विश्वासातील प्रेम भाग 5

Written by

रूचीला काय झालं नेमकं हेच हार्दिकला कळत नव्हतं. तो तसाच हॉस्पिटलमध्ये पोहचला. तसेच सगळे कॉलेज मित्र त्याच्या जवळ आले. त्याने रूची बद्दल त्यांना विचारले. ती खूप सिरीयस आहे हे त्याला कळले पण नक्की काय झाले हे जेव्हा त्याने विचारलं तेव्हा त्याला प्रकाश सांगू लागला की अरे रूचीला ट्रकने उडवलरे. तिच्या कॉलेज ID वर कॉलेजचा नंबर होता तो बघून एकाने कॉलेजमध्ये फोन केला आम्हाला जस कळलं तस आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो. खूप सिरीयस आहे ती. ब्लिडिंग ही खूप गेल. हार्दिक धाप करून खाली बसला डोळ्यातून नुसते आसव पडू लागली. जिच्याबद्दल त्याने एवढी स्वप्न तिला अश्या अवस्थेत बघून तो खूप रडू लागला अगदी लहान मुलासारखा. सगळे त्याला सावरायला लागले. इतक्यात रुचीचा भाऊ धावत तिथे आला. रूचीचे आई वडील देखील तिथेच डोकं भिंतीला टेकून शून्य नजरेतून कुठे तरी बघत बसलेले. विश्वा रडतच आईच्या कुशीत जाऊन शिरला आणि मोठ्याने रडू लागला. विश्वाला पहिल्यांदाच अस रडताना बघून आई वडिलांचा देखील बांध तुटला. आई कस झालं ग अस. विश्वा रुचीच्या केबिनमधून बाहेर येणाऱ्या डॉक्टरांकडे पळत जाऊन विचारू लागला की नेमकं काय झालं माझ्या रूचीला, मी तिचा मोठा भाऊ.. डॉक्टर बाहेर आलेले बघताच कॉलेजमधले देखील त्यांच्या भोवती जमू लागले. डॉक्टर बोलले हे बघा आता काहीच सांगता येणार नाही. पेशन्ट आम्हाला हवा तसा रिस्पॉन्स देत नाही. आम्हाला अजून B+ ब्लड लागेल. आमच्या ब्लड बॅंकेतून जेवढ होत तेवढ आम्ही उपलब्ध करून दिल. अजून कुठेही व्यवस्था होत नाही. कॉलेजमधील सात आठ जण बोलु लागली डॉक्टर माझे B+ आहे तुम्ही माझं घ्या. पण रूचीला बर करा. डॉक्टरांनी त्यांना आपल्या बरोबर काही तरी टेस्ट करायला यायला सांगितलं. विश्वा दादा त्यांच्याकडे बघतच राहिला. तितक्यात त्याला त्याचे पप्पा बोलले, बाळा रुचीच्या कॉलेजमधले आहेत सगळे. ह्या मुलांचा आम्हाला आधार होता. पोलीस देखील रुचीच्या केबिनजवळ आले. तितक्यात विश्वा दादा जाऊन त्यांना विचारू लागला काय झालं साहेब. मी रुचीचा भाऊ. पोलीस हे बघा तो ट्रक वाला आमच्या ताब्यात आहे त्याला चांगला चोप सुद्धा दिलाय. पण त्याच शेवटपर्यंत हेच म्हणणं आहे की रूची स्वतः धावत त्याच्या ट्रक समोर आली. पेशंटला कोणतं टेन्शन होत का. म्हणजे मानसिक त्रास, अभ्यासाच वैगेरे. हे प्रकरण आम्हाला तरी आत्महत्याचे वाटते. विश्वा दादा बोलला, अहो साहेब माझी बहिण अभ्यासात खूप हुशार आहे. आणि तिला कसलच टेन्शन नव्हतं. तिने तर मला फोन पण केलेला. माझ्याशी नीट बोलली. तिच्याशी बोलताना तरी मला असं वाटलं नाही. ती आत्महत्या करणाऱ्यांमधली नाही. पोलीस इतरांकडे सुद्धा विचारपूस करून निघून जातात. विश्वा दादा डॉक्टरांची परमिशन घेऊन रुचीच्या केबिनमध्ये गेला. रूचीला मोठ मोठ्या मशिणींमध्ये खिळलेलं बघून खूप रडू लागला. रूची निवांत झोपलेली. रूममध्ये फक्त बीप बीपच आवाज येत होता. विश्वा दादा एकदम रडलेल्या आवाजात बोलू लागला.. ए पिल्लू, उठणा बाळा.. बघ काय अवस्था करून घेतलीस. दादा आलाय बघ तुझा. आपल्या दादाशी बोलणार नाही तू. रूची काहीच रिस्पॉन्स देत नव्हती. विश्वा दादा रडतच बाहेर येऊन उभा राहिला. हार्दिकची तर रूचीला बघायची हिंम्मतच होत नव्हती. कॉलेजमधले हळू हळू जाऊन तिला बघत होते. तेवढ्यात ज्योती पण आली तिथे. तिने हार्दिकची अवस्था बघितली. हार्दिकला जबरदस्ती ती रूचीला बघून ये म्हणून आत घेउन गेली. हार्दिकने सोबत आणलेली बाप्पाची मूर्ती रुचीच्या जवळ असलेल्या टीपॉयवर ठेवली. आणि रडलेल्या डोळ्यांनी रूचीकडे बघत होता. हार्दिकला रडू आवरत नव्हतं. रडलेल्या आवाजातच रूची बोलला आणि रडू लागला. ज्योतीला ही रडू यायला लागला. इतक्यात रुचीची श्वास घ्यायची तळमळ वाढू लागली. जणू तीने हार्दिकसाठीच थोडा श्वास रोखून ठेवला होता. तिची ही हालचाल बघून हार्दिक पळतच डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी सगळ्यांना बाहेर थांबायला सांगितले आणि आत गेले.
रूची तू फक्त माझ्यासाठीच थांबलेलीस.. हार्दिक स्वतःलाच बोलू लागला. त्याला पडलेल्या स्वप्नाचा आता तो विचार करू लागला. आणि शून्यात नजर टाकुन तो हरवून गेला. इथे सिस्टर धावपळ करत होती. डॉक्टर रुचीला इंजेक्शन वैगेरे देत होते. पण आता त्याचा काही फायदा होईल असं काही दिसत नव्हत. शेवटी डॉक्टर बाहेर आले आणि रूचीच्या भावाला सॉरी बोलून निघून गेले. आता फक्त प्रत्येकजन रडत होता शिवाय हार्दिक. ज्योती व इतर कॉलेजमधली सगळीच हार्दिकला हलवून सांगत होते. पण त्याची नजर कुठे तरी हरवून गेली.शेवटी प्रकाशने एक कानाखाली मारली हार्दिकच्या तसा हार्दिक रडतच सगळ्यांना ढकलून रुचीच्या खोलीत शिरला. रूची डोळे मिटून कायमची झोपली.त्याला अस आत मध्ये शिरलेल बघून सगळेच आत आले. हार्दिक रूची कडे बघून तिच्या शेजारी ठेवलेल्या बाप्पाकडे बघू लागला. आणि बोलू लागला. तूच माझ्या रूचीला माझ्यापासून तोडलस. तुझी मी इतकी मनोभावे सेवा केली त्याच तू हे फळ दिलंस मला. रूची तू मला अशी सोडून नाही जाऊ शकत ग. माझ सर्व काही तूच आहेस ग. मी कसा राहिल तुझ्याशिवाय. नकोना सोडून जाऊस. हार्दिक रूचीला हलवत होता. सगळे हार्दिकल बाहेर खेचत होते. पण तो कोणालाही ऐकत नव्हता. रुची तुला उठवच लागेल. नाही तर मी ह्या बाप्पाच्या मूर्तीसमोर स्वतःच डोक आपटून जीव देईल. रूची उठना ग… विश्वा आणि त्याच्या घरचे पण हे सगळं बघून रडत होते. सगळीकडे नुसता आक्रोश. हार्दिकला सगळे बाहेर काढत होते. हार्दिक काही बाहेर जायला तैयार नव्हता. नर्स रूचीला लावलेल ओकसिजन मास काढणार तितक्यात तिला रुचीची थोडी फार हालचाल जाणवली ती तशीच डॉक्टर म्हणून किंचाळली. सगळे एकदम शांत झाले. हा एक चमत्कारच होता. जो बाप्पाने हार्दिकच्या प्रेमासाठी घडवुब आणलेला. अखेर त्याची भक्ती रूचीसाठी धावून आलेली. डॉक्टर रूचीला आता चेक करत होते. हार्दिकला एका मित्राने आपल्या कुशीत घेऊन शांत केलेल. इथे रुचीचा भाऊ आपल्या भिजलेल्या डोळ्यांनी हार्दिकच्या रुपात दिसणाऱ्या देवाकडे बघत होता. आता सगळ्यांचे लक्ष फक्त डॉक्टरांकडेच लागून राहिलेल.

क्रमशः

© भावना विनेश भूतल

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा