वेडे प्रेम ❤️

Written by

वेडे प्रेम……. ❤️

आई आज शेवटचा पेपर आहे . आज घ्यायला येऊ नको.. आम्ही सगळ्या मैत्रिणी रिद्धीकडे जाणार….. नाईट आऊट करणार आज…. पियू नी स्मिताला सांगितले…

अग,हे काय… परीक्षा संपली की नाही तर तुझं सुरु झालं….. बाबांना का नाही सांगितलं….. ते ओरडतात मग माझ्या नावानी….

तूच सांगशील बाबांना… त्यांना वेळ तरी असतो का….

आणि हे काय, बॅग मध्ये काय घेतलेस एवढे…

अग, आताच तर सांगितले नाईट आऊट करणार म्हणून… सोबत ड्रेस नको का…..

पियू ची दहावीची परीक्षा होती. स्मिता नी पियू ला सेंटर वर सोडले आणि ऑफिस ला गेली… रिद्धी च्या आईला फोन करून विचारते म्हटलं तर तिचा फोन बिझी….. नंतर कामात विसरून गेली… पाच वाजता घरी आली…..

आधी रिद्धीच्या आईला फोन लावला….

नाही हो, नाईट आऊट वगैरे काही नाही… रिध्दी घरीच आहे…..

स्मिता रिद्धीशी बोलली….

काकू, माहिती नाही… ती पेपर झाला आणि निघून गेली आमच्याशी बोललीच नाही….

स्मिताने सगळ्या मैत्रिणीकडे फोन केले परंतु ती कुठेही नव्हती….

आता मात्र स्मिता घाबरली…. तिने लगेच सुमेध ला फोन लावला…..

अग, काय कटकट आहे.. मी बाहेर आहे.. मित्रांसोबत… आज उशिरा येईल….

अहो माझं ऐकता का….. पण त्यांनी न ऐकताच फोन ठेवला….

तिनी परत फोन लावला त्याला बोलण्याची संधी न देता एका दमात सांगून टाकले की अहो पियू घरी नाही आली….

अग असेल मैत्रिणीकडे….

नाही हो … कुणाकडेच नाही….

ठीक आहे. मी आलोच…
सुमेध घरी आल्या आल्या स्मिताला बोलू लागला.. तुझं लक्ष कुठं असत… तुझ्यामुळे ती वाया गेली…. वगैरे वगैरे
नेहमी असं म्हटलं की स्मिता भांडायची पण आज तीच सगळं लक्ष पियूत होते…..

बर बाबा.. सगळं ठीक आहे… तू म्हणतो ना माझ्यामुळे वाया गेली तर गेली असेल पण आता काय करायचं…. तीला शोधावं तर लागेल ना… तेव्हा प्लीज पोलीस स्टेशन ला चला … तिने नमतं घेत सुमेध ला समजावले…

दोघेही पोलीस स्टेशन ला गेले….

पोलीस भलते सलते प्रश्न विचारू लागले…

काही लफड होत का पोरीचं….

साहेब काय बोलतंय हे… अहो माझी पंधरा वर्षाची मुलगी आणि लफड….

अहो साहेब पंधरा काय बारा बारा वर्षांच्या मुली घरून पळून जातात मुलांसोबत ….

सुमेधला धक्काच बसला…. आपण तीला अजूनपर्यंत बाळचं समजत होतो… आणि आपली मुलगी इतकी मोठी झाली की पळून जावी…. खरंच आपल लक्षच नव्हत की कधी आपले पिल्लू एवढे मोठे झाले…..

स्मिताने सगळं पोलिसांना सांगितले… ती बॅग मध्ये कपडे घेऊन गेली हेही सांगितले….

बघा अजून पैसे, दागिने तर नेले नाही ना….

खरंच… तिनी पैसे आणि दागीने पण नेले होते…

पोलिसांनी लगेच शोधून काढले… शेगाव रेल्वे स्थानकावर ती एका मुलासोबत सापडली…. पॊलिसांनी स्मिताला आणि सुमेधला पोलीस स्टेशन ला बोलवले….
स्मिता आणि सुमेधला धक्काच बसला…. ती एका दुकानात काम करणाऱ्या मुलासोबत पळून गेली होती… तो वीस वर्षाचा तरुण होता….
सुमेध तिथेही स्मितालाच दोष देत होता… एवढी पोरगी हाताबाहेर गेली.. तुझं लक्ष कुठं होत…. तुझ्यामुळेच मुलगी वाया गेली… स्मिता सारखी रडत होती.तीला मनातून खुप अपराधी वाटत होत… एवढी पळून जाण्यापर्यत गोष्ट गेली तरी आपल्या लक्षात का आलं नाही? का सुमेध म्हणतो तस लक्षच नव्हतं आपल…. आणि वरून सुमेध तिलाच बोलत होता….

मध्ये इन्स्पेक्टर बोलले…. साहेब काय तुम्ही मॅडम ला दोष देत आहात…. तुम्ही कुठे होता… तुम्ही घरीच राहता ना…. मग वडील म्हणून तुमचीही जबाबदारी आहेच की….

तुमची भांडण बाजूला ठेवा…. आणि या केस चे काय करायचे ते बघा…

पियू म्हणाली आम्हाला लग्न करायचं आहे…. मी घरी येणार नाही..

पोलिसांनी धमकावले हे बघा तुम्ही दोघेही अज्ञान आहात तेव्हा लग्न करू शकत नाही…. आणि तुला पळवून आणले म्हणून या मुलाला शिक्षा होईल आणि तू पण घरून पैसे दागिने चोरले तेव्हा तुलाही शिक्षा होईल…..
आता पियू घाबरली आणि आई वडिलांसोबत घरी आली….
इन्स्पेक्टर नी कॉन्सलर चा नंबर दिला आणि तीला कॉन्सलर कडे नेण्याचा सल्ला दिला….

दोन दिवस पियू खोलीतून बाहेर आली नाही आणि कुणाशी बोलतही नव्हती…

शेवटी स्मिता आणि सुमेध पियुला कॉन्सलर कडे घेऊन गेले…

अनुपमा मॅडम… एक प्रसन्न व्यक्तमत्व…
मॅडम नी सगळी माहिती जाणून घेतली… एक दोन सेटिंग मध्ये पियू मोकळी झाली….
बाहेर स्मिता आणि सुमेध असायचे आणि आतमधल्या खोलीत पियू…… अशी व्यवस्था होती की सगळं स्मिता आणि सुमेध ला ऐकू यायचे…..

पियूचे बोलणे ऐकून दोघांनाही धक्काच बसला…

मॅडम, माझे आई बाबा सारखे भांडत असतात….
आई तर नेहमी हेच म्हणतेय की पियूसाठी मी सहन करतेय नाही तर कधीचेच सोडून गेली असती….
म्हणजे ती माझ्यासाठी त्रास सहन करते…..कधी कधी वाटते आत्महत्या करावी म्हणजे माझ्यामुळे होणारा त्रास कमी होईल…. स्मिताच्या डोळ्यात पाणी आले….. सुमेध नी हलकेच तिचा हात थोपटला…..

आणि बाबा….. बाबा तर सारखे बाहेरच असतात… त्यांची नोकरी आणि मित्रांसोबत पार्ट्या… त्यांना वेळच नसतो…. आणि मग घरी आईची सारखी चिडचिड सुरु असते…..

बाबा घरी असले की दोघांची भांडणे आणि बाबा घरी नसले की आईची चिडचिड…. माझ्यावर कुणी प्रेमच करीत नाही….. माझ्याकडे दोघांचंही लक्षच नसत…

एक दिवस मला निबंध स्पर्धेत पहिल बक्षीस मिळाले…. मी खुशीत घरी आले…. आईला दाखवायला म्हणून तिच्या रूम मध्ये गेले… ती चिडलेलीच होती . आई ग म्हणून गळ्यात पडली…. ती जोरदार रागावली…. जा तिकडे… आपला अभ्यास कर…. मला फार वाईट वाटले….

मला पेन हवा होता म्हणून मी दुकानात गेले…. माझ्या हातात प्रमाणपत्र होते… राज नी चौकशी केली… माझी स्तुती केली…. मला फार छान वाटले..नंतर मी प्रत्येक गोष्ट त्याच्याशी share करू लागले… तोही माझं लक्ष देऊन ऐकायचा…. माझी स्तुती करायचा…. आणि आम्ही एकमेकांवर प्रेम करू लागलो….

अग, पियू हे प्रेम नव्हे… हे आकर्षण आहे… राज तुझा मित्र आहे इथपर्यंत ठीक आहे…. पण लग्न…..
एकतर तुझं लग्नाचं वय नाही…. त्यातल्या त्यात तू त्याच्यासोबत अड्जस्ट करू शकशील….. तुझ्या अंगावरचा ड्रेस तर त्याचा महिन्याचा पगार नाही….

अनुपमा मॅडम नी खुप छान समजावून सांगितले… हे बघ पियू, हे जरी खरं असलं की तुझे आई बाबा भांडायचे तरी त्यांचं तुझ्यावर प्रेम नाही असं मुळीच नाही… तुझे बाबांना नोकरीमुळे वेळ मिळत नाही…. हे सगळं ते तुझ्या भविष्यासाठीच करतात ना…. तू पळून गेल्यावर तुझ्या आई बाबाची अवस्था काय झाली होती माहिती आहे का?

अनुपमा मॅडम नी पियू चे छान कॉन्सेलिंग केले तीला तिची चूक कळली आणि आई बाबा बद्दलची नाराजीही दूर झाली….

स्मिता आणि सुमेध अनुपमा मॅडमला म्हणाले, मॅडम आम्हाला कळलेच नाही की आमच्या छोटया छोट्या भांडणाचा एवढा मोठा परिणाम होईल…. यापुढे आम्ही काळजी घेऊ… पियुला प्रेम आणि वेळ देण्याचा प्रयत्न करू…..

आज सुमेध आणि स्मिता भांडत नाही. काही मतभेद असले तर सम्जास्यानी सोडवतात…. निदान पियू समोर तरी भांडत नाही… तिघेही फिरायला जातात…सुमेध ही लवकर घरी येतो…. पियू ला वेळ देतो आणि पियू पण आता अभ्यासात लक्ष देतेय……

पियू लहान होती… किंवा वेळीच सापडली म्हणून…. नाही तर कितीतरी मुली चुकीचे निर्णय घेऊन आयुष्य उध्वस्त करतात….

मुलांचे विचार ऐकून घ्यायलाही कोणी नसते. मग त्यांनी कुणाला सांगायचे ? कधी वेळेअभावी, तर कधी कधी याची जाणीवच नसल्यामुळे मुलांना पालकांचा सहवास मिळत नाही. ही त्यांची मानसिक कुचंबणा त्यांची मने दुर्बल बनवते. त्यामुळे ती चिडचिडी होतात. मानसिकदृष्ट्या त्रस्त होतात व अभ्यासात मागे पडतात. अशा वेळी काही मुले पर्याय शोधतात..
आणि कुणी सहानुभूती दाखवीनारा, समजून घेणारा सानिध्यात आला की प्रेमात पडतात….

….. म्हणून पालकांनी मुलांना समजून घेणे गरजेचे असते… आई वडिलांचे मुलांवर प्रेम तर असतेच पण ते व्यक्त करणे आवश्यक असते …..मुलांना प्रेम हवे असते, आई-बाबा हवे असतात.

मुलांकडे लक्ष देणे, संस्कार करणे ही फक्त आईचीच जबाबदारी नाही तर वडिलांचा सहभागही तितकाच महत्वाचा असतो… नाही का?

“अर्चना अनंत “✍️

माझा लेख आवडल्यास लाईक, कॉमेंट करा…. आणि माझे लेख वाचण्या साठी मला अवश्य फालो करा

धन्यवाद ???

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा