विरहा नंतरच प्रेम…… एक प्रेमकहाणी

Written by
 1. #प्रेमकथा

  दीक्षा BSC फायनल च्या शेवटच्या वर्षाला, त्यानंतर मानसशास्त्रात MSC करण्याचा तिचा मानस.
  दिसायला नाजूक, सुंदर पाहताक्षणीच कोणीही प्रेमात पडावं असं तीच रूप. कॉलेज मध्ये एक हुशार व्यक्तिमत्व म्हणून तिची ओळख.मैत्रिणी खूप ,पण मुलांशी मात्र खास मित्र म्हणून अस कोणी नाही.
  आज तिचा शेवटचा पेपर झाला, मैत्रीनिसोबत चर्चा झाली, कुठे फिरायला जायचं, पुढं काय करायचं…..
  घरी आली…..हुश्श! सुटलो एकदाच, निदान काही दिवस तरी,अभ्यास आणि प्रॅक्टिकल्स मधून….काही दिवस आराम करून तिला MSC च्या तयारीसाठी लागावं लागणार होतं. तीच सायकयट्रिक्सच स्वप्न पूर्ण करायचं होत. विचार करतच ती कधी निद्रादेवीच्या अधीन गेली, कळलं सुद्धा नाही, एकदम संध्याकाळी तिला जाग आली, फ़्रेश होऊन कुठेतरी फिरायला जाऊ म्हणून आईबाबांच्या रूममध्ये गेली….दीक्षा-,बाबा , आज ना आपण कुठेतरी लांब फिरायला जाऊ, कित्ती दिवस झाले अभ्यासमुळे कुठे जाताच आलं नाही,”जायचं ना बाबा आपण”.
  पण…
  बाबा मात्र आपल्याच विचारात.
  दीक्षा-“अहो , बाबा ऐकताय ना, मी काय म्हणतेय ते!
  बाबा-अग, हो ऐकतोय, बोल ना!
  अच्छा, अच्छा, फिरायला ना, हो जाऊयात की आपण….
  पण बेटा, थोडं माझं म्हणणं ऐकशील का?
  अहो बाबा, असं का म्हणताय! मी कधी तुम्हा दोघांचं ऐकलं नाही, असं कधी झालंय का?
  बाबा-हो रे माझ्या राजा.?
  अग, ते माझे मित्र आहेत ना पुण्याचे, त्यांच्या नात्यातील एक डॉक्टर मुलगा आहे, त्यांचं स्थळ सुचवले आहे तुझ्यासाठी.तोच विचार करतोय.
  मुलगा डॉक्टर आहें, घरदार छान आहे, मेन म्हणजे ओळखीतला आहे.
  दीक्षा-“हे हो काय बाबा नवीनच,” तुम्हाला माहितेय ना, मला MSC करायचंय सायकॉलॉजि मध्ये…..आणि आताच तर परीक्षा संपलीय माझी.
  बाबा-अग, हो धीर धर, फक्त स्थळच तर आलंय, पक्के थोडीच करतोय आपण लग्न.
  दीक्षा- हो, मग चालेल….चला आता विषय बंद. कुठेतरी लॉंग ड्राईव्ह ला जाऊयात आपण आज, आणि हो,”आज जेवण पण बाहेरच”, हो कींनइ ग आई!
  आई-हो ग बाई? मला आज स्वयंपाकाला सुट्टी.
  ————————————–
  पाच-सहा दिवसानि दीक्षाच्या बाबांनी माझे मित्र घरी जेवायला येणार म्हणून पार्टी ठेवली. शरदराव ,त्यांचे नात्यातले मित्र, आणि त्यांचा मुलगा सारंग घरी आले. छान स्वागत झालं.?जेवण झाली, मोठ्यांच्या गप्पा रंगल्या,त्यात आपन काय भाग घ्यायचा म्हणून सारंग ला दीक्षा आपल्या रूममध्ये घेऊन गेली, आणि त्या दोघांच्या पण मस्त गप्पा रंगल्या. वेळ कसा गेला कळलं सुद्धा नाहीं, mobile no. ची देवाणघेवाण झाली, messages पासून सुरवात झाली,नकळतच ते दोघे छान मित्र झाले.
  मध्ये मधे दोघे फिरायला पण जायचे, बरेचदा दीक्षा त्याच्या clinicl ला पण जायची, तीच सायकयट्रिकच स्वन तिने सारंगला सांगितलंच होत.(पण ही फक्त मैत्री होती) त्यापलीकडे दिक्षाच्या मनात काहीच नव्हतं. पन सारंग च्या मनात मात्र तिच्याबद्दल प्रेम होतं, पण कस prpose करावं….तिला राग तर नाही ना येणार?
  अध्यातच फेब्रुवारी महिना आला, (vaentine day) सारंग ला एक चांगलं निमित्त्य मिळालं… चॉकलेट डे झालं,rose डे झालं, teddi डे झालं,( मैत्री मध्ये हे चालतच) म्हणून दिक्षाला काही वाटलं नाही….. पण आता आला prpose डे….आणि त्या दिवशी त्याने दिक्षाला prpose केलं….”I LOVE YOU”
  दीक्षा एकदम चिडली, हे रे काय? मी तुला फक्त एक चांगला मित्र मानते.माझ्या मनात असं काहीच नाहीं.
  तिला त्याचा खुप राग आला.
  सगळी मुलं ना अशीच असतात, थोडी मैत्री काय केली, की त्याला प्रेमच समजतात?
  ————————————-
  अशातच पंधरा दिवसाकरिता सारंग ला दिल्लीला जावं लागलं, दोघात अबोला तर होताच, पण करणार काय?
  दिक्षाला मात्र आता खूप एकटं एकटं वाटू लागलं, आपल्याला सारखी सारंगची आठवण का येतेय?तो तर फक्त आपला मित्र ना? ही असली हुरहूर का वाटतेय मला,आपल्याला सुद्धा प्रेम तर नाही झालंय ना! तिकडे सारंग च्या बाबतीतही नेमकं तेच! दोघेही एकमेकांना खूप मिस करत होते. एकमेकांच्या फोनची वाट बघत होते.फोनची रिंग वाजली की दीक्षा धावत जाऊन बघायची, पण…..(म्हणतात ना, खरा आपलेपणा हा आपली जवळची व्यक्ती दूर गेल्यानंतर जास्त जाणवतो)असच काहीसं दिक्षाच्या बाबतीत झालं होतं.
  विरह काय असतो? हे दोघांना कळून चुकलं.आपण दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाही हे त्यांना कळलं.परत आल्यानंतर घरच्यांना सांगून लग्न करायचं अस ठरलं.
  ———————————–
  आणी आज सारंग परत येणार….दीक्षा खूप खुश?
  कधी एकदा सारंगला भेटीन अस झालंय.
  तिची लगबग घरच्यांच्या लक्षात आली. आई बाबा दोघेही हसत होते.दोघांचीही घनिष्टता दोन्ही घरी कळलीच होती, पण होकार मात्र मुलांकडूनच घ्यावा अस ठरलं होतं.पण आता तो क्षण आला होता.घरचे सगळे तयारीतच होतें. वाट होती फक्त दोघांच्या होकाराची.
  हो…..तर सारंग आला, त्याला घ्यायला दीक्षा छान गुलाबी रंगांची साडी नेसून ,छान तयार होऊन एअरपोर्ट ला गेली…..सारंग तिला पाहताच घायल झाला.,
  Ohhh मेरे सपणो की राणी…. त्याने स्वतःलाच चीमटा घेतला.
  (पण लगेच भानावर असला)
  आज तीच रूप खूप वेगळच भासत होत, चेहऱ्यावर लाली पसरली होती,त्याला अस असपल्याकडे पाहताना ती लाजून चुर झाली होती.सारंगणे तिच्या खांद्यावर हात ठेवला,तशी ती एकदम भानावर आली….आणि एकदम त्याच्या मीठीत सामावली….आणि रडायला लागली.
  Heyyy ! हे काय!राणीसाहेब, आपण aairport वर आहोत. लोक बघतायत आपल्याकडे.
  तशी ती एकदम बाजूला झाली,आणि आपले डोळे पुसू लागली.
  अग..…मी आलोय, आता आपण नेहमीसाठीच एकत्र येणार आहोत. चल आता घरी जाऊया. सगळी आपली वाट बघत असतील.
  दीक्षा सारंग घरी आले, दोघेही लग्नाला तयार आहेत म्हटल्यावर बाबा म्हणाले, अग पण तू तर आत्ता लग्नाला तयार नव्हातीस ना?
  दीक्षा-लटक्या रागानेच बाबा….
  काय हो हे!
  बाबा गडगडाटी हसले, आणि तेवध्यातच सारंग चे आई बाबा पण आले, सार काही तयारच होतं. त्यांच्या हास्यात सारे सामील झाले. दोघांचं लग्न ठरलं,सारंगच्या नावाची हळद लागली ,मेहंदी लागली,आणि सोंनपावलाणी दीक्षाने सरंगच्या घरात लक्ष्मीच्या रूपाने पाऊल ठेवले.
  असज दोघेही खूप खुश आहेत.सारंग एक नामांकित डॉक्टर तर दीक्षा उत्तम सायकयट्रिक्स….
  अस हे Arrange Cum Love Couple??

  लता राठी

  (कृपया शुद्धलेखनाच्या चुका माफ कराव्यात)

  आवडल्यास नक्की like, comment करा,आणि मला follow करायला विसरू नका
  ?
  Share करायचे असल्यास नावासकट share करावे.
  फोटो-साभार google

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा