वेडी माया….!!

Written by

प्राणीमात्रावर प्रेम करण हा मनुष्य स्वभाव आहे.प्राणी जेंव्हा मानवाला लळा लावतात तेंव्हा प्रेमाचा आगळा वेगळा सोहळा पहावयास मिळतो.त्याच ते खेळण , मस्ती करण , चाटण , एक वेगळी झलक त्याच्या सहवासात मिळते .प्राणीमात्रांवर प्रेम केल्यास समाधानी लकेर आयुष्याला मिळते.गायीच्या पाडसाच लोभस रुप मनाला भावत तेंव्हा पाडसाविषयी ऊन्मळून आलेल्या भावना……

? वेडी माया……

अस साजर पाडस
रुप त्याच लई गोंडस

अंगाखांद्याला लावी लळा
प्रेमांनी गोंजारत नित्य गळा

दुडूदुडू ते उड्या मारी
हरणासारखी चपळता भारी

गोठ्यात हंबरे गाय
धन्य ती पाडसाची माय

चकाके त्याची कांती
लाडीगोडी त्याची श्रीमंती

पहाता त्याला सुटे पान्हा
जसा वाटे आयोध्येचा कान्हा

त्याच्यासाठी जीव कासावीस
त्याच्यावर फिरवाव मायेच मोरपीस

तेची घायाळ नजर
फोडी हृदयाला पाझर

धरतीवर जन्म हा वेगळा
पाडसा तुझाच हा प्रेमाचा सोहळा

✍नामदेव पाटील.

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा