#विश्वासातील प्रेम भाग 1

Written by

रुची… जिची रचना अशी चित्रांत किंवा शब्दात न करता येणारी. दिसायला म्हणाल तर खूप सुंदर पण साधीशी. सर्वांची लाडकी. तिला एक मोठा भाऊ. ज्याचं तिच्यावर जीवापाड प्रेम. कोणत्याही मुलाची रुचीशी मैत्री करायची हिंम्मत नाही झाली. कारण तिचा भाऊच असा होता. विश्वा.. खर नाव तर विश्वासराव पण आता विश्वाभाई झाला. गल्लीतील नेत्याच्या हाताखाली वावरायचा. कधी कधी वसुलीची कामे पण करायचा. आई वडिलांनी तर त्यांना एक मुलगा आहे हे विचार करणेच सोडून दिलेलं. विश्वा पण फक्त रुचीसाठी घरी यायचा. उशिरा जरी दादा आलाना तरी ती झोपेतून उठून स्वतःच्या हाताने त्याला खाऊ घालायची. रुचीला पण दादाच वागणं पटत नव्हतं. पण रुचीच कस असायचं माहिती का, तीलाना लोकांची मन जपायला खूप आवडायचं.. कोणी नाराज झालेलं जराही आवडायचं नाही…म्हणून ती कधी कधी हो ला हो म्हणून द्यायची.. रुचीचे बाबा नेहमी म्हणायचे रुची म्हणजे विश्वास.. कारण रुची होतीच अशी सर्व गोष्टी घरी सांगून घरच्यांचं मार्गदर्शन घेऊनच करायची…
अश्यातच रुची मोठी झाली… 10th मध्ये तिला 89% मिळाले. बाबा एकदम खुश.. पूर्ण चाळीत त्यांनी पेढे वाटले… मुलीने नाव काढलं आपलं म्हणून बाबांना हेवा वाटू लागला. त्यांनी तिला मोबाईल दिला… पण तिचा विश्वा दादा नव्हता. तो दोन तीन वर्षासाठी बाहेर गेलेला. खूप महत्त्वाचं काम आहे असं सांगून. रुची थोडी नाराज झाली पण विश्वा दादाला फोन करून तीने कळवलं त्याला पण खूप आनंद झाला. रुचीला पुढे कॉलेजमध्ये ऍडमिशन साठी खटाटोप करावा लागणार होता. कारण सरकारने सर्वच ऑनलाईन केलेलं. तिने कॉमर्स क्षेत्रात जायचे निवडले. ऍडमिशन वैगेरे झाले आणि कॉलेजमध्ये जायचा दिवस उजाडला. रुचीला मनासारखं कॉलेज मिळालं. ती तर खूपच खुश होती. मुळात तिच्या शाळेचा अर्धा ग्रुप सुद्धा त्याच कॉलेजमध्ये होता म्हणुन तिला एकटीला पडण्याचं करण नव्हतं. नवीन ओळखी सुद्धा झाल्या. सर्व एकदम स्वप्नासारखं घडत होतं.. त्यातच व्हाट्सए मध्ये एक ग्रुप तैयार झाला… वर्गातले सर्वच त्या ग्रुपवर होते…रुचीला खूप गंमत वाटत होती. हळूच ती काही जणांचे dp ओपन करून पहायची.. काही जणांचे बोलण्यापेक्षा फक्त हार्दिकचे. खूप बोलका, मनमिळाऊ हार्दिक रूची ला आवडू लागलेला… पण रुचीला प्रेम हे chapter आपल्या आयुष्यात नको होतं.. बाबा बोलतील तेच. आणि विश्वा दादाच्या भीतीने ती हे करूच शकणार नव्हती.. अश्यातच रूचीने FB ओपन केले… तिने त्यात सुद्धा पाहिलं नाव search केलं असेल तर ते हार्दिकचे. त्याचे फोटो ती खूप वेळ न्याहाळत बसायची. खूप आवडायचा तो तिला. दोन दिवसांनी तिने FBओपन केलं नि हार्दीकचे नाव शोधणार तितक्यात तिला notification आलेली…1 फ्रेंड रिव्हेस्ट ची… आणि ती हार्दीक कडून होती.. तिचे हृदय जोरात धडधुडू लागले.. कानातून गरम वाफा येऊ लागल्या.. आजचा दिवस तिच्यासाठी खूप मस्त जाणार… मॅडम कधी न सजणाऱ्या दोन तीन वेळा hairstyle करत होत्या.. पण आज तिला हवे तसे केस मात्र विंचरले जातच नव्हते… आज काय करू नि काय नकोस… नवीन ड्रेस काढला.. ईस्त्री केली… मस्त पैकी घातला.. पुन्हा केस सोडले.. थोडासा पफ काढला दोन पिना खुपसल्या केसात.. स्वतःशीच हसली आणि मनातल्या मनात बोलली परफेक्ट…. तितक्यात जोतीने आवाज दिला… चल लवकर नाही तर प्रॅक्टिकल चुकेल आपली… आई येते… म्हणून मॅडम धूम ठोकत पळाल्या….
दोघीही बसची वाट बघत गप्पा मारत बसल्या.. बस आली रुचीला कधी कॉलेजमध्ये पोहचते अस झालेलं. ती जशी कॉलेजच्या गेट जवळ पोहचली. तशी तिची नजर हार्दिकला शोधू लागली.. आणि हार्दिक दुरूनच तिला कॉलेजच्या गेट जवळ नोटिस बोर्ड वर काहीतरी वाचत आहे असं दिसला… आणि सगळा कॉलेजचा ग्रुप सुद्धा आहे हे ही दिसलं.. तिने लगेच तिची नजर त्याच्यावरून फिरवली आणि रियाशी बोलत कॉलेजमध्ये शिरली.. नोटीस बोर्डवर नक्की काय लिहिलय हे बघायला रुची सुद्धा पुढे गेली.. पण हार्दिकच जर सुद्धा लक्ष नाही आपल्याकडे म्हणून मनातून खूप चिडली.. तितक्यात ज्योती मोठ्याने ओरडली.. अग रुची काय लिहिलंय सांगशील का.. practicle चालू होईल.. तेव्हा हार्दीक ज्योतीकडे जाऊन म्हणाला अग फ्रेशरस पार्टी आहे उद्या.. त्याची नोटिफिकेशन लागलीय…हार्दीकच आपल्याकडे लक्षच नाही हे बघुन रुचीने पण ignore केले… तिघ आता प्रॅक्टिकल साठी वळणार तितक्यात हार्दिकच लक्ष रुचीकडे गेले.. आणि तो बघतच राहिला.. रुचीने हळूच हार्दिककडे बघितलं आणि हार्दिकने पटकन नजर हटवून दुसरीकडे बघू लागला.. प्रॅक्टिकल चालू झाली. हार्दिक बरोबर रुचीच्या बाजूच्याच बेंचवर बसला.. ही पहिलीच प्रॅक्टिकल होती म्हणून सरांनी आधी बेसिक गोष्टी सांगायला सुरुवात केली.. हार्दिकच पूर्ण लक्ष आता रुचीकडेच होत.. रुची मात्र एकदम कटाक्ष देऊन ऐकत होती.. आणि महत्वाच्या गोष्टी ती वहीत नोंदवू लागली. हार्दिक आता हळूच चोरून तिला बघत होता आणि मध्येच सरांकडे लक्ष देत.. अश्यातच प्रॅक्टिकल संपली.
हार्दिकला आता काहीतरी कारण काढून रुचीशी बोलायचंच होत.
हार्दिकने रुचीला आवाज दिला…
हार्दिक आपल्याला आवाज देतोय हे बघून रुचीला खूप घाबरायला झाले.. तीच हृदय धडधडू लागले.. थोडी चलबिचल सुद्धा झाली . आणि तिने बाजूच्या बेंचवर आपली नजर फिरवली.. हार्दिक तिथेच बाजूला बसलेला.. मनात बोलली की हा इथेच बसलेला… माझं लक्षच नाही…
हार्दिक : हेय रूची thanks
रुची : thanks कश्याबद्दल
हार्दिक : तू माझी request accept केलीस ना..
रुची : हम्म
हार्दिक : ऐकना मला तुझी प्रॅक्टिकल बुक देना.. मी काही नोटच नाही केलं ग..
रुची : घेना..
( रुचीने सरळ बुक काढून दिली…)
हार्दिक : उद्या दिली तर चालेल का…
रुचीला आता नाही बोलायला जमनारच नव्हतं… तिने फक्त हम्म केलं. इथे हार्दिक खुश आणि तिथे रुची…
रुचीला प्रेम हा विषय नको होता पण ती आता खरच त्यात बुडत चालली..
उद्या फ्रेशरस पार्टी होणार म्हणून कॉलेज लवकर सोडण्यात आलेलं. रुची रिया बरोबर आली. रिया एकटीच बडबड करत होती.. पण रुची मात्र पूर्ण हार्दिकचेच शब्द आठवून मनातल्या मनात सुखावत होती..
रुची घरी आली बेग ठेवली. आणि लागलीच उद्यासाठीचा ड्रेस शोधायला लागली. एकही ड्रेस मनासारखा मिळत नव्हता तिला. पूर्ण पसारा केलेला बघून आई सुद्धा विचारात पडली..
आई : अग आधी कपडे बद्दलशील का नाही. काय पसारा घातलास बघ..
रुची : अग.. आई उद्या कॉलेजमध्ये फ्रेशरस पार्टी आहे ग.. माझ्याकडे एक सुद्धा चांगला ड्रेस नाही..
आई : पर्वाच शिवायला एक दिलास की ग बाळा.. तो झाला का बघ. तो पण छानच होताना..
रुची खूप खुश झाली.. आईला मिठी मारू लागली….एक आईचा मुका घेत ती आईला म्हणते.. आई तू माझी जादूची छडी आहे ग.. तुझ्याकडे सगळ्या गोष्टीच सोल्युशन मला भेटत.. लव्ह यु आई….
आईला पण भरून येत आणि ती विषय बदलायचा म्हणून तिला कपडे बदल आणि ड्रेस घेऊन ये अस म्हणते.
आई : दादाचा काही फोन आलेला का ग..?
रुची : नाही ग आई, बिझी असेल ग. वेळ मिळाला की करेल
आई : काय नशिबात लिहिलंय आमच्या देव जाणे. नको त्या संगतीत पडून वाया गेला पोरगा. एकाचे दोन हात केले तर मी तरी सुटेल पण कोणी पोरगी तरी द्यायला हवी ना. एका गुंड्याशी कोण लग्न करेल..
रुची : आई, दादाला अस गुंडा नको ग बोलू. हे बघ इथे आला ना मग मी बोलेल त्याच्याशी मग तर झालं..
आई पण डोळ्यातलं पाणी लपवाव म्हणून आत निघून गेली..
रुची उद्याच्या विचारात मग्न झाली. जेवली, बाबांसोबत इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि झोपली…
अलार्म वाजायच्या आत रुची उठली.. मस्त पैकी फ्रेश झाली. आईला घरकामात मदत केली. पार्टीला जायला कधीची 15 मिनट आधीच तैयार होऊन बसली पण ज्योती आली नाही म्हणून फोन लावणार तितक्यात मॅडमनी आवाज दिला. दोघीही निघाल्या. बस सुद्धा वेळेवर भेटली.. रुची कॉलज मध्ये गेली पण हार्दिक काही आला नव्हता. रुचीची नजर हार्दिकला शोधू लागली. तितक्यात anouncement झाली की
he guys , Our fresher’s are giving us some surprise performance to you guys, hope so u will enjoy it…
आणि परफॉर्मन्स चालू झाला. रुची आणि ज्योती सेकंड बेंचवर बघून बघत होत्या.. आणि गाणं सुरू झालं.. “आंखे खुली हो या हो बंद…” आणि स्टेज वरची मूल उजव्या हाताने टिचकी मारत सरळ फिरली… रुची बघते तर काय 5 जण स्टेज वर आणि समोर हार्दिक.. जस जसे गाणं सुरू झालं. तस तसा हार्दिक एक दम मस्त नाचत होता.. रुचीला विचारलं असत ना तर हार्दिक सोडून तिने कोणाला बघितलं सुद्धा नव्हतं.. हार्दिक प्रत्येक वेळेला रुचीकडे बघत होता.. हे आता कॉलेजमध्ये सगळ्यांनी नोटीस केलं.. रिमिक्स गाण्यामध्ये हार्दिकला नाचताना बघून रुची पूर्णच प्रेमात पडली हार्दीकच्या.. आता रुचीच्या फेव्हरेट गाणं लागल ” गालावर खळी डोळ्यात धुंदी… आणि शेवटी जेव्हा *आय लव्ह यु* येत तेव्हा हार्दीक रुचीच्याच डोळ्यांत डोळे घालून एक इशारा करून तिला त्याच्या प्रेमाची कबुली देतो.. ज्योतीला हे कळत.. ती पण मस्तीत रुचीला हाताच्या कोपऱ्याने कोपर मारून चिडवते.. रुची लाजेने चुरर होते.. आणि खूप घाबरते पण.. डान्स आणि गेम्स संपवून आता सगळे जेवण्यासाठी वळतात… इथे सगळे सिनियर हार्दीकला अभिनंदन करतात. आणि तिथे रुची ज्योतीला घेऊन जेवणासाठी वळते. सगळेच एकत्र ग्रुपमध्ये जेऊया अस बोलून ज्योती रुचीला थांबवते. सगळा ग्रुप जमेपर्यंत रुची हार्दिकडे चोरून बघत असते. हार्दिकचही लक्ष जात. तेव्हा रुची मुद्दामून मोबाइलला मध्ये काहीतरी उगाच बघायचं म्हणून बघते.. त्यात तिला एक व्हाट्सए मेसेज आल्याच कळत. हार्दिकने केलेला असतो. मोबाईल सायलेंट मोड वर असल्यामुळे रुचीला काळात नाही. वेळ बरोबर 11 वाजताची असते. रुची विचार करू लागली म्हणजे ह्याने मला जेव्हा मी कॉलेज मध्ये अली तेव्हाच बघितलं होत तर. तिने मेसेज वाचला त्यात Looking Gorgeous. अस होत.. तिने thanks म्हणून रिप्लाय केला.. तितक्यात ज्योती बोलली मॅडम चला जेवण घेऊ का कोणाची वाट बघायची अजून.. ज्योती काहीही हा.. चल अस बोलून रुचीने लाजून वेळ मारून दिली. ज्योती पाणि घ्यायला गेलीं अन रुची हातात ताट घेऊन ग्रुप शोधत होती. तितक्यात हार्दिकने आवाज दिला..
हार्दिक : हेय हाय रुची
रुची : हॅलो. खूप मस्त नाचतोस.
हार्दिक : हो का. म्हणून तू एवढ मन लावून बघत होतीस का?
रुची : अस काही नाही. पण खरच छान नाचतोस. keep it up.
तू जेवणार नाहीस.
हार्दिक : गर्दी बघ ना ग किती आहे. मी नंतर जेवेल.
रुची मागे बघते तर खरच जेवण घेण्यासाठी खूप गर्दी असते.
रुची : If u don’t mind. तू ह्यातलं घेऊ शकतोस.
हार्दिक : thanks, बट अस नाही चांगलं दिसत ग. तू कर सुरुवात. मी घेतो मग.
अस बोलून तो निघाला. अन रुची पुन्हा ग्रुप शोधायला लागली आणि फायनली तिला ग्रुप मिळाला. ती त्यांच्यासोबत जाऊन जेवणार तोच तिला मागून कोणी तरी आवाज दिला.
ती मागे वळून बघते तर कोणी तरी सिनियर मुलगा होता. ज्याला ती ओळखत सुद्धा नव्हती.
ती तिला बोलतो हाय मी राज
रुची : सो व्हॉट
राज हात पुढे करुन रचीला बोलतो. मला तुझ्याशी मैत्री करायला आवडेल.
रुची : मला अनोळखी लोकांशी बोलायला जरा सुध्दा आवडत नाही. एवढ बोलून ती तोंड फिरवते.
राजचे मित्र सगळे त्याला हसतात. राजला पहिल्यांदाच कोणी तरी मैत्रीसाठी नकार दिलेला. हे बघुन राजला रुचीचा खूप राग आला. तो पुन्हा तिच्या मागे जाऊन बोलू लागला.
रुची प्लीज एक मिनिटे माझं ऐकून घेशील. अस बोलून तो तिची ओढणी खेचतो. आणि प्लीज अस म्हणतो..
रुची तिथेच थांबते..
फक्त फ्रेण्ड म्हणूनतरी बोल ना. आणि पुन्हा हात पुढे करतो. रुची खूप घाबरते. आणि काहीही न बोलता ओढणी खेचते आणि तशीच निघून पुढे जाते. ती जेवणच ताट तसच ठेवते आणि निघून जाणार तितक्यात हार्दिक गेट वर दिसतो. तो मित्रांशी बोलत असतो. रुची त्यांच्याशीही न बोलता मान खाली जाऊन घरी जायला निघते. हार्दिकला कळत नाही ती अस का करते. तो ही तिच्या मागे जातो. पण रुची खूप घाईत पळत जाते आणि रिक्षा ला थांबायला सांगून निघूनही जाते. हार्दिकला ही खूप टेन्शन येत ही अस का करते. तो आतमध्ये जातो ज्योतीला विचारतो.
हार्दिक : रुचीला काय झालं. ती अशी घरी का गेली
ज्योती : घरी गेली.. कधी? इथेच तर होताना. तुझ्याशी बोलत.
तुम्हाला डिस्टर्ब नको म्हणून मी तिला आवाज नाही दिला.
हार्दिक : प्लीज तिला काय झालं बघ ना..
ज्योती : तू काळजी करू नकोस मी बघते.
अस बोलून ज्योती तिला फोन लावते पण रुचीचा फोन सायलेंटवर असतो ती उचलत नाही. हे बघून हार्दीक आणि ज्योतीला खूप काळजी वाटते. तो ज्योतीला सांगतो. ज्योती प्लीज तू तिच्या घरी जाऊन बघशील का काय झालं तिला. ज्योती हो बोलते आणि निघते.

क्रमशः
©भावना विनेश भूतल

Article Categories:
प्रेम

Comments

  • Khup chan..

    Gauri 15th ऑक्टोबर 2019 4:55 pm उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत