वेगळाच आनंद होतो …..

Written by

वेगळाच आनंद होतो “कोल्हापूरी असल्याचा”

आनंद होतो, कोल्हापूर बाहेरील
व्यक्ती जेव्हा न चुकता,
श्रद्धेने नतमस्तक होते
“महालक्ष्मीच्या व्दाराशी”
वेगळाच आनंद होतो….

आनंद होतो कोल्हापूर बाहेरील
व्यक्ती जेव्हा आवर्जून कौतुक
करते कोल्हापूरी “साजाचं”
वेगळाच आनंद होतो….

आनंद होतो कोल्हापूर बाहेरील
व्यक्ती जेव्हा उत्साहाने कौतुक
करते आपल्या “शाहू परंपरेचं”
वेगळाच आनंद होतो….

आनंद होतो, कोल्हापूर बाहेरील
व्यक्ति जेव्हा आठवणीने कौतुक
करते आपल्या “कोल्हापुरी चपलांच”
वेगळाच आनंद होतो….

आनंद होतो, कोल्हापूर बाहेरील
व्यक्ती सांगते जेव्हा गर्वाने
“शिवजयंती साजरी होते
ती फक्त कोल्हापूरी परंपरेने”
वेगळाच आनंद होतो….

आनंद होतो, कोल्हापूर बाहेरील
व्यक्ती जेव्हा उत्साहाने येते थाटात
साजरा होणारा “सीमोल्लंघन” पाहायला
वेगळाच आनंद होतो….

आनंद होतो जेव्हा कोल्हापूरच्या
बाहेर “MH-09 ” बघतो तेव्हा,
वेगळाच आनंद होतो….

आनंद होतो, कोल्हापूर बाहेरील
व्यक्ती म्हणते जेव्हा
“जगात भारी तुम्ही कोल्हापूरी”
वेगळाच आनंद होतो….

वेगळाच आनंद होतो कोल्हापूरी असल्याचा🙏

✍️©पल्लवी पाटील

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा