वारी…अद्दभूत सोहळा….

Written by

वारी…..जगातील ऐहिक सुख सोहळा….वारी म्हणजे श्रीमंती …नुसतीच श्रीमंती नाही तर गर्भश्रीमंती.. कित्येक पावले माऊलीच्या दर्शनासाठी आसुरलेली असतात .देहभान विसरुन हरीनामाचा जप करीत वारी चाललेली असते.कोणतेही गालबोट न लागता वारीचा सोहळा निर्विध्णपणे पार पडत असतो.ना कसली चिंता …ना कसला त्रास…वारीचा आनंद प्रत्येकजण ऊपभोगत असतो.अशा वारीच्या दैदीप्यमान नेत्रदिपक सोहळ्याची कवन करण्याची उमेद मनात आली….आणि ती उत्सुकतेने प्रकट झाली…..माऊलीच्या कृपेने काव्यरुपात ….!!

?वारी…अद्दभूत सोहळा……

वारकर्यांची निघाली वारी
निघाली स्वारी पंढरपूरी

बेभान होऊन घेतो दर्शन
माथा हा टेकतो अर्पितो मन

सर्वत्र ऐकू येतो विठु नामाचा गजर
भक्तांची केवळ माऊलीवर नजर

वारीला नसते कुणाचे निमंत्रण
ऊत्साहाने सहभागी होतो प्रत्येकजण

वारीची कोणतीही नसते जाहिरात
विठु माऊलीचा जप घराघरात

वारीसाठी कोणातेही प्रलोभन नसते
विठू माऊली मनामनात असते

वारीमध्ये कोणाचा कोणावर रुसवा नाही
आनंद सगळीकडे ओसंडून वाही

वारीत खायला मिळेल याची चिंता नसते
अन्नदात्याकडून सार्वामुखी मिष्टान मिळते

वारीचा कार्यक्रम निर्विध्णपणे पडतो पार
विठू माऊलीची महिमा अपार

वारीत गर्वाचा अहंकाराचा लवलेश नसतो
सदैव प्रेमाचा वर्षाव बरसत असतो

वारीचा थाट जगभरात वेगळा
वारी म्हणजे गर्भश्रीमंत ,दैदीप्यमान नेत्रदिपक सोहळा

अशी वारी डोळ्यांचे पारणं फेडणारी
सकलजणांचा उर भरणारी

एकच अट्टाहास आत्ता
तु सकळ जनांचा दाता
तुझ्या चरणी ठेवितो हा माथा

?जय विठू माऊली ?

—— नामदेव पाटील

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा