विश्वास

Written by

अस्मिता म्हणाली मी तुझ्याबरोबर पुण्याला येणार नाही हे तुला शेवटचं सांगते आहे परत मला हे विचारू नकोस.अमित तिच्या ह्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून म्हणाला पण अग तुला जमेल का हे सगळं,तुम्ही काही काळजी करू नका मी करेल सर्व व्यवस्थित अस्मिताने उत्तर दिल.दुसऱ्या दिवशी सकाळी अमित पुण्यातील त्याच्या नोकरीत रुजू होण्यासाठी निघाला होता.मागील सर्व प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभे राहत होते.पुण्यात नोकरीनिमित्ताने राहणारा अमित एका छोट्या शहरातून आला होता,छानशी नोकरी आणी सुंदर बायको त्याच्या आयुष्यात आली होती.देवाने एक गोजिरवाणे बाळही त्यांच्या ओटीत टाकले होते.सर्व काही सूरळीत चालू असताना छोट्याशा आजाराचं निमित्त होऊन त्याची बायको बाळाला त्याच्या मांडीत सोडून देवाघरी निघून गेली होती, वर्षभराचा ते बाळ नंतर त्याच्या गावी आजीआजोबा सोबत राहत होत.सुट्टीच्या दिवशी मात्र तो बाळाकडे धाव घ्यायचा.असंच एक वर्ष उलटून गेलं तस त्याच्या बाबांनी पुनर्विवाहाचा आग्रह धरला,बाळाच्या भविष्याचा विचार करून त्यानेही होकार दिला आणी नात्यातली एक मुलगी त्याच्याशी लग्नाला तयार झाली.लग्नासाठी घेतलेली रजा संपत आली होती म्हणून त्याने बायकोला म्हणजे अस्मिताला बॅग भरायला सांगितलं तसा तिने तिचा विचार त्याच्यासमोर मांडला.मी आणी बाळ दोघेही इथेच आईबाबांच्या जवळ राहू,तुम्ही सुट्टीच्या दिवशी आम्हाला भेटायला येत जा.बाळाला आजीचा खूप लळा लागला आहे आणी मलाही बाळाला काय हवं नको ते कळत नाही,शिवाय बाबांनाही हल्ली बरं नसत त्यांचं बघायला इथं कोणी नको का.त्यापेक्षा तुम्ही एकटेच जा तिकडे मी इथे बाळाची आणी आईबाबांची काळजी घेते,बाळाशी माझी तोपर्यंत दोस्ती पण होईल.अमितला हे काही पटत नव्हते वारंवार अस्मिताला सांगूनही ती ऐकत नाही म्हणल्यावर त्याने आईबाबांच्यासमोर त्याची कैफियत मांडली होती तेव्हा अस्मिताने केलेला हट्ट बघून आईबाबांनी तो निर्णय दोघांनी मिळूनच घ्यावा असे सुचवले होते.शेवटी अस्मितेच्या म्हणण्याला होकार देऊन अमित अतिशय समाधानाने पुण्याला निघाला होता एक योग्य हातात त्याच्या आईबाबांना आणी हो चिमुकल्याला सुद्धा…

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा