विचारांची उत्क्रांती ……

Written by

विचारांची उत्क्रांती ……

Charles Darwin एक खूप मोठा शास्त्रज्ञ.. एक नावाजलेला बियॉलॉजिस्ट आणि झिओलॉजिस्ट , त्याने एक थेअरी लिहिली आहे त्याला “Evolutionary Theory ” असे म्हणतात, आणि त्या थेअरी मध्ये त्याने “struggule for existanace ”  बद्दल आणि  “Survival of the fittest ” बद्दल निसर्गाचे काही नियम हि सांगितले आहे…या जगात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करताना चाललेल्या प्रयत्नांत जे काही उपयुक्त आणि परिस्तिथी शी सामना करण्यास योग्य आहे अशा प्रजाती पुढे जाणार आणि ज्या प्रजाती कठीन परिस्थिती चा सामना करू शकणार नाही त्या हळू हळू नामशेष होणार…..

या सर्व विषयाचा आपल्या आयुष्याशी काय संबंध ? काही उदाहरनांमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया..खूप लोकांची परिस्थिती वेगळी हि असू शकते पण खाली दिलेलं फक्त एक उदाहरण आहे असच समजा…

एका शेतकरी कुटुंबाचे अगदी सर्व काही शेतीवर अवलंबून, रोज शेतीमध्ये दिवस रात्र फक्त कष्ट करायचे, इकडून तिकडून कर्ज घ्यायचं आणि कसबस आलेलं पीक विकायला गेलं कि नसलेला बाजार भाव, शेवटी २-३ महिने मेहनत करून झालं कि हातात भेटते ती फक्त दमडी …एखाद्या वर्षी पाऊस कमी झाला किंवा अधिक जास्त झाला तरी कुठे ना कुठे नुकसान ठरलेलंच…मग काय हाती आलेलं नैराश्य आणि फक्त नकारात्मक विचार चालू होतात ..कर्ज कसं फेडायचं म्हणून अगदी आत्महत्या चा पण प्रयन्त सुद्धा होतो..कारण पुढे काही मार्ग दिसताच नाही, अश्यावेळी बाहेरची लोक तर सोडाच पण आपली जवळची लोक सुद्धा बोलायचे टाळतात…आणि इतर वेळेस फुकट मागदर्शन करणारे ” मार्गदर्शक ” जे तर दिसणारच नाहीत …

असाच काही तरी उद्योग धंद्यात पण चालू आहे, खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, वर कर्जाचा बोजा आणि वाढत चाललेलं व्याज .. या सर्व गोष्टींमुळे अलीकडेच अगदी मोठ्या मोठ्या कंपन्या  बंद करायची वेळ देखील आली आहे, कितीतरी शिकलेल्या मुलांना रोजगार भेटत नाही त्यामध्ये अजून बेरोजगारीची भर..

या सर्व गोष्टी का होत आहेत याचा जर का व्यवस्थित अभ्यास केला तर एका गोष्ट नक्की लक्ष्यात येईल कि या सर्व गोष्टीं मागे मुख्य कारण आहे “competition ” ……

आता शेती चा आणि “competition ” चा काय संबंध ? बाजार पेठ अगदी कशाचीही घ्या आवक जास्त असेल तर भाव कमी होणारच आणि त्या यामध्ये जो काही चांगला माल आहे त्याला जास्त भाव आणि प्रथम प्रायोरिटी, हेच तर आहे “competition ” …

“competition ” आणि “evolution ” चा काही संबंध आहे का?

“evolution ” म्हणजे नक्की काय? याचा अर्थ असाही होऊ शकतो का ” परिस्थिती नुसार आपल्या पारंपरिक विचारात आपल्याला स्वतःला च करावे लागणारे बदल” किंवा विचारांमध्ये झालेली उत्क्रांती ? आणि एकदा की विचारांत बदल झाला तर तेच बदल आपल्या कामामध्ये,शिक्षणा मध्ये, व्यवसाय, समाज आणि इतर सर्व गोष्टींमध्ये सुद्धा करावे लागतील…

परिस्तिथी नुसार आपल्या विचारांत किंवा काम करायच्या पद्धतीत आपण स्वतः बदल केले नाहीत तर
तुम्ही अगदी “competition ” च्या बाहेर फेकले गेले आहात असेच समजा…..
आणि “competition ” कशासाठी करायचं हे
“struggule for existanace ” आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी…… आणि परिस्थिती नुसार आपल्या स्वतः मध्ये का बदल करायचे तर
“Survival of the fittest ” कारण जो परिस्थिती चा सामना करण्या योग्य आहे तोच टिकणार आणि बाकीचं सर्व काही हळू हळू नामशेष होणार ….

याच उदाहरण म्हणजे सध्या private कंपन्या मध्ये असलेलं “परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टिम” वर्षातून अगदी कमीत कमी २ वेळा तुम्हाला तुम्ही आज पर्यंत काय केलं आणि भविष्यात तुम्ही कंपनीला किती फायदा करून देऊ शकता या गोष्टींना अनुसरून तुम्हाला दिला जाणारा feedback आणि त्यानुसार दिल जाणारं बोनस आणि इन्क्रीमेंट..
रोजच काही ना काही नवीन नवीन टेकनॉलॉजि येतच राहणार आणि त्या टेकनॉलॉजि बरोबर आपलं स्किल देखील आपल्याला update करावंच लागणार, नाही केलं तर कुठे ना कुठे आपण “competition ” च्या बाहेर चाललो हे नक्की …
परंपरा ह्या जपल्याच पाहिजे कारण त्या आपण आपल्या पूर्वजांपासून जपत आलो आहोत, पण बदलत्या काळानुसार आणि काळाच्या गरजेनुसार काही परंपरा या थोड्या बदलाव्या देखील लागतील. कारण पूर्वीच जग आणि आताच जग हे खूप बदललं आहे…

वर्तमान आणि पुढचे भविष्य ओळखून जो आपल्या स्वतः मध्ये, स्वतःच्या काम करायच्या पद्धतीत, आपल्या व्यवसायात बदल करतो तो कधीतरी यशस्वी होतो हे नक्कीच …बदल हा निसर्गाचा नियमच आहे आणि त्यानुसार आपल्याला सुद्धा बदलावं लागेल …नाही बदललो तर अंत काय आहे हे माहीतच आहे..

शेती व्यवसायाचं जे उदाहरण दिल आहे कारण हा व्यवसाय अजूनही खूप लोक पारंपरिक पद्धतीने करतात, त्यामागे भरपूर कारण देखील आहेत आणि बदलत हवामान , दुष्काळ , महागलेली मजुरी, शेतीसाठी लागणार खर्च ह्या सर्व गोष्टींची अजून भर …कमी खर्च आणि जास्त उत्पन्न कसं काय मिळू शकेल याचा अभ्यास कारण खूप गरजेचं आहे, काळानुसार आता शेती मध्ये कोणती पिके घायला हवीत याचा विचार देखील करायला हवा..शेतीचा फक्त पिकांसाठी उपयोग ना करता काही उद्योग सुरु करू शकतो का हे पण विचार करायला हवेत आणि या साठी गरज आहे योग्य मार्गदर्शनाची, मार्गदर्शन अश्या लोकांक कडूनच घेतलं पाहिजे ज्यांना या विषयी माहिती आहे, आजकाल मार्गदर्शन करणारी लोक खूप आहेत , पण तुम्हाला योग्य मार्गदर्शक नक्कीच शोधावा लागेल..

तसंच काहीतरी उद्योग धंद्याचं देखील आहे ..ग्राहक नेहमी कमी पैश्यांमध्ये जास्त चांगल्या प्रकारची वस्तू कशी घेऊ शकेल याचा विचार करतो आहे …अगदी रेस्टारेंट मध्ये सुद्धा कमी पैश्यात quality च आणि hygienic जेवण कुठे मिळेल हे पाहिलं जातंय ..वडापाव विकणारा आता हात मध्ये हँडग्लोव्हस घालतो आहे की नाही, Bouffant कॅप्स घालत आहे की नाही हे सर्व पाहिलं जात आहे ..

भारतात लोकसंख्या खूप आहे आणि पैसाही खूप आहे… पण ग्राहकांना आता काहीतरी नवीन हवं आहे ..”ऑरगॅनिक” असा ब्रँड लावलेल्या वस्तू किंवा पदार्थ असतील तर कितीही महाग असुद्या लोक खरेदी करायला तयार आहेत..चहाच उदाहरण घ्या ..पुण्यात “तंदूर चहा ” चा कन्सेप्ट आला आणि अगदी लोक १५-२० रुपये देऊन चहा पिण्यासाठी दुकानात गर्दी करू लागले…

शेवटी सांगायचं एवढाच की वेळ असतांनाच काळानुसार आपल्यालाही आपल्या वयक्तिक , व्यावसायिक आणि सामाजिक जीवनात बदल करावे लागतील..नाही तर वरचा नियम परत एकदा वाचा…

वरील सर्व विचार हे काल्पनिक आहेत, हा ब्लॉग फक्त आजूबाजूला जे काही चालू आहे त्याच निरीक्षण करून लिहिला आहे त्यामुळे विचारांमध्ये आणि अभ्यासा मध्ये तफावत देखील असू शकते ..

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत