विश्वासातील प्रेम भाग 3

Written by

रूचीला एवढया लवकर घरी बघून आईला खूप काळजी वाटली. रूची बेग ठेवून सरळ बेडवर झोपली. ती तापणे सुद्धा फनफणत होती.
आई : काय होतंय ग बाळा? (आई चिंतेने विचारू लागली.)
रुची : अग जिन्यावरून पडली मी. हाताला लागलंय.
आई रुचीचा हात बघते तर… खूप रक्त आणि जखम झाल्यासारखा झालेला. तिच्या अंगाला हात लावून बघते तर ताप भरलेला तिला.
चल डॉक्टरकडे जाऊन येऊ म्हणून आई रुचीच्या मागे लागली. आणि तिला डॉक्टरकडे घेउन गेली.
डॉक्टरांनी तीच्या हाताला पट्टी लावली. आणि औषध दिली. थोडे दिवस हाताची हालचाल नको म्हणून देखील सांगितले.
रुची घरी आली तेच औषध पिऊन झोपली.
इथे हार्दिकला कळतं की तिला आज कशाप्रकारे राज ने ढकललं. आणि तो लागलीच राजला मारायला जातो. तो जेव्हा वर्गात जातो तेव्हा राज वर्गात नसतो. त्याच्या वर्गात एकाला विचारल्यावर त्याला कळत की तो कॅन्टीनमध्ये आहे. म्हणून तो कॅन्टीनमध्ये जातो. तिथे राज मित्रानसोबत सिगरेट फुकत बसलेला असतो. हार्दिक जाऊन त्याची कॉलर पकडतो. आणि जाब उचरतो. राज उडवाउडवीची उत्तर देतो. शब्दांनी शब्द वाढतो. दोघांत खूप मारामारी होते. राजचा मित्र एक थंडयाची बाटली घेऊन हार्दिकच्या डोक्यात फोडतो. हार्दिक वेदनेने विव्हळत खाली पडतो. आणि तशीच रुची मोठ्याने किंचाळत उठते. तिला अस किंचाळत उठलेल बघून आईसुद्धा घाबरते. रुची आईला बोलते आई अग मी खूप बेकार स्वप्न बघितलं ग. आई तिची समजूत काढते आणि तिला परत झोपायला सांगते. व मी बाजारात जाऊन येते असे सांगते. ती फोन घेते बघते तर 6.30 झाले असतात. कॉलेज सुटून गेलं असेल. फोनवर हार्दिकचे मेसेज असतात. आता ताप पण बऱ्यापैकी उतरला असतो. आता हार्दिकच्या चिंतेने तिला फार अस्वस्थ वाटत असते. आई सुद्धा बाजारात गेली असते. ती हार्दिकच्या व्हॉट्सएप प्रोफाईलवर लास्ट सीन बघते. ३.३० असा त्याचा लास्ट सीन असतो. 3.30 वाजता त्याने रूचीला कस वाटतय आता? असा मेसेज केलेला असतो.
रूची : सॉरी मी आल्या आल्या डॉक्टरकडे गेली आणि झोपून गेली. तुला पोहचल्याचा मेसेज करायला विसरले.
रुचीने मुद्दामून हार्दिक बरा आहे का हे बघण्यासाठी मेसेज केलेला असतो. हार्दिक ऑनलाइन नसतो त्यामुळे त्याला कळत नाही. इथे रुचीला काहीच कळत नाही काय कराव. हार्दिक खरच बरा असेलना. अस का स्वप्न पडल मला. पुन्हा तिच्या डोक्यात प्रश्नाचा डोंगर उभा राहायला लागतो. 1 मिनिट तिला आता एक तासासारखे वाटायला लागतात. ती लगेच ज्योतीला फोन लावते.
रूची : हॅलो
ज्योती : अग आता कस वाटतय तुला. मी आलेली तुला भेटायला. तू झोपली होतीस ग. म्हणून काकूंना म्हटलं झोपू दे.
रूची : हो आता बर वाटत ग. सगळ नीट आहेना ग कॉलेजमध्ये.
ज्योती : हो ग. का काय झालं?
रूची : नाही काही नाही ग. लेक्चर सर्व झाले का कॉलेजमध्ये.
ज्योती : सगळे नाही पण तू गेल्यानंतर ओ.सी च लेक्चर झालं.
रूची : अच्छा. चल मग मी ठेवते.
ज्योती : अग किती घाई करते फोन ठेवायची. हात कसा आहे.
रूची : जरा दुखतोय ग.
ज्योती : काळजी घे.
रूची : हो बाय.
रुची फोन ठेवते. तितक्यात तिला हार्दिकचा मेसेज येतो.
हार्दिक : हेय रुची, आता कस वाटत?
रूची : हो आहे बरी. तू कसा आहेस.
हार्दिक : मी… मला काय झालंय. मी आहे की बरा. अस का विचारतेस? स्वप्नात वैगेरे आलो होतो की काय मी तुझ्या..
(ह्याला कस कळल? असा विचार करते)
रूची : तस काही नाही. सहज आपलं विचारलं मी.
हार्दिक : हो का?
रूची : होरे.. ऐकणा मला एका हाताने जमत नाहि. नंतर बोलते.
हार्दिक : ठीक आहे की मग मी कॉल करतो.
रूची : नाही नको… उद्या बोलू बाय.
हार्दिक : हम बाय
हार्दिकशी बोलून रूचीला खूप बरं वाटत होतं. ती एकदम फ्रेश झाली. तिला खर तर अजून बोलावसं वाटत होतं. पण प्रेम करण्यापेक्षा दोस्ती बरी अस वाटत होतं तिला. सध्या शिक्षण मग पुढचं पुढे.
इथे हार्दिकनेपण कॉलेजमध्ये असणाऱ्या त्यांच्या ग्रुपमध्ये रूचीला एकट सोडायच नाही. आणि झालेल्या गोष्टीची कल्पना दिली. रूची आता जेव्हाही कॉलेजमध्ये यायला लागली तेव्हा तिच्यासोबत कोणी ना कोणी असायचाच. तिला कोणीही एकटी सोडत नव्हतं. इथे राजला हार्दिक आणि रूची एकत्र येतात म्हणून अजून राग येत होता. रुचीच निरागस हसणं, मैत्रिणींशी गप्पा मारणे हे राजला खूप आवडायचं. का कुणास ठाऊक राजला खरच रूची मनापासून आवडायला लागलेली. पण जेव्हा जेव्हा ती हार्दिकसोबत दिसायची राजच्या तळपायाची आग मस्तकात जायची. जर रूची माझी नाही तर ती कोणाचीही नाही अस राजला वाटायचं. राजने काहीही करून रूचीला आपलं करायचं ठरवलेल पण कस हे त्याला सुचत नव्हतं. आपण जे वागलो ते बघून रूची कधीच आपल्या जवळ येणार नाही. राज ने तिला सॉरी बोलायचं ठरवलं. पण त्याला रूची एकटी अशी मिळतच नव्हती. सगळ्यांसमोर सॉरी बोलायला त्याचा इगो आडवा येत होता.त्याला रूची कोणत्याही परिस्थितीत हवी होती. त्याच्या विचारानुसार रूचीला सॉरी बोललं की सगळं संपल आणि मग तिला प्रपोज करायचा.
इथे रूची हार्दिकच्या प्रेमात पूर्णपणे बुडाली होती. का कोणास ठाऊक तिला सुद्धा एक मिनिट हार्दिकशी बोलल्याशिवाय चैन अशी पडत नव्हती. अभ्यासात पण लक्ष अस लागत नव्हत. पुस्तक उघडलं की कॉलेजमध्ये घडलेले किस्से आठवायचे आणि त्यात गुंतून जायची ती एकटीच हसायची. हार्दिकसोबत केलेली चॅटिंग ती सारख सारख ओपन करून वाचत बसायची. हार्दिकला सुद्धा सुरुवातीपासूनच रूची आवडायची. तो तीच मन खूप जपायला लागला. अश्यातच बोलता बोलता 1st सेमिस्टरचे नोटिफिकेशन नोटीस बोर्ड वर लागले. आता सगळा गोंधळ इथेच सुरू होणार होता. कारण ग्रुप पूर्णपणे तुटणार होता. सिनियरच्या बाजूला ज्युनियर सिटिंग होती. आणि त्यात हार्दिक, ज्योती आणि कॉलेजमधले इतर लोक पूर्णपणे वेगळे झाले होते.रुचीच्या वर्गात मोजून एक जण होता. त्यातल्या त्यात रूचीला बर वाटल. सगळेच आता मन लावून अभ्यासात गुंतले. बोलता बोलता परीक्षेचा दिवस उजाडला. सगळे एकमेकांना परिक्षेसाठीच्या शुभेच्छा देऊन आपापल्या वर्गात निघाले शिवाय हार्दिक, रूची आणि ज्योतीच्या. हार्दिकने रूचीला जोपर्यंत सर किंवा मॅडम वर्गात असतील तोवर तू तिथेच राहायचं. आमचा जसा पेपर संपेल आम्ही येऊ. रुची ठिक आहे बोलून वर्गात जाते. हार्दिक रुचीच्या पाठमोऱ्या आकाराकडे बघत बसतो. तितक्यात बेल वाजली. चला साहेब का इथेच देऊ पेपर आणून आपल्याला ज्योती चिडवण्याच्या हेतूने हार्दिकला बोलू लागली. हार्दिक केसांवर हात फिरवून थोडं लाजतो. खरतर हार्दिक आणि ज्योतीचा जीव होत नव्हता रूचीला एकट सोडून जाण्याचा पण पर्याय नव्हता. हार्दिक वर्गात जायला वळणार तोच राज रुचीच्या वर्गात शिरला. हार्दिक आणि ज्योती एकमेकांकडे बघू लागले. ज्याची भिती वाटत होती तेच झालं. नेमकं राजला रुचीचा क्लासरूम आलेला. हार्दिक रुचीच्या वर्गात जायला वळणार तोच ज्योती त्याला बोलते, हे बघ हार्दिक रूचीला स्ट्रॉंग व्हायला हवं आता. आपण 24तास तिच्या सोबत नाही राहू शकत. हार्दिकला ही तीच म्हणणं पटत. इथे राज आपल्या वर्गात आलेला पाहून रूची खूपच घाबरते. राजच्या मागे सर वर्गात शिरतात. त्यामुळे रूचीला बर वाटत. राजची सीट रुचीच्या सीटहुन दुसऱ्या ओळीला असते. सर आल्या आल्या पेपर वाटायला सुरुवात करतात. रूची पेपर आल्या आल्या त्यात पूर्ण गुंतूनच जाते. राज आपल्या वर्गात आहे हे काही क्षणांपुरती का होईना ती विसरते. राज सुद्धा पेपर लिहिण्यात व्यस्त होतो. आणि हळूच तो रुचीकडे बघतो पण रूची त्याला दिसतच नसते. कारण रुचीचा बेंच आणि राजच्या बेंचच्या बरोबर मध्ये एक बेंच असतो त्यावर दोन जण बसलेली असतात. जस जसा एक तास होतो. एक एक जण पेपर देऊन बाहेर पडतो. रूची मन लावून पूर्ण पेपरकडेच लक्ष देते. शेवटचा अर्धा तास राहिलेला असतो रूची आणि राजच्या मध्ये असलेला बेंच सुद्धा आता खाली झालेला असतो. वर्गात बघायला गेलं तर मोजून आठ किंवा नऊ जण असतील. आता राजला रुचीपूर्ण दिसत होती. तो तसा पण तिच्यासाठीच एवढा वेळ बसून राहिलेला. तीच ते निरागस पणे पेपर लिहिणे. हळूच डोळ्यांसमोर आलेली केसांची बट मागे घेणे. दातात पेन पकडणे. हे बघून राज रूचीकडे ओढला जात होता. आता पेपर संपण्याआधी वॉर्निंग बेल झाली. रूची पेपर पूर्णपणे लिहून पुन्हा तपासत बसलेली. तिला सुद्धा आता जाणवत की राज तिच्याकडेच बघत बसलाय. तिला खूप अस्वस्थ वाटत. ती सरळ उठून पेपर द्यायचा विचार करते. पण बाहेर गेलो तरी हा त्रास देईल असही वाटत. ती तिथेच बसते. अखेर शेवटची बेल होते. सर सगळ्यांच्या जागेवर येऊन पेपर घेतात. आणि बाहेर निघुन जातात. रूची स्वतःच पेन , पेन्सिल व इतर काही गोष्टी तिने सोबत घेतलेल्या असतात त्या भरत असते. राजकडे हाच एक चान्स होता रुचीला सॉरी म्हणायचा. तो तिच्या बेंचजवळ जातो. राज आलेला पाहून रुची खूपच घाबरून जाते.
राज : रूची प्लीज अशी घाबरू नकोस. हे बघ मी माझ्या केलेल्या कृत्यावर शर्मिनदा आहे. प्लीज मला माफ कर.
रुची : हे बघ मला तुझ्याशी कोणत्याच विषयावर बोलायचं नाही आहे. प्लिज तू मला त्रास देणं माझ्याकडे अस बघणं बंद कर.
राज : तू मला जोपर्यंत माफ नाही करत तोपर्यंत मी असच करणार
रूची स्वतःच सामान भरून बाहेर पडायला निघाली. राज तिला मागे खेचतो जोरात आणि तुला नीट बोलेल खरच समजत नाही का. सॉरी बोललो ना मी. राज जोरात ओरडतो तिच्यावर. इतक्यात आजू बाजूला सुद्धा गर्दी जमा झाली. हार्दिक आणि ज्योतीसुद्धा तिथे आले. रूचीलासुद्धा राग अनावर होत होता. तिचा हात उठला आणि सरळ राजच्या गालावर वळला.
रूची : मुलगी म्हणजे कचरा वाटते का तुला. आधी इज्जत करायला शिक मुलींची. आणि ह्यापुढे मला हात लावायची जरासुद्धा हिम्मत केलीस तर माझ्यापेक्षा वाइट कोणच नसेल. हे लक्षात ठेव.
राजसुद्धा रुचीवर हात उचलायला जातो. पण हार्दिक आणि त्याचे काही मित्र त्याला मागे ढकलतात. ह्यापुढे रुचीच्या वाट्याला जायचं नाही. अस हार्दिक राजला धमकावून सांगतो. स्वतःचा झालेला अपमान सहन होत नाही राजला. त्याच्या मनात फक्त सूड निर्माण झालेला असतो. हार्दिक आणि रूचीला कसही करून धडा शिकवायचा हेच त्याच स्वप्न. स्वतःचा लाल झालेला गाल चोळत मित्रांपुढ्यात नाही रूचीला आता धडा शिकवला तर राज नाव नाही लावणार असे धमकावून सांगतो. त्याचा लाल झालेला चेहरा बघून मित्रही त्याला समजवण्याचा भानगडीत पडत नाही. इथे रुचीचा असा रुद्र अवतार बघून सगळेच तिची मज्जा घेत तिला चिडवतात कारण हसत-खेळत शांत असणारी रुचीला पहिल्यांदाच सगळे बघत होते.
अचानक रूची बोलायला लागली…का उगाच घाबरायच मी, तो भलेही प्रिंसिपलचा मुलगा असेल. म्हणून कोणत्याही मुलीला हात लावेल का. रॅगिंग करण गुन्हा आहे तसेच सहन करणे देखील गुन्हाच आहे. आज मला त्रास देईल उद्या दुसरीला. त्याला मुली कमजोर वाटत असतील कारण त्याने इतिहास नाही वाचला असणार. स्त्री काय असते ह्यासाठी जिजाऊमाता, राणी लक्ष्मी बाई अश्या खूप साऱ्या महिला आहेत ज्यांची उदाहरण त्यांने घ्यायला हवी. एवढ बोलू ती थांबते. सगळे शांतपणे रुचीच बघत असतात तितक्यात हार्दिक टाळ्या वाजवतो तसे सगळेच वाजवतात. रुचीही लाजू लागते. चला आता निघुया उद्याच्या पेपरची तैयारी करायची आहे. असे बोलून सगळे आपापल्या घरी जातात.

क्रमशः

©भावना विनेश भूतल

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा