विरहाचा क्षण…..

Written by

  

 मी किचनमधन काम आटपुन खोलीत आले आणि आरश्यात बघुन केस निट करीत होते… हे बसले होते नेहमी प्रमाणे माझी सवत हाती घेवुन… “मोबाईल”…. हो माझी सवत च… त्यात डोक खुसपुन बसले होते… मी ही माझ्या तंद्रितच होते…तेवढ्यात हे मागन आलेत आणि घट्ट मिठीत घेतल…. गळयावर चाव घेत भरल्या डोळयाने म्हणालेत…

      “हे बघ… बच्चू… स्वतः ची काळजी घेशील आणि माझ्या छोट्याश्या पिल्लुची पण”…

  मी अगदी वाऱ्यासारखे मागे वळले आणि आवाज रडका करुन विचारले,” आल काय हो confirmation”…

“ह्म्म्म्म्म्म्म्म्म”… उद्याच निघायच आहे”…

         मिट्ठि आणखीण घट्ट करुन दोघे ही एकामेकाच्या मिठीत हरवुन रडु लागलो…

“पाच महीने खुप होतात हो”

“ह्म्म्म्म्म्म्म”

 पुर्ण गाल भर पप्या घेत म्हणाली’” अहो… नका जावु ना… मी क़शी राहील तुमच्याविणा खुप असाहय होत मला”….

  हे फक्त मला मिठीत घेवुन अश्रु गाळीत होते…. तेवढ्यात आली ना आमची दोन वर्षाची किटकुल.. आम्हला वेगळ करायला… आम्हला बघताच…

“ऐ मम्मा, तुला सांगीतलय ना, माझे डॅडा आहे”… आणि पटकण यांच्या कडेवर गेली.. ती जवळ आली.. अन हे आणखीन रडु लागले तिला घेवुन… 

   त्या दोघांना अस बघन खुप दुखदायक होत… मी समजु शकते ship वर जायच आहे… त्यावरच आपल घर चालत… पण तिला.. त्या ईवल्याश्या जिवाला… कोण समजवणार…. खुप मोठी जवाबदारी आता माझ्या वाटेला येणार होती… सात समुद्रापलीकडे जाणाऱ्या मुलाच्या.. आई-बाबांची सुन नव्हे तर मुलगी बनुन काळजी घेण्याची… अंगा खांदयावर खेळणाऱ्या चिमुकल्या जिवाला आई बाबा दोघांच प्रेम देण्याची…आणि एक बायको म्हणुन दुर राहाण्या नवऱ्याशी प्रेमाच नात जपण्याची… स्वतःचे अश्रु लपवुन आता कंबर कसायची होती… माझ दुःख लपवुन सगळयांना सांभाळायच होत. माझ मलाच कळेनास झाल होत… जायची वेळ जवळ येत होती… हात पाय सुन्न होवु लागले होते… 

       पॅकिंग सुरु झाली… डोळयात अश्रु डबडबुन होते… नजरेला नजर भिडली की एकदम भावना उफानुन यायच्या… अश्रुंची लपवा छपवी खेळत पॅकिंग आटोपली… चार बॅग भरुन तयार होत्या… रात्री ८ वाजताची flight होती… ६:३० लाच निघायच होत… त्यांना मसाल्याचे वांगे आवडतात म्हणुन तडकाफडकी स्वयंपाक केला… ताट वाढुन तव्यावरच्या गरम गरम पोळया लागलीच करून दिल्या… 

“ह्म्म्म्म्म्म भाजी त मीठ जरा जास्तीच झालय”, हे म्हणालेत…

“खरच काय हो”…

“मग नाही तर काय…? तुला मगानपासन म्हणतोय आवर त्या खारट अश्रुंना… झाल तुझ समाधान… जाता जाता मुद्दाम अस जेवायला घातले आहेस मला?”..

“काही ही काय हो”… रडक्या स्वरात म्हणाले..

     

          जेवण आटोपल… एक एक वस्तु बरोबर घेतली की नाही म्हणुन मी वारंवार ईकडेतिकडे check करित होते…. शेविंग किट घेतली ना… charger, powerbank… sim cutter… आवश्यक व shipवर न भेटणाऱ्या प्रत्येक वस्तु आवार्जुन दिल्या होत्या… port वर कधी बाहेर जायला मिळेल न मिळेल.. देव जाने.. म्हणुन नको सको ते सगळ दिल होत…

       माझ्या आईकडन ख़ास मेव्याचे लाडु आले होते… लाडोबा साठी ते ही न विसरता बॅगेत घातले… ज़िशा मध्ये मध्ये लुडबुड करित होती…तिला कळल होत तिचे डॅडा कुठे तरी जाणार आहे.. 

    मी दोन तीन दिवसांआधी तिच्या मनात पार्श्वभुमी रंगवुन ठेवली होती की,” हे बघ शोना, आपले डॅडा आता ship वर जाणार आहेत. तु छान राहाशील ना”…

तर मोठया शाहाण्या स्वरात ती “हो, मम्मा मी तर Good Girl आहे ना”,म्हणाली होती… 

     पण आता प्रत्येक्षात तिच्यासमोर जातील तेव्हा काय प्रतिक्रिया देईल कुणास ठाउक… ऐरवी… तर कामानिमित्त बाहेर ज़री गेले तरी पोंगा फाडत बसायची… लपुन छपुन बाहेर जाव लागायच… या वेळेला तर तिच्या डोळयांसमोर निरोप घ्यावा लागेल… त्यातल्यात्यात फोन वर ही काही विशेष बोलण होणार नाही… port वर पोहोचल्यानंतर video call होईल… किती किती दिवस ऐकामेकाला बघायला ही मिळणार नाही… तिला खुप भारी जाणार आहेत हे दिवस.. आधी ती छोटी होती.. काही नाही कळायच.. पण गेले की ताप मात्र नेहमी काढायची.. ती सांगु नाही शकायची पण तिला कळायच की आपले डॅडा नाही आहेत… आता सगळ बोलता येत आणि कळत ही.. आता खरी फजीती होणार होती… तिची अन माझी ही… 

       हे तयार झालेत… बॅगस बाहेर काढल्या… आता मात्र अश्रुंना आवर घालन कठीण होत.. देवाला प्रार्थना केली.. आई-बाबांचा आशीर्वाद घेतला… पिल्लुचा जिवभर लाड केला… ती वारंवार त्यांचे अश्रु पुसत होती… एकामेकाला घट्ट मिठी दिली… आता परत कधी तो स्पर्श अनुभवायला मिळेल.. कुणास ठावुक… 

             यांनी डोक्यावरन हात फिरवला अन म्हणालेत,”सगळयांची काळजी घ्यायच्या नादात स्वतः विसरू नकोस”..

“ह्म्म्म्म्म्म…. तुम्ही तुमची काळजी घ्याल आणि हो लवकर या”… 

“ह्म्म्म्म्म्म”…..

     बॅग गाडित टाकल्या… आत बसले… दोघांच्याही हृदयाचे ठोके… गतीने धावत होते… हातातील हात सुटत नव्हता… डोळे भरुन एेकमेकांना बघत होतो… शेवटचा चेहरा आठवणींच्या पिटाऱ्यात साठवत होतो… 

      डॅडाला एकटच गाडीत बसलेल बघुन ज़िशा मोठ्याने रडु लागली… मम्मा जाते ना मी डॅडा सोबत… आरडा ओरडा करू लागली… तिला बघुन यांच मन बैचेन होवु लागल…गाडी सुरू झाली… 

    तसे तिचे रडणे वाढले… एेकामेकाचा हात सुटला… अश्रुंचा वेग वाढला… नेहमी प्रमाणे एकदा ही मागे वळुन न बघता … एका नाविकाने निरोप घेतला घरच्यांचा…. खुप अवघड होता तो विरहाचा क्षण.. एका नवऱ्या बायकोसाठी आणि त्याहुनही जास्त एका बाप लेकी साठी… 

       

विरहाचा क्षण…

जन्माजन्मांतरीच्या नात्याला,

            साथ तुझी हवी….

जिवनाच्या पंतीला,

           वात तुझी हवी।।१।।

तु जाशील कुठेही,

          असशील जवळच….

आठवणीच्या जाळयात,

         अडकशील नकळतच।।२।।

रात्रीच्या शांततेत,

         हरवुन जाईल क्षण….

तुझ्या खांदयावर डोके ठेवायला,

       तरसुन जाईल मन।।३।।

झुळझुळणाऱ्या वाऱ्यात,

       सुगंध तुझा दरवळेल….

तुझ्या स्पर्शासाठी ना,

       नेहमीच मी तळमळेल।।४।।

पाणावलेले डोळे,

        उफानुन येतील तेव्हा…

चंद्राच्या कोरेत तुझा,

         चेहरा दिसेल जेव्हा।।५।।

माझे डोळे उघडताच,

        नेहमीच शोधतील तुला…..

अश्रुंच्या वर्षावात,

        वाहेल आठवणींचा थवा।।६।।

आली वेळ विरहाची,

     कठीण जाणाऱ्या क्षणांची…

   बघ ना वळुन….

हृदयाचा ठोका कसा, 

        अधुन मधून चुकतो….

 विरहाचा क्षण हा,

        नको नकोसा वाटतो….

विरहाचा क्षण हा,

        नको नकोसा वाटतो….।।७।।

   इच्छा असो नको आम्हाला या विरहाच्या क्षणातन जावच लागत… पण तरीही मला कायम गर्व राहील की, मी एका नाविकाची बायको….

    मैत्रीणींनो कथा आवडल्यास प्रतिक्रिया नक्की दया…. वाचायला आवडलील….

  

शुद्धलेखनाच्या चुकांना कृपया माफी द्यावी…. ??

धन्यवाद…!

©️अश्विनी दुरगकर ✍?

Article Categories:
प्रेम

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा