#* विरहाचा क्षण*#

Written by

 

  #विरहाचा क्षण#

जन्माजन्मांतरीच्या नात्याला,

            साथ तुझी हवी….

जिवनाच्या पंतीला,

           वात तुझी हवी।।१।।

तु जाशील कुठेही,

          असशील जवळच….

आठवणीच्या जाळयात,

         अडकशील नकळतच।।२।।

रात्रीच्या शांततेत,

         हरवुन जाईल क्षण….

तुझ्या खांदयावर डोके ठेवायला,

       तरसुन जाईल मन।।३।।

झुळझुळणाऱ्या वाऱ्यात,

       सुगंध तुझा दरवळेल….

तुझ्या स्पर्शासाठी ना,

       नेहमीच मी तळमळेल।।४।।

पाणावलेले डोळे,

        उफानुन येतील तेव्हा…

चंद्राच्या कोरेत तुझा,

         चेहरा दिसेल जेव्हा।।५।।

माझे डोळे उघडताच,

        नेहमीच शोधतील तुला…..

अश्रुंच्या वर्षावात,

        वाहेल आठवणींचा थवा।।६।।

आली वेळ विरहाची,

     कठीण जाणाऱ्या क्षणांची…

   बघ ना वळुन….

हृदयाचा ठोका कसा, 

        अधुन मधून चुकतो….

 विरहाचा क्षण हा,

        नको नकोसा वाटतो….

विरहाचा क्षण हा,

        नको नकोसा वाटतो….।।७।।

©️अश्विनी दुरगकर

तळटिप:- सदर कवितेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे रखीव आहेत..

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा