन कराल कधी येता ते..मलाबी करमायचं नाई कामाबिगर, येते मी”
मावशी चप्पल सरकवत होत्या. मीराने पटकन जाऊन त्यांना मीठी मारली “थँक्यू मावशी!! तुमचा आजचा दिवस खूप खूप आनंदात रहावा”
मावशींना काहीच सुचलं नाही बोलायला, हसत हसत लवकर निघून गेल्या. बाहेरचे वादळही आता शांत झालं होतं.
-( सर्व मदतनीस मावशींना समर्पित. Thank you.
लेख कसा वाटला आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करा. )-
Article Categories:
मनोरंजन

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा